• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
पालक बाळ काळजी आरोग्य आणि निरोगीपणा

नवजात शिशु काळजी टिप्स

Canisha Kapoor
0 ते 1 वर्ष

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Nov 05, 2018

नवजात शिशु काळजी टिप्स

नवजात शिशु जेव्हा जन्माला येते त्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी आणि त्याचे आरोग्य व संगोपन कसे करावे असे अनेक प्रश्न बाळंतपणात बाईला पडतात.

नवजात बाळांची काळजी घेणे

बाळ जन्माला आल्यापासून ते सुमारे १-२ वर्षाचे होईपर्यंत बाळाची अवस्था फार नाजूक असते . त्या दरम्यान त्याचे संगोपन व्यवस्थित होणे फार महत्त्वाचे असते.

#1. स्तनपान -

बाळ जन्माला आल्यानंतर आईचे दूध बाळा साठी फार महत्त्वाचे असते . या दुधाला ' कोलेस्टम'  म्हणतात . या दुध मधून बाळाला त्याची रोग प्रतिकार शक्ती प्राप्त होते . पहिले ३ महिने बाळाला आईचे दूध गरजेचे असते . दर् २-३ तासांनी बाळाला स्तनपान द्यावे . दिवस भरा तून सुमारे ८-१० वेळा तरी स्तनपान देणे गरजेचे असते . एका स्तनामधुन सुमारे १०-१५ मिनिटे स्तनपान करावे . बाळाला पर्यायी आहार देत असल्यास तो एकावेळी ६०-९० ग्रॅम इतका असावा.
 

#2. बाळाची झोप -

बाळाची झोप अत्यंत महत्त्वाची असते . झोप नाही झाल्यास बाळ चिडचिड करू शकते . बाळाला एकावेळी सुमारे २-८ तास सलग झोप हवी . सुरुवातीला बाळ दिवसा पण जास्त झोपते पण ४-६ महिन्यानंतर रात्री जास्त झोपायची सवय त्याला होते.
 

#3. स्वच्छता -

बाळाचे आरोग्य जपायचे तर् स्वच्छता फार महत्त्वाची आहे . बाळाला अंघोळ कशी घालावी? पहिले एक ते दोन आठवडे बाळ फार नाजूक असते . बाळाची नाळ पडत नाही किंवा नाभी भरून येत नाही . तोपर्यंत बाळाला फक्त ओल्या कपडया ने पुसुन घ्यावे . नाळ पडायला सुमारे तीन ते चार दिवस लागतात . त्यानंतर बाळाला आठवड्यात तून दोन ते तीन वेळा सौम्य साबणाने आंघोळ घालावी . बाळाचे ओले झालेले कपडे लगेच बदलावे . ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहिल्यास अंगावर पुरलं येण्याची शक्यता असते. बाळाला कपडे काढल्या नंतर कोरड्या कपडा ने पुसुन घ्यावे. ओलसर पणा जावा म्हणून त्वचा वर् लहान मुलांस साठी मिळणारी पावडर लावावी . बाळाचे कपडे धूऊन टाकत असताना ते नीट गरम पाण्यात भिजवुन ठेवावे त्यात जीव जंतु नाशक औषध टाकावे. कपडे नीट सुकवून ठेवावे.
 

#4. आरोग्य -

जन्मल्यानंतर बाळाला काही कालावधी नंतर डॉक्टरांनीच ठरवून दिल्याप्रमाणे लसी करण करणे गरजेचे असते . जन्मल्यानंतर बाळाला लगे हा काही दिवसात उलट्या होणे किंवा डायरीया होणे स्वाभाविक असते तरी डॉक्टरां-कडून त्याबाबतीत मार्गदर्शन होणे गरजेचे असते . बाळाला हातात घेताना हात स्वछ साबणाने धुवून घ्यावे . बाळ नाजूक असल्या कारणाने त्याला संसर्ग (इन्फेक्शन) लगेच होते . बाळाची त्वचा नाजूक असल्या कारणाने त्याला डायपर नेहमी वापरणे बाळाच्या त्वचे ला हानिकारक ठरू शकते . त्याने पुरळ येणे यासारखे त्रास होऊ शकतात . किंवा त्वचा लाल होणे खाज येणे अश्या समस्या होऊ शकतात . शक्यतो बाळाला सुटसुटीत हवे-शीर व सुती कपडे घालावे जे बाळाला हानी पोचवणार नाहीत व बाळाच्या वाढीत मध्ये बाधा आणणार नाहीत.
 

#5. रोगप्रतिकारक शक्ती -

रोग प्रतिकार शक्ती ज्याला आपण इम्युनिटी असे म्हणतो . ती कशी वाढवावी? तर् बाळाला जी रोग प्रतिकार शक्ती मिळते असते , तीं त्याला त्याच्या आई कडून मिळत असते . जर आईचे आरोग्य नीट असेल तरच बाळाचे स्वस्थ नीट राहू शकते . 'IgM' या प्रकारची अँटिबॉडी बाळाला आई कडून मिळत असते . या प्रकारच्या इम्युनिटी ला ऍक्टिव्ह इम्युनिटी असे म्हणतात . यामुळे बाळाचे बाहेरील सूक्ष्म जीव वगैरे यांच्या पासून रक्षण होत असते . बाळाची प्रकृती ठीक नसेल तर् किंवा आईचे स्तनपान नीट होत नसेल तर् काही लस देऊन ती रोग प्रतिकार बाळाला देता येतात . रोग प्रतिकार शक्ती साठी लसीकरण हा मुद्दा पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे . पोलिओ सारखे आजार पासुन बाळाचे रक्षणा साठी  करायचे असेल तर् बाळाला लस देणे फार महत्त्वपूर्ण मानता येईल . त्यासाठी भारत सरकारने मोफत अश्या सोयी निर्मान केल्या आहेत.

 

नवजात शिशु ची काळजी घेणे आणि त्याला समजून घेणे हे फार महत्त्वाचे असते . आरोग्य हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे . बाळाची काळजी आता च घेतली तर् पुढे त्याच्या आयुष्यात त्याला कोणतेही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही . बाळाच्या आरोग्याची काळजी आईने जास्त घ्यावी कारण जास्त वेळ आई बाळा बरोबर असते. बाळा बरोबर आईचे आरोग्य ही खुप महत्त्वाचे असते . कारण त्याचा परिणाम बळावर होऊ शकतो

 

  • 1
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.

| Jan 21, 2019

mazi mulagi 1 month 8 divas zale tich potty ghath hotay,ani 2,3 divasane karate... any reason please tell me..

  • अहवाल
+ ब्लॉग लिहा
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}