• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
पालक

बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी काय कराल जाणुया 10 उपाय

Sanghajaya Jadhav
1 ते 3 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jul 09, 2021

बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी काय कराल जाणुया 10 उपाय
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

 

आईचं दुध हे लहानग्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतं आईच्या दुधाला अमृताची उपमा देखील दिली जाते

बाळ जन्म घेते तेव्हा त्याचा मुख्य आहार असतो आईचे दूध. आईचे दूध पोषणाने समृद्ध असते आणि त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा उत्तम होण्यास मदत मिळते. जागतिक आरोग्य संघटनेने पहिले ६ महिने बाळाला केवळ आईचे दूध द्यावे अशी शिफारस करतात.1ते 6 महीन्याच्या काळात इतर पदार्थ बाळाला दिले जाऊ शकत नाही कारण  बाळाची पचनसंस्था जास्त मजबूत झालेली नसते. त्यामुळे त्याला इतर पदार्थ खाऊ घातल्यास ते त्याला पचत नाहीत, शिवाय त्याचे आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. पहिले 6 महिने आईच्या दुधाव्यतिरिक्त  बाळाला काहीच देऊ नये. या महिन्यात सर्व अत्यावश्यक तत्वे दुधातून मिळाल्याने बाळ बऱ्यापैकी आरोग्य पुर्ण होते आणि  त्याची पचनसंस्था सुद्धा इतर अन्न पदार्थ सेवनास तयार झालेली असतें.6 महिन्यानंतर मात्र बाळाला आईचे दूध देणे कमी करावे कारण त्याना समज आलेली असते आणि जर दूध पाजणे कमी केले नाही तर त्याला सवय लागून पुढेही तो दुधाचा हट्ट धरतात. त्यासाठी बाळाचे दुध वेळीच सोडवणे गरजेचे असते. पण हे दुध कसे बरे  सोडवावे हे अनेक पालकांना ठाऊक नसते. 

  • स्तनपानातुन आई आणि बाळाचे नात्याची नाळ जुडलेली असते.
  • या दुधातुन बाळाला आवश्यक पोषण सुद्धा मिळते.
  • बाळाचे दूध सोडवण्यावताना त्याचे वय हे 6 महिने ते 1 वर्ष असावं असे तज्ञ मंडळी सुचवतात.
  • बाळाचे वय किमान 1 वर्षे झाल्यावर त्याचे दूध बंद करणे योग्य ठरते. पण याची सुरुवात 1 वर्षे पूर्ण होण्याआधीच करणे योग्य आहे. हे यासाठी कीं बाळ ही अनुकूल प्रतिसाद देते. तुम्ही अचानक बाळाचे दूध सोडवाल तर ते आणखी दुध पिण्याचा हट्ट धरतात. याकरिता त्याची हळूहळू सवय कमी करावी लागेल. असे केल्यामुळे बाळाची दुध पिण्याची सवय आपसुकच मूडेल आणि दूध पिन विसरून जाईल.
  • अनेक जण बाळाला दुधाशिवाय इतर पदार्थ खाऊ घालतात आणि दूध बंद करतात. पण ही गोष्ट बाळाला अंगवळणी पडलेली नसते.
  • म्हणून बाळ स्वताःहून दूध सोडवेल असे उपाय आपण बघुया

1.प्रथम त्याला दिवसातून एकदा स्तनपानाऐवजी वरचे अन्न द्या.

2.मुलाची चव विकसित होईल असे पेज,पातळ,घट्ट पदार्थ खाऊ घाला. आता मूल दुध पिण्यास मागेल त्यापूर्वीच त्याच्यासमोर हे खाणे ठेवा.

3. मुलांना घरातील इतर सदस्यांजवळ झोपण्यासाठी प्रशिक्षित करा यातुन त्याची रात्रीची उठून दुध पिण्याची सवय नाही लागणार.

4.बाळाचे स्तनपान बंद करताना  स्वत:च्या आरोग्याची आणि आरामाचीही काळजी घ्यायला विसरू नये.

5.स्तनपान देत नसाल तेव्हा त्याना जवळ घेऊन त्याच्या सोबत खेळा,त्याचे लाड करा यातुन आपली माता आपल्या पासून दूर जात नाही याची श्वासवती लहानग्यांना होईल. 

6.स्तनपानाचा मातेवरही सकारात्मक परिणाम होत असला तरी तीची बाळाला दुधातुन कॅल्शियम पुरवण्याची क्षमता कमी कमी होत जाते. यामुळे ना बाळाचे आरोग्य जपले जाते ना आईचे  यासाठी दुध सोडवणे हा योग्य उपाय आहे.

7. लहानग्यांच्या खाण्याच्या वेळा,दिनक्रम ठरवा.

8. तरीही बाळ दुध सोडवायला ऐकत नसेल तर विविध क्लुप्ती आजमावा.  स्तनाच्या आजुबाजुला बाळाच्या वापरातील कडू औषधं किंचीतस लाऊन.

9. आईचच दुध मागत असेल बाळ तर स्तनातुन दुध काढूण कपाने,चमचाने पाजावे.

10.जस बाळाला समजायला लागत तेव्हा पासून त्याना जेवताना जवळ घेऊन बसा मग त्यांना सवय होते खाणपान पध्दतीची ते लक्ष ठेऊन अनुकरण करतात. तरीही ऐकत नसेल बाळ तर वैद्याचा सल्ला घ्यावा 

ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}