• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
पालक

छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तीमहत्त्व विकास आणि आई जिजाबाई

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 07, 2021

छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तीमहत्त्व विकास आणि आई जिजाबाई

तस पाहिलं तर प्रेत्यक स्त्री एक आदर्श माता बनण्याचा प्रयत्न करते जर प्रेरणा मिळाली तर जिजाबाई सारख्या व्यक्तीमहत्त्वाची तर गरोदरपण आणखी आनंददायक होईल नाही  का !!

डोहाळे गीत(Songs in pregnancy) :-

श्री भवानी मातेनें वर हा दिधला म्हणूनिया दिवस हा आला

मज वाटतसे आज पासूनी आपुला भाग्योदय खचितचि आला

तव मुखचंद्र प्रिये अशा या समयाला बहु खिन्न कशानें झाला

तव मनीं काय आवडतें , तव चित्त कशावरि जडतें , जरि असें फार अवघडत

पुरवीन तरी सांग मला तव चित्तीं जे सर्व मनोरथ असती

निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती

म्हणे जिजाई आवड स्वातंत्र्याची मज नको बेडी पारतंत्र्याची

हा विप्रछळ मज पहावेना , पारतंत्र्य मला सहवेना , मृत अन्न गोड लागेना

परदास्यानें मिळविलेली संपत्ति मज वाटे केवळ माती

निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती

मज वाटतसे तलवार ढाल घेवोनी निज घोड्यावर बैसोनी

या कामीं मरण जरी येई , तरी मला सुखदचि होई , या खेरीज इच्छा नाहीं

हे डोहाळे ऐकुनि शहाजी म्हणती बाळ हे करील बहु कीर्ति

निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती

महाराष्ट्राला सौभाग्याचे दिवस दाखविणार्‍या छत्रपति शिवाजी महाराजांच्या परमपूज्य मातोश्री जिजाबाई यांचें मनोगत व्यक्त करणारें हें डोहाळे गीत आहे . शिवाजी हा पराक्रमी पुत्र व्हावा म्हणून त्याच्या भाग्यशाली आईनें प्रकट केलेली ही इच्छा मराठी मनाला स्फूर्ति देणारी आहे . मराठ्यांच्या इतिहासाची बैठक या गाण्याच्या निमित्तानें समाजापुढें आलेली आहे . मोंगली अंमलाचा व सत्तेचा कंटाळा आलेल्या व परतंत्र्यांतून स्वराज्य निर्मितीकडे धांवणार्‍या जिजाऊच्या मनांतील ही भावना हृदयाला जाऊन भिडणारी आहे . पराक्रमी मातेची ही भाषा त्यामुळेंच स्त्रियांना आवडीची झाली आहे . माझा मुलगा शिवाजीसारखा पराक्रमी व्हावा असें प्रत्येक स्त्रीला वाटावें , एवढी ईर्षा या गाण्यानें निर्माण होते . त्यामुळेंच या गाण्याची योजना डोहाळेगीतांत जरूर केली जाते व स्त्रिया आवडीनें तें म्हणतात ही .

अशा प्रकारचीं डोहाळे गीतें आणखी पुष्कळ असतील . पण मला जीं मिळालीं आहेत त्यांचें सौंदर्य असें आहे . गर्भार्शीला भरपूर उत्साह देणारीं व भावी मुलाचा आदर्श मनासमोर उभा करण्यास समर्थ असलेलीं हीं गीतें आहेत . त्यांच्यामध्यें पराक्रम आहे , स्फूर्ति आहे , इतिहास आहे , कौतुक आहे , उत्तेजन आहे , सारें कांहीं आहे . त्यामुळें ज्या त्या घराण्याच्या पद्धतीप्रमाणें सजविलेल्या आसनावर अभिमानानें बसणार्‍या गर्भार्शीला त्यांच्या श्रवणानें निश्चित आनंद होतो . मनांतील संकोच नाहींसा करून ती आपल्या भावी मुलाचें चित्र मनासारखें रंगविण्यांत गुंगून जाते . आपल्या आवडीच्या पदार्थांचें सेवन करतांना अशावेळीं या गीतांतील सुंदर आणि मंगल भावनांची पोंच आपल्या पोटांतील बाळाच्या रक्तामध्यें होऊं दे अशी तीव्र इच्छा तिच्याठायीं निर्माण होते ; व त्या आनंदांतच ती सर्वांशीं खुल्या दिल्यानें वागून होणार्‍या कौतुकाचें सहर्ष स्वागत करते .

