• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
उत्सव आणि उत्सव

मातृदिन-२०२२

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित May 07, 2022

मातृदिन २०२२
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

आई होणे किती कठीण असते हे जेव्हा मी स्वतः आई झाले तेव्हा कळले!!  खरेतर, ही कदाचित जगातील सर्वात आव्हानात्मक भूमिका आहे. आई होणे हा आईचा दुसरा जन्म , कदाचित स्त्रीच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण आहे, काहीसा वास्तविक ,खंडतर चढउताराच्या अनुभवांसह एक विशेष प्रवास आहे. 

आई ही कुटुंबाचा आधार आहे असते -

जी कुटुंबाला एकत्र ठेवते, परंतु, दैनंदिन जीवनाच्या धावपळीत आपण तिला थँक यू म्हणायला विसरतो!

आत्ताच्या मोबाईल भाषेत बोलायचं झालं तर आई हे घरातील क्यु र कोड जनरेटर  (qr code generator) तसेच येथे मला सांगावस वाटतं आई ला कोणतीही उपमा आपण देऊ शकत ती स्वतः प्रगल्भ चालती फिरती कार्यशाळां आहे.   

मातृदिनाची माहिती

असं म्हणतात की मातृदिन चा इतिहास ग्रीसशी देशासी निगळीत आहे. ज्याला यूनान असेही म्हणतात. इतिहासा नुसार , त्या काळी ग्रीक देवतांच्या आईचा केवळ आदर केला जात नव्हता तर दैवत समजले जाई त्यांची पूजा देखील केली जात होती. तेव्हा पासून परंपरागत हा दिन रूढ झाला. ही माहिती गृहीतकांवर आधारित आहे.

अँना जार्विस 

मदर्स डे ची सुरुवात एका महिलेने केली असे मानले जाते. अँना जार्विस असे या महिलेचे नाव होते. तिच्याबद्दल असे म्हटले जाते की, तिचे तिच्या आईवर खूप प्रेम होते आणि जेव्हा तिचे निधन झाले तेव्हा तिच्या आईबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची सुरुवात केली गेली.

मदर्स डे ची कल्पना

 १९०८ च्या सुमारास मदर्स डे साजरा करण्याची कल्पना आली. परंतु १९१४ च्या सुमारास हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. आधुनिक जगाविषयी सांगायचे झाले तर मदर्स डे पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला.

तारणहार माझी माय 

मातृदिन हा वर्षातील सर्वात गोड कार्यक्रम नाही का? जेव्हा तुम्हाला शक्य तितक्या भव्य पद्धतीने 'धन्यवाद, आई' ला देण्याची संधी मिळेल. आई हे एक दैवत आहे? ती एक काळजीवाहू, संरक्षक, प्रदाता आणि बहुतेक परिस्थितींमध्ये आमची तारणहार आहे! लोकांशी व्यवहार करण्यापासून, जीवनातील आव्हाने शिक्षित करे प्रयन्त , तुमच्या भागीदारांशी व्यवहार करणे, कामाच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितींना सामोरे जाण्यापर्यंत, ती आम्हाला चांगले मानव कसे बनवायचे हे शिकवते. आणि बदल्यात काहीही न मागता ती हे सर्व करते. तर, या मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईसाठी काय करणार आहात? तिला बाहेरच्या जेवणासाठी घेऊन जाणे, तिला स्पा डे भेट देणे किंवा चित्रपटांसाठी बाहेर नेणे किंवा घरीच तिच्या आवडीचे पदार्थ बनवा हा एक अद्भुत मातृदिन आहे!
जल्लोशात जरूर साजरा करा. 

प्रजननजननी,

 • आपल्या उदरात नऊ महीने नऊ दिवस जपणूक करणारी,आपल्या जन्माला येणार्या बाळाच्या अडचणी वर मात करणारी जगतजननी माय,
 • स्त्री जन्माला वरदान लाभलेल मातृत्व, आई  होणार हे कळताच, सुखद,अविस्मरणीय वेळ,अनुभव,जे न सांगता बोलता येणार,जे फक्त आणि फक्त अनुभवता येणार,
 • मातृत्वाची जाणीव व्यक्त न करता येणारी, दोन जीवाचा प्रेमाचा अंश आपल्याच शरीरात वाढणारा जीव,त्या जीवास जन्माला घालणे म्हणजे परमानंद,
 • भ्रुण जस जस कले कले ने पोटात ते वाढत असते तस तस स्त्रीमध्ये अमुलाग्र बदल ,तीच मातेत रूपांतर होत जात सारंच निसर्गनिमिर्ती,
 • आई मुलाचं नातं पोटातूनच सुरु होणार ,नंतर ते घट्ट होत जाणार गोड नातं,
 • आनंदाने,समाधाना ने जपणारी,जोपसणारी सर्वप्राणी मांत्रातील उदरातप्रक्रिया. "कुमारीका ते माता होण्याचा प्रवास"
 • आईपण जीला मिळत ती भाग्यवान स्त्री,ती पोटात वाढणाऱ्या   जीवालाआपल्या रक्ता मासां ने सिंचन करते आणि आयुष्यभर आईपण जगते ते ही हक्काने समाधानाने.

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • 2
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| May 07, 2022

Nice information 👌

 • Reply | 1 Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा

वर उत्सव आणि उत्सव ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}