• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
शिक्षण आणि शिक्षण

15 जुलै पासून ऑफलाईन शाळा खरंच सुरु होतील?काय आहेत शिक्षणमंत्र्याच्या आवश्यक सूचना

Sanghajaya Jadhav
11 ते 16 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jul 08, 2021

15 जुलै पासून ऑफलाईन शाळा खरंच सुरु होतीलकाय आहेत शिक्षणमंत्र्याच्या आवश्यक सूचना
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्रात 15 जुलैपासून ऑफलाईन शाळा सुरू होतील. तथापि, यावेळी केवळ आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश मिळू शकेल. यासंदर्भात बोलताना शालेय शिक्षणमंत्र्यांनी ही शाळा उघडण्याची हिच वेळ असल्याचे स्पष्ट केले.

शालेय शिक्षणमंत्र्याच्या काही अटी-:

 1. आम्ही अद्याप सर्व ठिकाणी शाळा उघडणार नाही.
 2. फक्त खेडोपड्यातूनच शाळा सुरू होणार आहेत.
 3. जिथे कोरोनाचे कोणतेही प्रकरण एक महिन्यासाठी आले नसेल आणि जो ग्रामीण भाग कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी एकत्र उभे आहेत याची जबाबदारी घेतील. त्या ठिकाणीच शाळेला सुरूवात केली जाईल.

कोरोनाची पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमुळे तब्बल 15 महिन्यांपासून शाळांना बंदच आहेत. कित्येक दिवसापासुन शाळा बंदच असल्या कारणाने विद्यार्थ्यांमधील अभ्यासा प्रती निराशेचा सुर आहे अनेकांकडे ऑनलाईनची साधनाची कमतरता. या सर्वाचा अंदाज बाधून तिसऱ्या लाटे बद्दल सतर्कता ठेऊन 15 ऑगस्टपासून तीन टप्प्यात ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केल्याचे समजते. 

मागच्या वर्षाला पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा मार्च 2020 पासून सुरूच झाली नाही. सहावी ते आठवीचे वर्ग मागच्या वर्षी काही कालावधी साठी सुरू झाले. त्यामुळे शाळेत नवीन ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. शाळांमधील एवढा गोंगाट पाहून नवीन शिकाऊ मुले भेदरतील, वर्षभर मुले घरीच असल्याने त्यांच्यातील अभ्यासाचा दिनक्रम मोडला गेला. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांना डोळ्याचा,पाठीचा शारीरिक व्याधी सुरु झाल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

 • ऑनलाइन शिक्षणापासून 26 टक्‍क्‍यांहून भरपूर मुले वंचितच आहेत. या सर्व घडामोडीवर ऑफलाइन शाळा सुरू करण्याची गरज असल्याचे मत शिक्षण खात्याने व्यक्‍त केले. याशिवाय आपण अपेक्षित परिणाम साधू शकत नाही,
 • शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होईल  असेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता 15 ऑगस्टनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून ऑफलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने सुरू केले आहे. 
 • यात पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी 
 • तर दुसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी 
 • तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांचे वर्ग सुरू होतील

सुचना-:

1.नववी ते बारावी, सहावी ते आठवी आणि पहिली ते पाचवी, अशा टप्प्यांत सुरू होणार ऑफलाइन शाळा

2. कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक व नागपूर या जिल्ह्यातील पाच टप्प्यांत कोवीडचा प्रादुर्भाव पाहून जिल्हाधिकारी घेतील निर्णय. 

3.सध्या दहावी व बारावीच्या वर्गांवरील 100 टक्‍के शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थिती बंधनकारक 

4.पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना 50 टक्‍क्‍यांच्या प्रमाणात शाळेत हजर राहण्याचे बंधनकारक आहे.

ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

 

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर शिक्षण आणि शिक्षण ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}