• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
उत्सव आणि उत्सव

आजच्या खऱ्या आयुष्यातील हिरोंचे आभार

Canisha Kapoor
गर्भधारणा

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Aug 14, 2020

आजच्या खऱ्या आयुष्यातील हिरोंचे आभार
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

आपल्या पूर्वजांनी पुढील पिढीला  म्हणजेच  आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संग्रामात लढा दिला.   या  स्वातंत्र्याचे रक्षण करणे, त्याचा आदर करणे व त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.

या स्वातंत्र्यदिनी आम्ही  अशा लोकांना  आणि संस्थांना अभिवादन करतो  की ज्यांची कृतज्ञता, धैर्य आणि चिकाटी याबद्दल आम्हाला अभिमान  आहे.आम्ही त्यांच्या उत्तुंग इच्छाशक्तीस अभिवादन करतो. कारण या लोकांनी मानवतेवरचा आपला विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.


मेजर अनुज सूद

2 मे 2020 रोजी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चांगीमुल, हंदवाडा येथे झालेल्या  अग्नितांडवाशी लढणाऱ्या पाच सुरक्षा कर्मचार्‍यांमध्ये मेजर अनुज सूद यांचा समावेश होता. घरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी त्यांनी दहशतवाद्यांशी अतिशय धैर्याने लढा दिला व आपल्या प्राणांची आहुती दिली.

17 डिसेंबर 1989 रोजी जन्मलेले मेजर अनुज सूद हे कुटुंबाच्या दुसऱ्या  पिढीतील अधिकारी होते ज्यांना नेहमीच सशस्त्र दलात भरती व्हायचे होते.  शाळेत त्यांचे नाव "फौजी" असे होते.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ( IIT ) जाण्यासाठी त्यांची निवड झाली होती  पण अनुजने नेहमीच गणवेशात आपल्या देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले.  जे लोक त्याला दुरून ओळखत होते आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनाही असे वाटले की अनुज  एनडीएऐवजी आयआयटीत जाण्याचा निर्णय घेईल. परंतु जेव्हा त्याने एनडीएत जाण्याचे ठरवले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.  मेजर अनुज सर्व सहा पदांसाठी टॉर्च धारक होते.  पायदळाचा सैनिक म्हणून त्यांनी आय.आय.एस.सी. बंगळूर येथून एम.टेक केले आणि प्रथम स्थान मिळवले.

अनुजच्या वडिलांनीही भारतीय सैन्यात काम केले आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी आकृति यांनी असे म्हटले आहे की वेळ आली तर त्यांचे पती  आपल्या देशासाठी बलिदान देतील हे त्यांना नेहमीच ठाऊक होते.
आपल्या राष्ट्रासाठी केलेला सर्वोच्च त्याग भारत कधीही विसरणार नाही.  मेजर अनुज सूद यांचे शौर्य आणि धैर्य प्रत्येक मुलाला  स्वतः पेक्षाही राष्ट्राला प्रथम स्थान देण्यासाठी  प्रवृत्त  करायला प्रेरणादायक ठरणार आहे.  भावी पिढ्यांसाठी ते एक आदर्श आहेत. अशा देशभक्तांनी भारताच्या सीमेचे रक्षण केले यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत.

सोनू सूद

अभिनेता सोनू सूद कोरोनाव्हायरसच्या लॉकडाउन दरम्यान बर्‍याच जणांसाठी देवदूत बनला आहे.  स्थलांतरितांना सोनू सूद यांनी ज्या वेगाने मदत  केली आणि पाठिंबा दर्शविला ते अनुकरणीय आहे.  त्यांनी केवळ गरजूंना अन्न व इतर आवश्यक वस्तूच पुरवल्याच नाहीत तर अडकलेल्या प्रवासी मजुरांसाठी खास बस  सेवा आणि रेल्वे तिकिटांचीही व्यवस्था केली आहे .जेणेकरून या कठीण परिस्थितीत ते त्यांच्या घरी पोहोचू शकतील.

स्थलांतरित कामगारांनंतर, त्यांनी कोरोनाव्हायरस-प्रेरित निर्बंधामुळे गेल्या 4 महिन्यांपासून किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत केली.  त्यांनी स्पाइसजेटच्या सहकार्याने 1500 पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी सनदी उड्डाणे ( charter flights)पाठवली. केरळमधील अडकलेल्या 177 मुलींना भुवनेश्वरमधील त्यांच्या घरी पोहोचण्यासही त्यांनी मदत केली.
हा  खऱ्या आयुष्यातील हिरो आपल्या टीमसमवेत चोवीस तास कार्यरत आहे.  टोल फ्री क्रमांकासह त्याने कॉल सेंटर सुरू केले जेणेकरुन लोक लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत संपर्क साधू शकतील.

माणुसकी, करुणा आणि चारित्र्या विषयी बोलणाऱ्या  आपणा सर्वांसाठी सोनू सूदने खरोखरच एक आदर्श ठेवला आहे.  गरजूंना मदत करणे आणि एखाद्या कामासाठी स्वत: ला समर्पित करणे ही सर्वात उदात्त गोष्ट आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.

गुरतेज सिंग

23 वर्षांच्या  शिपाई गुरतेज सिंगने अलीकडेच झालेल्या चिनी  विरुद्धच्या  लढ्यामध्ये  हे सर्व  प्रतिकूल परिस्थितीत आपल्या शत्रूचा सामना केला.  पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील बीरेवाला गावातला गुरतेज सिंग डिसेंबर 2018 मध्ये सैन्यात दाखल झाले.