आरोग्य विकास(Health development):-

 • आरोग्य विकासासाठी जिजाऊ  वाचन,लेखन,मानसिक जपणूक करायच्या त्या सर्व कारभारात सहभागी शिकण्याची संधी सोडायच्या नाहीत
 • जिजाबाई स्व कर्तृत्व जोपासना करणार्या होत्या आणि दुसर्यानेही ते आत्मसात करावे असा अट्टाहास कायम असे त्याच का कारणाने हे गुण शिवाजी महाराजात आपसुक आले.

व्यक्ती , व्यवहार आणि प्रकृती(Individual dealings and nature):-

यातील समन्वय कसा साधावा हे जिजाऊ कडून शिकण्याची कला. व्यक्ती, व्यवहार आणि प्रकृती ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी त्यात किती केव्हा कसा प्राधान्यक्रम दिल्यास प्रगती साधली जाते हे त्यानी अंगीकारले होते. याचे धडे छत्रपतीना घरातच मिळाले. 

आरोग्य, खेळ, प्राणायाम(Health sports and pranayama):- 

जिजाबाई उत्तम घोडेस्वार , तलवारबाज होत्या याद्वारे आरोग्य आपोआप जपले जायायचे. या सर्वांचा फायदा शिवाजी महाराजांच्या जडणघडणे वर झाला. लहान वयातच त्यानी हे गुण आई कडून आत्मसात केले.

व्यक्तिमत्वात जादु आणि शिकवण (Teaching magic and teaching the importance of personality):- 

आई जिजाऊची अशी शिकवण होती शिवाजी महाराजांना कि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्याला हसत हसत आनंदाने सामोरे जाणे आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम करावे. 

ध्यानी मनी आनंदी जागर(Happy awakening in the mind of meditation):-

आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला शिवाजी महाराज कधीही घाबरायचे नाही. भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी-मनीही नसण्याचे कारण आई जिजाबाईचे संस्कार. एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची, याचे व्यवस्थापन चोख करायचे नियोजन करणे, त्याची अमंलबजावणी आणि ध्यानी, मनी आनंदी वृत्तीचा जागर हे जिजाबाई चे प्रतिबिंब 

आदर्श माता(Ideal mother):- 

जिजाई हे खुद एक प्रेरणास्त्रोत असतां शिवाजी सारखा आदर्श पुत्र निर्माण होणारच होते

शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एखाद्या आख्यायिकेसारखे भासते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही निराश न होता महाराजांनी असे पराक्रम करून दाखवले आहेत, जे केवळ ऐकल्यामुळे अनेकांच्या भुवया आजही उंचावतात. महाराजांची मानसिक ताकद पराकोटीची होती. कितीही संकटे आली, तरी त्यांनी शांत राहून त्यातून मार्ग काढला. सकारात्मक गोष्टींचा आग्रह धरला. यास जिजाऊ सारखी आई लाभणे

सकारात्मकतेचा प्रेरणास्त्रोत(Inspiration for positivity):-

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी

शिवाजी महाराजांची राहणी एकदम साधी होती कारण . स्वारीला गेल्यावर महाराज साध्या तंबुत राहत होते. एवढे अधिकार, एवढे वैभव असूनही महाराज साधेपणाने वागायचे. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज प्रोत्साहन द्यायचे, त्यांचं मनोबल वाढवायचे, त्यांना प्रेरित करायचे, उत्साह वाढवायचे. महाराज कधीही चिंतेत राहायचे नाहीत. सकारात्मकतेचा प्रेरणास्त्रोत असलेल्या महाराजांमुळे सर्वांमध्ये एक वेगळी उर्जा यायची. प्रत्येक मावळ्याचे शिवाजी महाराज आदर्श होते.

ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

pic. credit- https://www.google.com/url?sa=i&url=https%3A%2F%2Fenglish.newstracklive.com%2Fnews%2Frajmata-jijabai-death-anniversary-love-life-age-birth-son-name-husband-name-mc23-nu612-ta612-ta277-1100322-1.html&psig=AOvVaw3jZhurXfJdUif3S3818GhQ&ust=1623155365228000&source=images&cd=vfe&ved=0CAMQjB1qFwoTCJDSqY3DhfECFQAAAAAdAAAAABAJ

 • 3
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| Jun 07, 2021

Super 👍👏👏

 • Reply
 • अहवाल

| Jun 07, 2021

खूप छान 👍💐💐

 • Reply
 • अहवाल

| Jun 07, 2021

Khupch sundar👌

 • Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा

वर पालक ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}