• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
बाळ काळजी

लहान बाळाचे नेहमीचे आजार

Canisha Kapoor
0 ते 1 वर्ष

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Nov 23, 2018

लहान बाळाचे नेहमीचे आजार

उलटया, जुलाब, ‘दुखी’ सर्दी, खोकला, दमा, ऍलर्जी हे आजार 0-1 वर्ष वयोगटातील शिशूना फार वेळा हैराण करतात. अगदी किरकोळ तक्रारी वाटल्या तरी त्यामुळं त्यावेळी बाळाला आणि पालकांनाही होणारा त्रास खूपच असतो. आजार झाले तर लगेच आराम पडण्यासाठी काय करायला हवं, डॉक्टरांना लगेच दाखवणं केव्हा जरूरी आहे हे समजवून घेणे महत्वाचे आहे.

जुलाब होण्याची कारणं वेगवेगळे असु शकतात. १ महिन्याहून लहान मुलांच्या जुलाबांबद्दल पूर्वी आलंच आहे. पहिल्या ४-५ दिवसातच मुलाला हिरवट, पातळ जुलाब होऊ लागतात. हे जुलाब ४-५ दिवसात आपोआप थांबतात. अशा जुलाबांमध्ये मुलाचं पिणं चांगलं चाललेलं आहे ना व त्याचं वजन कमी होत नाही ना इकडं लक्ष द्यावं ते व्यवस्थित असलं म्हणजे काहेच काळजीचं कारण नाही. औषधं देण्याचही जरूरी नाही. या नंतरच्या काळात (तीन ते सहा महिने) नवनवीन खाद्यपदार्थमुळं वेगवेगळ्या रंगरूपाची शी होत रहाते. त्यासाठी थोड्या निरीक्षणाची आणि अभ्यासाची जरूरी असते. काय खाऊ घातल्यामुळं कशी शी झाली याकडं नुसतं लक्ष ठेवावं पातळसर शी होणं हे दरवेळी पोट बिघडल्याचं लक्षण नसतं. याची मनात नोंद ठेवत गेलं की बर्‍याच काळज्या मिटत जातात. ६ महिन्यानंतरच्या जुलांबांबद्दल (दातांची काळजी या भागात) पूर्वी आलंच आहे. मूल वरचेवर अस्वच्छ पदार्थ तोंडात घालून गिळत असतं. जसजशी मुलाची प्रतिकारशक्ती वाढेल तसतसे असे पदार्थ पोटात गेले तरी त्यापासून जुलाब होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. मग ते जवळ जवळ कायमचे थांबतात.

जंतुजन्य जुलाब किंवा उलटयांच्या आजारात मुलाच्या तब्येतीवर आणि लक्षणांच्या तीव्रतेवर जुलाबांचे उपचार ठरतात. मुलाला नुसते जुलाब होत असले तर तोंडानं मीठ, साखर, लिंबू, पाणी मिश्रण, नारळ पाणी, रसाची सरबत, भाताचे पेज, असे द्रव पदार्थ देत राहिलं तर डीहायड्रेशन (शुष्कता) होण्याचा धोका कमी होतो.

मुलाला खूप जुलाब, उलटया होत रहाणं, त्यानं तोंडानं काही घ्यायला नकार देणं, लघवीचं प्रमाण कमी होण, टाळू खोल जाणं, डोळे खोल जाणं, जीभ कोरडी पडणं, किरकीर वाढणं आणि मलूल होणं या गोष्टी धोक्याच इशाराच देतात. अशा वेळी विशेष औषधं यांची जरूरी असते.
 

 1. एक वर्षानंतरच्या उलटया, जुलाब, पोट बिघडणे: मुलाचं पोट बिघडलंय असं लक्षात आल्यावर मुलांच्या खाण्याची नोंद पालकांनी घेतलेली असावी. अपचन होण्याची मुख्य कारणं म्हणजे जास्त किंवा एकत्रित खाणं. मुलाला डीहायड्रेशन कसं होणार नाही हे पाहिलं म्हणजे पुरतं. पदार्थाचा निचरा झाला की हे जुलाब आपोआप थांबतात.
   
 2. सर्दी, खोकला, ताप: वरचेवर होणाऱ्या या किरकोळ आजारानं दोन तीन दिवस का होईना पण मुलं हैराण होतात. हा आजार विषाणू मुळे ऋतुबदल होतांना होतो. २-३ दिवसांच्या त्रासानंतर आपण होऊन हा आजार आटोक्यात येतो. मात्र औषधांच्या मदतीनं यात होणारे त्रास कमी करता येतात.
   
 3. लहान मुलांमध्ये कांजिण्या, गोवर आणि तत्सम आजारांची सुरूवात सर्दी ताप खोकल्यानं होते. अंगावर विशिष्ट प्रकारची पुरळं उठतात. आणि इतर लक्षणंही दिसू लागतात. मुलांना सर्वच आजारात विश्रांतीची जरूरी नसते. पण मूल बिछान्यात पडून राहू लागलं की काहीतरी काळजी करण्यासारखं नक्कीच आहे असं समजावं. यासाठी अधिक काळजी घेण्याची व जलद उपचारांची जरूरी असते.
   
 4. तापासाठी किंवा दोन्ही नाक चोंदल्यास फारच त्रास होत असल्यास नाकात टाकण्याचे थेंब, सर्दी खोकल्याची नेहमीची औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानं नेहमी घरी ठेवून कोणत्या प्रमाणात कशी वापरावीत हे माहिती करून घ्यावं आणि त्यानुसार प्रथमोपचार म्हणून घरी वापरावीत.
   
 5. औषधांचा वापरही अगदी क्वचित करावा. बाळाच्या तब्येतीतल्या चढ उतारांकडं, नवीन येणार्‍या लक्षणांकडे नीट लक्ष देत रहावं आणि असं काही आढळल्यास लगेच डॉक्टरांच्या निदर्शनाला आणून द्याव.
   
 6. दुखी: अनेक प्रकारच्या ‘दुखी’ मुळे शिशू हैराण होतात. दुखीचे प्रकार अनेक असले, त्याची कारणं अनेक असली तरी सर्वांवर प्रथमोपचार एकच आहे. मुलांच्या सर्दीबरोबर कानदुखी, वाढीच्या वयातली पायदुखी या नेहमी येणाऱ्या तक्रारीसाठी औषधं घ्यावीत. जर दुखणं वाढलं तर मात्र डॉक्टरांना दाखवायला हवं.

पोटदुखीचं, डोकेदुखी, मानदुखी कडे मात्र थोडंसं जास्त काळजीपूर्वक पहावं लागतं. औषधं देऊनही परत दुखत असलं तर डॉक्टरांना लगेच दाखवावं.

 • टिप्पणी
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}