• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
बाहेरची क्रियाकलाप आणि कार्यक्र

पुण्य नगरीत १३ मे तर देवभुमी नाशकात १९ मे ला झिरो शॅडो डे

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित May 03, 2022

 पुण्य नगरीत १३ मे तर देवभुमी नाशकात १९ मे ला झिरो शॅडो डे
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

असं म्हणतात की आपली सावली आपली साथ कधीच सोडत नाही पण या में महिन्यात याची प्रचिती "याची देही याची डोळा" खेळ सावल्याचा बघायला आपल्या लहानग्यांना मिळणार याला शून्य सावली दिवस असेही बोलतात. आबालवृद्धांना महाराष्ट्रात येत्या ३ ते ३१ मे पर्यंत असे शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहेत. राज्यातील विविध शहरे व ग्रामीण भागात हा अनुभव दरदिवशी घेता येईल, अशी माहिती चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

  • देवभुमी नाशकात १९ मे ला हा अनुभव बघावयास मिळणार
  • तर आपल्या पुण्य नगरीत १३ मे झिरो शॅडो डे अनुभवतील 

विज्ञानाच्या परिभाषेतुन 

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज ०.५० अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. महाराष्ट्रात तीन ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे तीन मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १५.६ अक्षांश ते धुळे जिल्ह्यात २१.९८ अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे.

  • एका अक्षांशवर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशी शून्य सावली दिवस येतात.
  • महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी बारा ते १२.३५ दरम्यान सूर्य निरीक्षण करावे.
  • समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळय़ा जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

कोणत्या दिवसी - शहर (गावं) 

३ मे – सावंतवाडी, शिरोडा, मांगेली, खूषगेवाडी
४ मे – मालवण, आंबोली
५ मे – देवगड, राधानगरी, रायचूर
६ मे – कोल्हापूर, इचलकरंजी,
७ मे – रत्नागिरी, सांगली, मिरज
८ मे – कऱ्हाड, जयगड, अफजलपूर
९ मे – चिपळूण, अक्कलकोट
१० मे – सातारा, पंढरपूर, सोलापूर
११ मे – महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई
१२ मे – बारामती, बार्शी, उस्मानाबाद
१३ मे – पुणे, मुळशी, दौड, लातूर, लवासा, असरल्ली
१४ मे – लोणावळा, अलिबाग, दाभाडे, पिंपरी-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई,
१५ मे -मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्धी, सिरोंचा
१६ मे – बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायण गाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड,
१७ मे – नालासोपारा, विरार, आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली,
१८ मे – पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा
१९ मे – औरंगाबाद, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी
२० मे – चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल
२१ मे – मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना,
२२ मे – मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी
२३ मे – खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड
२४ मे – धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर
२५ मे – जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा
२६ मे – नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा
२७ मे – नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक
२८ मे – अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड,
२९ मे – बोराड, नर्मदा नगर,
३० मे – धाडगाव
३१ मे – तोरणमाळ. (साभार - मराठी विज्ञान परिषद.)

नुकत्याच शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत त्यात हा कुतूहलाचा प्रसंग तुम्ही तुमच्या मुलास सांगु शकता त्याच्या काल्पनिक विश्वाला चालना देऊ शकता त्याच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पालक म्हणून तुम्हास टिपता येईल आणि हो तुमच्या मुलांना हा उपक्रम नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. 

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • 2
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| May 06, 2022

I like the information

  • Reply | 1 Reply
  • अहवाल
+ ब्लॉग लिहा

वर बाहेरची क्रियाकलाप आणि कार्यक्र ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}