15 जून 2020 रोजी चार चिनी सैनिकांनी  गुरतेज सिंगवर हल्ला केला.  त्याने  त्यातील दोघांना भिरकावले. इतर दोघांनी त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने चौघांनाही त्याने  फरफटत खेचले आणि त्यांना ढकलून दिले.  मान आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असतानादेखील गुरतेज सिंगने स्वत: ला पुन्हा  लढाईत झोकून दिले  .त्याने आपल्या किर्पानचा वापर अधिकाधिक शत्रूंशी लढण्यासाठी केला.  आणि त्यानंतर त्याने चिनी सैनिकाकडून धारदार शस्त्र हिसकावून घेतले.

शिपाई गुरतेजसिंगवर पाठीमागून चाकूने वार करण्यापूर्वी त्याने 11 चिनी सैनिकांना ठार  केले.  पण शूर आणि अजिंक्य गुरतेजसिंगने धारातीर्थी जाण्यापूर्वी शेवटच्या 12 व्या शत्रूला त्याच्या किर्पानने ठार मारले.

त्यांच्या जन्मगाव गावात 'गुरतेज सिंग अमर रहे' आणि 'बोले सो निहाल सत श्री अकाल' च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या .  शूर वीर गुरतेज सिंगचे वडील म्हणाले की, "मुलगा गमावल्याच दुःख आहे, परंतु त्याने देशासाठी आपले प्राण अर्पण केले याचा मलाही अभिमान आहे."

इतर सर्व गोष्टींपेक्षा त्याने आपल्या कर्तव्याला प्रथम स्थान दिले . गुरतेज सिंग यांनी आपल्याला दिलेला हा एक मौलिक  आदर्श आहे.

प्रथम फळीतील कामगार

डॉक्टर आणि परिचारकांपासून सहाय्यक कामगारांपर्यंत कोविड 19 च्या या महामारी च्या  वेळी प्रथम फळीतले कामगार ज्या प्रकारचे सहाय्य देत आहेत आणि   आणि आपल्या कामांमधील लवचिकता  दाखवत आहेत हे  प्रशंसनीय आहे आहे.  ते नक्कीच कौतुक आणि अभिवादन करण्यासाठी पात्र आहेत.   सतत इतरांवर उपचार करण्याच्या प्रक्रियेत, त्यांच्यातील काहीजणांना विषाणूचा संसर्ग झाला आहे.  दुर्दैवाने त्यांच्यातील काहींचे निधनही झाले आहे.  परंतु त्यांच्या कर्तव्य पार पाडण्यात कोणत्याही गोष्टीमुळे अडथळा निर्माण झाला नाही.  या काळात ते राष्ट्राचे सैनिक म्हणून समोर आले आहेत.

त्यापैकी एक गुवाहाटी मेडिकल कॉलेजमधील डॉ. मालविका बर्मन आहेत.कोरोना रूग्णांवर उपचार करताना त्यांची स्वतःची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली. परंतु  यामुळे आपल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडणारी आणि आणि एकटी पालक  असलेल्या डॉ. बर्मन थांबल्या  नाहीत .  त्यांची तब्येत बरी होताच त्या  पुन्हा  रुग्णांवर  उपचार  करण्यासाठी  रुजू झाल्या.

देशातील विविध भागातील डॉक्टर आणि परिचारिका कोविड -19 शी लढण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहेत .सतत ड्यूटीवरच राहिल्यामुळे स्वतःच्या  कुटुंबाकडे  सुद्धा  त्यांचे दुर्लक्ष होत आहे .  घाबरलेल्या स्थितीत जेथे सर्व काही बंद झाले आणि प्रत्येकजण घाबरला होता, तेव्हा हे लोक रूग्णांना दाखल करून घेत होते, बेड वाटप करत होते, उपचार करत होते. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एक मिनिटही विश्रांती न घेता निस्वार्थ आणि अथक परिश्रमाने शांत करीत होते ,धीर देत होते.
त्यापैकी काहींनी तर  ही युद्धासारखी परिस्थिती असल्याचे सांगितले.  स्वत: च्या कुटुंबियांना धीर देऊन आणि इतर प्रत्येकाचे मनोबल उंच ठेवून एकामागून एक अवघड काम करत राहणारे हे प्रथम फळीतील कामगार देखील या कठीण काळातील देवच आहेत.


भारतीय रेल्वे

या महामारी दरम्यान भारतीय रेल्वेने ज्या प्रकारचे सहाय्य दर्शविले आहे ते कौतुकास पात्र आहे. रेल्वे मंत्रालयाने या साथीच्या आजाराचा सामना करण्याच्या लढाईत सरकारला मदत व पाठिंबा देण्यासाठी असंख्य उपाययोजना केल्या.

भारतीय  रेल्वेने आपले  सुधारित  कोच आयसोलेशन सेंटर आणि कोविड -19  केअर सेंटर साठी  आवश्यक सुविधा म्हणून उपलब्ध करून दिले आहेत.

भारतीय रेल्वेने दुर्गम भागात अन्न आणि इतर वस्तूंचे वितरण करून आपत्कालीन पुरवठा साखळी जिवंत ठेवण्यासाठी आपल्या विस्तृत नेटवर्कचा  वापर अतिशय शिताफीने केला आहे.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर उत्सव आणि उत्सव ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}