• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

मुलांचा कोरना बद्दलचा संभ्रम कसा दुर करू शकतात पालकवर्ग

Sanghajaya Jadhav
0 ते 1 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित May 06, 2021

मुलांचा कोरना बद्दलचा संभ्रम कसा दुर करू शकतात पालकवर्ग
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

मुलां मधील कोरना विषयी समज गैरसमज दुर करण्याची तसेच त्याची काळजी घेण्याची जबाबदारी  पालक वर्गाने लीलया पेलली पाहिजे कारण लहान मुलांना कोरोना चटकन होऊ शकतो म्हणून गर्दीत जाणे टाळावे किंबहुना मुलं जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. कोरोना बद्दल जनजागृती व्हावी यासाठी पहिल्यांदा लहान मुलांसाठी मार्गदर्शक तत्वे गाईडलाईन्स (guidelines)  देण्यात आली आहे. जेणेकरून पालकवर्ग आपल्या मुलांसाठी सावधगिरी बाळगली जाईल.
 


1. कोरना-19 बाबत मुलांच शंका निरसन (Resolving children's doubts about covid-19) :-


मुलांच्या मनात येणारे कोरोना विषयीचे प्रश्न अनुत्तरीत न ठेवता त्याच निवारण त्याच वेळी करा. त्याना प्रत्येक वेळीस एक उदाहरण किंवा एखादी माहीत सांगुन त्याच्या शंकांना आळा घाला. का , कसा होतो कोरोना आणि काय सावधगिरी बाळगली तर तो आपल्यास संक्रमित करत नाही याची पुर्ण कल्पना आपल्या मुलांना आहे याची खात्री पटवून घ्यावी.

2. कुतूहल (Curiosity) :- 
लहानग्यांना जास्तच कुतूहल असते कारण नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात या नादात ते बर्याच उचापती करून पाहत असतात या ठिकाणी पालकांनी विशेष लक्ष पुरवत त्याना काही गोष्टी समजून सांगण गरजेचं.

3. बचाव (Rescue) :-
आपली सुरक्षितता आपल्या हाती याची जाणीव मुलांना हवी जेणेकरून विश्वास निर्मिती होईल.जसं सर्दी -खोकला किंवा उलट्या - जुलाब विषाणूमुळे होतात, तसाच कोरोनाव्हायरसही एकप्रकारचा विषाणू असल्याचं त्यांना सांगायला हवं.
हात धुणं , माक्स वापरण , गर्दीत न जाणे , बाहेर गेलो तरी कसे सुरक्षित अंतर ठेवावे याबाबत आपल्या मुलांना प्रशिक्षित करायला हवं. यामुळे ते स्वताःच स्व काळजी घेऊ शकतील.

4. संभ्रमित बातम्या टाळा (Avoid confusing news) :-
अशा बातम्या लगेच पसरतात याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो यामुळे मुल संभ्रमित होतात जसे शाळा का बंद आहेत ? त्या कधीच उघडणार नाहीत का ? मला गार्डन मध्ये कधी खेळायला मिळेल ?
आजी-आजोबा पॉझिटीव्ह असतील तर ते परत कधीच भेटणार नाहीत का? 
दिलासा देणार्या बातम्या ऐका , दाखवा आणि वाचा.
यावर घरात चर्चा घडवून आणवी आपल्या मुलांना बोलत करून त्याच्या मनातील गोष्टी जाणून घ्याव्यात.
यावरही मात करता येईल याविषयी त्याच्या मनात बिंबविले जाव.

5. आशावाद (Optimism) -: 
आपल्या मुलांच्या मनात भिती न बसता आशावाद जोपासला गेला पाहिजे. परिस्थिती सुधारते आहे ,ती नक्कीच नियंत्रीत होईल याबाबतीत आशावाद मुलांमध्ये जोपासला जावा. संसर्गाचा धोका कसा टाळता येईल,यासाठी कोणत्या उपाय योजना आखाव्यात जेणेकरून कुटुंब,आसपासचा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित राहील. यासाठी पालकच खंबीर बनायला हवेत उगाचच काळजी करत बसून फायदा नाही म्हणून काय करता येईल याकडे जास्त लक्ष दिलं गेल पाहिजे.

6. लसीकरण (vaccination) :- 
लसीकरण किती गरजेचं आहे का घेतलं जातंय याची जाणीव मुलांना करून द्या.
लसीकरण पद्धती , उपचार याची कशी व्यवस्था आहे त्याची मार्गदर्शकतत्वे याबाबतची माहिती आवश्यक आहे. लसीकरणासाठीची लागणार्या आवश्यक गोष्टीचे पालन करून आपण आणि आपल्या मुलांना जागृत करावे.  

टिप-:आपण सकारात्मक उर्जा असावी, कोविड प्रोटोकॉल नियमितपणे अनुसरण करत रहा, काही समस्या असल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि या ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}