• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

कोरोना व्हायरस: रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने काय म्हटले आहे ?

Tejashri Askar
गर्भधारणा

Tejashri Askar च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Apr 15, 2020

कोरोना व्हायरस रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने काय म्हटले आहे
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

14 एप्रिल रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी देशातील जनतेला संबोधित केले. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, 25  मार्चपासून देशात जाहीर केलेले लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवन्यात येत आहे. पहिल्या लॉकडाउनची शेवटची तारीख 14 एप्रिल होती. याचवेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी जनतेला सात सूत्रे दिली, ज्यांचे त्यांनी सप्तपदी असे वर्णन केले. या सप्तपदीतील तिसरा मुद्दा सांगण्यात आला की, आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या निर्देशांचे अनुसरण करा. ज्यात कोमट पाणी तसेच काढ्याचे सेवन करण्यास सांगितले आहे .

आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या सूचना दिल्या आहेत याबद्दल अधिक माहिती  जाणून घेऊया-

# 1.  आयुष मंत्रालयाने आहारशास्त्र, पोषण आणि रोग प्रतिकारशक्तीवर ऑनलाइन अभ्यासक्रम जाहीर केला असून याची सुरुवात 20 एप्रिलपासून होणार आहे. या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी तुम्ही येथे क्लिक करून नोंदणी करू शकता. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल आहे.

# 2.  आयुष मंत्रालयाने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते, की आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दिवसातून कमीत कमी एक वेळा 3 ते 5 ग्रॅम खामिरा मारवाडीद घ्यावी.

# 3. योगासनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतात. कर्नाटकच्या स्वामी विवेकानंद योग संशोधन संस्थेने याबाबत योग प्रोटोकॉल तयार केला आहे. जो आपण हा व्हिडिओ पाहून शिकू शकता.

# 4. 31 मार्च रोजी आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय योजनांची माहिती दिली. ज्यामध्ये पुढील बाबींचा सामावेश केला गेला आहे - 

सामान्य उपाय

- दिवसभर गरम पाणी प्या.

- दररोज घरी कमीत कमी 30 मिनिटे आसन, प्राणायाम आणि ध्यान करा.

- स्वयंपाकामध्ये हळद, जिरे, धणे, लसूण अशा मसाल्यांचा वापर करा.

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

- दिवसातून एक ते दोन वेळा तुळस, दालचिनी, मिरपूड, सुंठ आणि मुन्कापासून बनवलेला काढ़ा / हर्बल टी घ्या. आवश्यकता असल्यास त्यात चवीनुसार गूळ किंवा ताज्या लिंबाचा रस घाला.

- दररोज सकाळी 1 चमचा किंवा 10 ग्रॅम च्यवनप्राश घ्या. मधुमेह असलेल्या लोकांनी साखर मुक्त च्यवनप्राश घ्यावे.

- गोल्डन दूध - 150 मिली उबदार दुधामध्ये अर्धा चमचा हळद घालून हे मिश्रण दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्या.

काही अत्यंत सोप्या आयुर्वेदिक प्रक्रिया

1.नाका संबंधी : सकाळी आणि संध्याकाळी नाकामध्ये तीळाचे तेल, नारळाचे तेल किंवा तूप लावा.

2.तेल पुलिंग थेरपी: 1 चमचा तीळाचे किंवा नारळाचे तेल तोंडात घेउन ते न पिता 2 ते 3 मिनिटे तोंडात फिरवावे आणि थुंकावे. यानंतर तोंड कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही हे दिवसातून एकदा किंवा दोनदा करू शकता.

पुढे दिलेल्या गोष्टी देखील लक्षात घ्या –

जर आपल्याला कोरडा खोकला झाला असेल किंवा घशात खवखवत असेल तर काय करायला हवे ?

  1. पुदिन्याची ताज़ी पाने किंवा ओवा वापरून दिवसातून एकदा तरी वाफ घ्यावी.

  2. जर खोकला किंवा घशात जळजळ जाणवत असेल तर गुळ किंवा मधात लवंगाची पावडर मिसळवून दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकता.

हे उपाय करताना लक्षात घ्यावे की हे कोरोना दूर करण्यासाठीचे उपाय नाहीत. जर आपल्याला कोरोना विषाणूची लक्षणे दिसली तर लवकरात लवकर तपासणी करा. 

आयुष प्रणाली ही पारंपारिक भारतीय आरोग्य पद्धतींवर आधारित आहे. आयुष मंत्रालयाशी येथे संपर्क साधता येईल.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}