• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

बाळंतपणानंतर बेढब (लुझ) झालेले स्तन कसे सुडौल कराल : जानूया घरगुती ९ उपाय

Sanghajaya Jadhav
0 ते 1 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Dec 02, 2021

बाळंतपणानंतर बेढब लुझ झालेले स्तन कसे सुडौल कराल जानूया घरगुती ९ उपाय
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

प्रत्येक महिलेला आपले स्तन हे आकर्षक आणि सुडौल असावेत हे अपेक्षित असते पण गर्भारपणा नंतर ते बेढब ,खाली ओघळलेले दिसतात , यामुळे कोणतेही कपडे परिधान करताना त्याचा आकार विकार बिघडलेला दिसतो यातुन आत्मविश्वासाची कमतरता अनेक महिलांना जाणवते. यासाठी त्या विविध अंगी प्रयोग करताना दिसतात निरनिराळे लोशन ,क्रीम , गोळ्या , औषधाचा वापर सर्रास करतात. येथे मी तुम्हास सहज , सोपे , साधे उपाय तुम्हा सर्वा सोबत शेयर करणार आहे.

या उपायांनी तुम्हास नक्कीच मदत होणार आहे. 

१) अंड्याचा पिवळा बल्क आणि काकडीचा रस :
अंड्याचा पिवळा बल्क आणि काकडीचा रस हे एकत्र करून पेस्ट तयार करा आंघोळी पुर्वी २० मिनिटं लावून ठेवा सुकल्यावर कोमट पाण्याने धुऊन काढा हा उपाय स्तनांना सुडौल बनवतील हा उपाय दररोज दोन महिने केल्यास फरक लगेच जाणवेल.  

२) मसाज 
हा साधा , सरळ आणि योग्य लाभ कारक उपाय.मसाज कोणत्याही तीळ , खोबरेल ,व्हिटॅमिन इ असलेल्या तेलाने किंवा मॉइश्चरायझर मालिश केल्यास याचा उपयोग जरूर होतो.गोलाकार पद्धतीने हाताने स्तनांना मालिश करा. साधारण 10 मिनिट्स मालिश करा आणि असं तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता. यातुन स्तनामध्ये मसाज केल्यामुळे रक्तप्रवाह अतिशय सुरळीत होतो आणि हार्मोन्सचा विकासीत व्हायला चालना मिळते.

३) नियमित व्यायाम
भुजंगासन , गोमुखासना ,भ्रस्रिका प्राणायाम या आसनांमुळे स्तनांजवळील स्नायू प्रसरण पावतात आणि स्तनाना ताठरता यायला सुरुवात होते बांधेसूद पणा शरीरात निर्माण होतो.  व्यायाम नियमित केल्यास अनेक शारीरिक तक्रारी पासुन मुक्तता मिळते. जिम मध्ये हि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने (तुम्ही पुशअप्स करू शकता) किंवा जीम ट्रेनर च्या मदतीने छातीचा आकार डेव्हलोप करू शकता यासाठी चांगला जाणकार ट्रेनर निवडावा.  

४) मसूर डाळ ची पेस्ट 
मसूर डाळ पाण्यात २० मिनिटे किंवा चांगली भिजे पर्यन्त भिजवून ठेवा नंतर या डाळीला मिक्सर मधून काढा याची पेस्ट हलक्या हाताने स्तनाना लावा सुकल्यावर कोमट पाण्याने धुऊन काढा जास्त रगळण्याची गरज नाही या डाळी मध्ये स्तनांना उपयुक्त असणारे हार्मोन्स असतात. या उपायाने तुम्हाला स्तनांमधील फरक १५ दिवसात जाणवेल. तसेच स्तनाची पोत हि सुधारलेली दिसेल. 
 
५) दुध,दही ,पनीर ,चीझ  : 
या दुधजन्य प्रॉडक्ट ने स्तनाचा आकार योग्य करण्यास मदत होते हे अनेक पोषक तत्वांनी युक्त आहे आणि आपल्या शरीराला पोषक तत्त्वांची गरज असते. आपल्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी हे पदार्थ खुप फायदेशीर आहेत. तसेच सोया मिल्क ,कोकोनट मिल्क यानेही फायदा होतो हे रोजच्या आहारात आवश्यक घटक म्हणुन डाएट मध्ये जरूर आसु द्यावे.

) मेथी
मेथी एक परंपरागत सर्वमान्य आयुर्वेदिक औषध. महिलांच्या स्तनांचा आकारावर परिणाम कारक काम मेथी दाणे बी करतात. यात उपलब्ध असणाऱ्या फायटोस्टेग्रन्समुळे आणि प्रोजेस्टोरॉनच्या उत्तेजनामुळे स्तन वाढण्यास मदत होते. याकरीत तुम्ही मेथीच्या पावडरमध्ये पाणी घालून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या स्तनांवर लावा. साधारण 15 मिनिट्सनंतर तुम्ही स्तनांवरील पेस्ट धुवा. असं तुम्ही दिवसातून दोन वेळा करा आणि काही दिवसांतच याचा परिणाम नक्की दिसून येईल.

७) शतावरी पावडर
बाळंतपणानंतर नक्कीच सेवन केलेलं,शतावरी हि प्रत्येक महिलेचे जाणते औषध. शतावरी महिलांच्या बऱ्याचशा समस्यांवर गुणकारी उपचार करते. महिलांचे स्तन वाढण्यास शतावरीची मदत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप दुधातून 3 ग्रॅम शतावरी पावडर घालून दूध प्या. साधारण दोन महिने असं रोज केल्यास, तुम्हाला तुमच्या स्तनांमधील फरक जाणवेल.

) सुकामेवा 
प्रतिकार शक्ती सुधारण्याचे काम सुकामेवा करते यात बदाम ,काजु ,आक्रोड , अंजीर, पिस्ता, चारोळ्या, खारीक, खजूर, मनुका या मार्फत आपण स्तनां मध्ये परिणाम कारक बदल घडतो. यासाठी रोज पहाटे उठल्या वर रात्र भर भिजवून ठेवलेले सुकामेवा खावा. 

9) कृत्रिम उपाय 
तुम्ही सहज उपलब्ध होणाऱ्या पुशअप ब्रा वापरू शकता. त्यातुन तुम्ही तुमच्या स्तनाचा आकार मोठा दर्शवू शकतात. पॅडेड ब्रा च्या माध्यमातून तुमचे छोटे स्तन लपवू ठेऊ शकता दुसरा उपाय हा कि ब्रेस्ट शस्त्रक्रिया करून तुम्ही स्तनाचा आकार वाढवता येतो तो हि हवातसा पण हि शस्त्रक्रिया खार्चिक असते सामान्यांना न परवडणारी. 

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}