• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

'ओमिक्रॉन'omicron : विषाणू डेल्टा वेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक !!

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Nov 28, 2021

 ओमिक्रॉनomicron विषाणू डेल्टा वेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने पूर्ण विश्वात चिंतेच वातावरण निर्माण केल आहे. बोत्सवाना, आफ्रिकेतून घेतलेल्या B.1.1529 च्या नमुन्यांमध्ये आढळून आले की त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 30 हून अधिक म्यूटेशन्स झाले. WHO च्या मते, इतर वेरिएंटच्या तुलनेत, ओमिक्रॉन वेरिएंटने पुन्हा कोविडची लागण झपाट्याने होते.

करोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन

ओमिक्रॉन हा अधिक अत्यंत संसर्गजन्य आणि रोगप्रतिकारक शक्तीवर वेगाने प्रभाव करणारा असे दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे हा विषाणु चार पट वेगाने संसर्ग करतो याची जमेची बाजू हि की याची टेस्ट करून हा विषाणू ओळखता येतो, दक्षिण आफ्रिकेतील देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत ठरला आहे. ओमिक्रॉन वेरिएंट निर्मिती कुठे झालीय, हे अद्याप नेमकं कळलं नाही. या शिवाय दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी या नवीन कोरोना वायरस वेरिएंटचा शोध लावला. काही कालावधीतच , हाँगकाँग आणि बोत्सवाना देशातल्या प्रवाशांमध्येही हा कोरोना वायरस वेरिएंट आढळला.

 • WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून ओळखला गेला आहे.
 • या वेरिएंटची तीव्रता कळताच अनेक देशांनी आपल्या हवाईसेवाना हाय अलर्ट जाहीर केलाय.
 • स्टॉक मार्केटही घसरले आहे आणि काय नेमका धोका उदभवू शकतो हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आपत्कालीन बैठका घेत आहेत.
 • हा ओमिक्रॉनला विषाणू डेल्टा वेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक मानले जात आहे.

नवीन वेरिएंटबद्दल जाणुन घेऊया ?
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराला B.1.1529 असे ओळखले जात होते. नंतर WHO ने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word). WHO ने दिलेल्या माहिती नुसार ज्या पहिल्या चाचणीतुन ओमिक्रॉनची पहिली केस आढळली होती, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती.

ओमिक्रॉनचे केसेस आता प्रयन्त 

 • बेल्जियम,
 • हाँगकाँग, 
 • इस्रायल,
 • दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांमध्ये सापडत आहेत.

बोत्सवाना, आफ्रिकेतून घेतलेल्या B.1.1529 च्या नमुन्यांमध्ये आढळून आले की त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 30 हून अधिक म्यूटेशन्स झाले. WHO च्या मते, इतर वेरिएंटच्या तुलनेत, ओमिक्रॉन वेरिएंटने परत कोविडची लागण होण्याची शक्यता जास्त आहे.

प्रतिबंधात्मक उपाय

या नव्या विषाणूची भारतात आता सध्या तरी एकही केस आढळली नाही. तरीही, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने आंतरराष्टीय विमान सेवांसाठी हि आवश्यक त्या उपाययोजना करत आहे , अलर्ट दर्शवत भारताने ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मॉरिशस, बांगलादेश, बोत्सवाना, झिम्बाब्वे, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांना ‘high risk’ देशांच्या यादीत टाकले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या तज्ञांनी सांगितले की या वेरिएंटचे अधिक गंभीर किंवा कमी आजार होतो असे कोणतेही संकेत नाहीत. युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजमधले तज्ञ शेरॉन पीकॉक म्हणाले की, विद्यमान अँटी-कोविड लस नवीन वेरिएंटविरोधात किती प्रभावी आहेत हे तपासण्यात काही आठवडे जातील

नव्या व्हेरियंट आणि खबदारी 

 1. करोनाचा नवीन वेरियंट आला तरी घाबरुन जाऊ नका. 
 2. नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा आणि तो घेण्यात विलंब करू नये असे आरोग्य मंत्री टोपे सुचित केले आहे.
 3. तसंच करोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्सक सूचनांचं पालन करावं, असे सांगितले.
 4. शाळांबाबत मुख्यमंत्री नवीन नियमावली लागु करणार आहेत. 
 5. तुर्तास सर्व नागरिकांनी लस घेण्याचे कळकळीचे आवाहन सरकारने केले आहे.  

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}