• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

गरोदरपणात गुळ ( Jaggery ) खाण्याचे फायदे आहेत का नुकसान ?

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 10, 2021

गरोदरपणात गुळ Jaggery खाण्याचे फायदे आहेत का नुकसान
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

गरोदरपणात गुळ ( Jaggery ) खाण्याचे फायदे आहेत का नुकसान ?

गरोदरपणात स्त्रीने काय खावं याकडे जास्त लक्ष दिलं जाते त्या मार्फत तीच्या आणि बाळाच्या आरोग्यास धोका तर नाही ना त्याची चाचपणी केली जाते गरोदरपणात स्त्रीने काय खावं आणि काय खाऊ नये हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. असाच एक पदार्थ म्हणजे गुळ होय. गुळ खाण्याने फायदा होतो का? गरोदर स्त्रीने साखरेऐवजी गुळ खावा का? जर गुळ खाल्ल्याने तर त्याचे तोटे होतात का? तोटे होत नसतील तर लाभ काय? असे नानाविध प्रश्न अनुत्तरीतच राहतात. आज आपण या लेखातून (blog) याच सर्व प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की गरोदर स्त्रीने गुळ खावा का? मला विचाराल तर नक्कीच खावा,तोटे तर अजिबात नाहीत पण गुळ कसा उपयुक्त आहे ते जाणून घेऊया.

1. वजन कमी करते - (weight control) गरोदरपणात वजन वाढीची समस्या उदभवते. गुळाचे सेवन यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गुळातील पोटॅशिअय (potyashiyam) संयुग वजन नियंत्रणात ठेवते.

2. अशक्तपणा दूर करते - (Stay fit) आपल्या शरीरातील आर्यनची कमतरता भरून काढते. बर्याच स्त्रीयाना वरून (supplement) टॅब्लेटस घ्याव्याच लागतात मात्र गुळ ही कमतरता भरून काढतो.

3. रक्तक्षयवर गुळ गुणकारी - (Anemia) गरोदरपणात स्त्रीयांना अॅनिमियाचा त्रास उदभवू शकतो. गुळाचे नियमित सेवन रक्तक्षय थांबवते आणि शरीरास बल प्रदान करते.

4. गुळातील नैसर्गिक घटक - (Jaggery natural resources ) गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.

5. त्वचेसाठी उपयुक्त - ( Lot off skin benefits ) जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात.

6. तापमान नियंत्रण - (Jaggery control body temperature) गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. उन्हाळ्यात गुळाचे सेवन नक्कीच करावे. उन्हा पासून बचाव ,अंगात शितलता नैसर्गिक रित्या निर्माण करण्याचे काम गुळ करते.

7. रोग प्रतिकारशक्ती वाढते - (Developed immunity factors) गुळात सेलेनिअम आणि झिंक यासारखे (antioxidants) रोग प्रतिकारक गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात हे शरीराला फ्री रेडिकल्स आणि संसर्गजन्य रोगापासून बचाव करतात.

8. पंचनशक्ति वाढवते - (Improve digestion system) गरोदर स्त्रियांना नेहमीच उदभवणारी समस्या ती म्हणजे बुध्दकोष्ठता यावर रामबाण उपाय गुळ आहे. पंचनशक्ति सुधारते आणि भुख लागण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी गुळाचे सेवन उपयुक्त आहे. आरोग्यदायी लाभ माहीत आहेत का, जाणून घ्या

9. हाडं आणि मांसपेशीसाठी पोषक - (Bones & muscles benefit) गरोदरपणातील गुळाच्या सेवनाने बाळाची त्वचा, केस आणि अन्य अवयवांवर आश्चर्यकारक चांगला परिणाम होतो म्हणून गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात.

  • टिप :- विशेष म्हणजे यामध्ये फॅट्स अजिबात नाहीत. यामुळे गरोदरपणात फिट राहण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देखील देतात. ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}