• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

पंचामृताचे अमृता समान फायदे

Sanghajaya Jadhav
11 ते 16 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 23, 2021

पंचामृताचे अमृता समान फायदे
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी किंवा धार्मिक विधींसाठी पंचामृताला अन्यन्य साधारण महत्व आहे. हेच पंचामृत  दररोज सेवनाने गर्भवती स्त्रियांना भरपूर लाभ होतात. तसेच अबाल वृध्दांसाठीही हे अत्यंत गुणकारी आहे म्हणून त्यास पंचामृत संबोधतात.

पंचामृत म्हणजे काय तर पाच घटकांचं मिश्रण. ज्यामध्ये दूध, दही, मध, साखर आणि तूप यांचं मिश्रण एकत्र बनवलं जातं. पंचामृतामध्ये सप्त धातू आढळतात जे आपल्या शरीराला पोषण देण्याची क्षमता राखतात. पंचामृत बनवणं अतिशय सोपं आहे. 

 दही 

 तूप 

 दूध

 साखर 

 मध 

याचे सवोर्त्तम मिश्रण किती लोकांसाठी तयार करायच त्यानुसार त्याचे प्रमाण ठरते. एका साठी बनवायला झाल तर अगदी हाताच्या तळव्यांमधेही सर्व मिक्स करून घेऊ शकतो.

ताजं बनवलेलं पंचामृतच प्यावं. कारण हे काही काळच चांगलं राहतं.

पंचामृतात दही घातलं जातं जे काही काळाने आंबट होतं त्यामुळे याचा वासही बदलतो. त्यामुळे पंचामृत जास्त वेळ ठेवू नये. 

आयुर्वेदानुसार पंचामृत बनवताना तूप आणि मधाच प्रमाण सम नसावं. त्यामुळे पंचामृत बनवताना याची काळजी नक्की घ्या. 

पंचामृत बनवण्यासाठी नेहमी स्टेनलेस स्टील, सिरेमिक किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा. पूर्वीच्या काळी पंचामृताच्या अतिरिक्त फायद्यांसाठी ते चांदीच्या वाडग्यात बनवले जात असे. 

 

 पंचामृताचे अनेक फायदे मिळू शकतात. 

 

केसांसाठी उपयुक्त  (Nourishment To Hair)

पंचामृत हे केसांसाठी फारच पोषक आहे. यामुळे आपल्याला सप्त धातूचं पोषण मिळतं. ज्यामुळे केस होतात निरोगी आणि चमकदार. तसंच वेगाने वाढतातही.

 

मेंदूस फायदेशीर (Beneficial To The Brain)

पंचामृताचं सेवन नियमितपणे केल्यास बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते. गर्भावस्थेदरम्यान याचं सेवन केल्यास मुलाच्या मस्तिष्क विकासास चालना मिळते.

 

तुकतुकीत त्वचेसाठी (Healthy Skin)

पंचामृत हे तुमच्या त्वचेला आतुन स्वच्छ करते. पंचामृताच्या सेवनाने तुमची त्वचा निरोगी राहते आणि स्कीन विकाराला आळा बसतो. त्यामुळे त्वचेवर आपोआपच तुकतुकीतपणा येतो.

 

पित्तशामक (Gallbladder)

पंचामृत हे उत्तम पित्तनाशक आहे आपल्या शरीरातील पित्ताला संतुलित ठेवतं. त्यामुळे याच्या सेवनाने हायपर एसिडीटी आणि पित्ताचं असंतुलन टाळता येतं.

 

पंचनशक्ति सुधारते  (Good For Digestive System)

पंचामृतात सर्व घटक आहेत जे पचनक्रिया उत्तम ठेवते. त्यामुळे ज्यांना पचनाचा त्रास असेल त्यांनी पंचामृताचं सेवन नक्की करावं.

 

गरोदरपणात आवश्य सेवन करावे:- 

पंचामृतामध्ये दूध, दही, साखर, मध आणि तूप यांचा वापर केला जातो. या सर्व गोष्टी बाळासाठी आणि आईसाठी सुद्धा चांगल्या समजल्या जातात. तुम्ही सुद्धा गरोदरपणात पंचामृत अवश्य सेवन करायला हवे. पंचामृत सेवन केल्याने गरोदर स्त्रीला होणारे फायदे जाणून घेऊया.

 • पंचामृत म्हणजे एक गोड मिश्रण असते जे गरोदर स्त्रीला पोषक तत्व प्रदान करू शकते.
 • हे बाळाच्या विकासात मदत करते. यामुळे आईच्या स्नायूंना मदत मिळते आणि तिची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.
 • सोबतच गरोदरपणात पंचामृताचे सेवन केल्याने स्त्री रिलॅक्स आणि स्वस्थ राहते. म्हणूनच जाणकार सुद्धा गरोदरपणात आवर्जून पंचामृत सेवन करण्याचा सल्ला देतात.
 • तुम्ही देखील गरोदर असाल आणि तुम्हाला स्वस्थ राहायचे असेल व बाळाला सुद्धा स्वस्थ राखायचे असेल तर पंचामृत नक्की घ्या.पंचामृताचे इतरही अनेक फायदे आहेत.
 • पंचामृत हे पचन तंत्राला मजबूत करते. ज्यामुळे अ‍ॅसिडीटी, पोटाच्या व आतड्यांच्या समस्या तसेच अल्सर पासून सुद्धा आराम मिळतो. गरोदरपणात अ‍ॅसिडिटीची समस्या सतत जाणवत असेल तर पंचामृत हे तुमच्यासाठी सर्वोत्तम पेय ठरू शकते.
 • पंचामृत शरीराला ताकद देणाऱ्या सात उतींना पोषण देते ज्यात प्रजनन उती, दात, फॅटी टिश्यू, नार्व टिश्यू, मसल टिश्यू, प्लाझ्मा आणि रक्त पेशींचा समावेश होतो.
 • याच्या सेवनाने गरोदर स्त्रीच्या चेहऱ्यावर चमक सुद्धा येते आणि हे पंचामृत बाळाच्या त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरते.आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार गरोदर स्त्रीसाठी पंचामृत हे कोणत्याही टॉनिक पेक्षा कमी नाही,
 • हे बाळाच्या मेंदूच्या विकासात मदत करते आणि बाळाची स्मरणशक्ती वाढवते.
 • जर तुमच्या शरीरात पित्त वाढले असेल तर या कारणामुळे तुम्हाला खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पंचामृत हे पचन मार्गामधून अधिक पित्तामुळे निर्माण होणारी उष्णता बाहेर फेकते आणि पित्त शांत करते. याच कारणामुळे जुने जाणते लोक पंचामृत प्यायचे. हाच फायदा गरोदरपणात स्त्रीला सुद्धा पंचामृत सेवनाने होऊ शकतो.

पंचामृताचा अर्थ पाच अमृत अर्थात पाच पवित्र वस्तूंपासून निर्मित. दोघांचे सेवन केल्याने जेथे व्यक्तीत सकारात्मक भावांची उत्पत्ती होते, तसेच हे आरोग्याशी संबधित अनेक तक्रारी दुर होतोत. पंचामृत बल प्रदान करते शारिरीक आणि मानसिक थकवा घालवण्यास मदत करतं म्हणून ह्याच सेवन पहाटे रिकाम्या पोटी करतात.ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • 1
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| Jul 02, 2021

Khup chhan mahit dhilit madam apan thanks you so much 🙏🤗 mi he niyamit jevanat ghet jain nakkich

 • Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP

वर आरोग्य आणि निरोगीपणा चर्चा

Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}