अढळ मराठी मनाचा,मराठी माणसाचा आपला महाराष्ट्र दिन

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Apr 30, 2022

"बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा"
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्रात मोठया जल्लोशात साजरा केला जातो शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो.विविध ठिकाणी कार्यक्रम, सभा, भाषणे आणि इतरत्र मोठया उत्सवात साजरा केला जातो. या दिनी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस म्हणून ही साजरा केला जातो तसेच महाराष्ट्र दिनी विविध अंगी उपक्रम हाती घेतले जातात.
- १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे.
- हा दिवस मराठी जनमाणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
- महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
इतिहास
- इतिहास पडताळून पाहता असे निदर्शनात येते की काही वर्षा पुर्वी म्हणजे २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती.आपल्या मुंबईला महाराष्ट्रा पासुन वेगळं केलं जातंय या विचारांनीच लोक बिथरली होती. ठिकठिकाणी छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. महाराष्ट्रातील सर्व संघटना एकवटल्या आणि या संगठनानी कामगारांचा एक विशाल मोर्चा घेऊन सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे ठरवले.
- एकीकडे सरकार तर त्याविरोधात असंख्या जनसमुदाय त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ मराठी माणसापुढे पोलिसांचे एक ही चालले नाही आणि त्यामुळे पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.
- या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने माघार घेतली १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली गेली. त्यानंतर आंदोलन कर्त्यांच्या सन्मानार्थ इ.स. १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
१ मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने सुध्दा आतिशय महत्वाचा आहे. महाराष्ट्र दिनाबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. आणखी असे की या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणूनही जगभर मान्यता मिळाली आहे.
भारतात पहिल्यांदाच लाल झेंडा कामगार दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला. भारतात कामगार दिनाची पाळेमुळे १९२३ सालापर्यंत मागे जातात. भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ने १ मे १९२३ रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला होता.
१ मे ला महाराष्ट्र दिन का म्हणतात हे तर आपल्या प्रत्येकालाच माहित असतं, पण कामगार दिनाबद्दल फारच कमी माहिती असते.
कामगार दिनाबद्दल आज याबद्दल थोडक्यात जाणुन घेऊया
- औद्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला, पिळवणूकीला सुरुवात झाली. त्यावेळी कामाचे तास हे तब्बल १५ तास होते. कामगारांचं जीवन हलाखीचं होतं, त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे. कामगारांच्या अशा परिस्थितीतूनच पुढे जगाचा इतिहास बदलला.
- कामगारांची पहिली मागणी होती ८ तासांच्या कामाची. पुढे चळवळीलाही ‘eight -hour day ' या नावाने ओळखलं जाऊ लागलं. अशी पहिली मोठी चळवळ उभी राहिली ऑस्ट्रेलिया मध्ये. २१ एप्रिल १८५६ रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियामध्ये २१ एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
- अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर १९८० ला १ मे रोजीच कामगारांचं आंदोलन यशस्वी झालं. योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि ८ तास काम या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून अमेरिकेत हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मे दिन पण म्हटलं जातं.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.