• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
शिक्षण आणि शिक्षण

ऑनलाईन शाळा मार्गदर्शक सुचना आणी ब्रिज कोर्स

Sanghajaya Jadhav
3 ते 7 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 17, 2021

ऑनलाईन शाळा मार्गदर्शक सुचना आणी ब्रिज कोर्स
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

 

 कोरोना पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू झाल्या  आहेत. राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू झालेल असले तरी मुलांना झुम किवा क्लासेसची गुगुल लिंक अजूनही मिळताना काही शाळा  मध्ये दिसत नाही आहे कारण प्रत्येक मुलाचा गुगलला एक अकाऊट असाव असा अट्टाहास शाळा मार्फत केला जात असल्यामुळे त्यामुळे संभ्रम दिसतो.

 • प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
 • राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता कमी दिसते.
 • प्रशासनाने प्रत्येक जिल्हास वेगळी गाईडलाईन दिलेली असल्यामुळे शाळा त्या पध्दतीने डिजिटल क्लासेस सुरू करतील.

शिक्षण विभागाची भूमिका नेमकी काय?

 1. शाळा ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी शाळा तूर्तास ऑनलाईन माध्यमातूनच सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देत आहेत.
 2. 15 जूनपासून ऑनलाईन आणि इतर शक्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचण्याच्या सूचना आम्ही देणार आहोत असे प्रशासकीय अधिकार्यामार्फत कळते. येत्या दोन दिवसांत यासंदर्भात पत्रक जारी करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये याचीही खबरदारी घेण्यास सांगण्यात येईल."
 3. प्रत्यक्षात शाळा कधी सुरू होणार किंवा याबाबत शिक्षण विभागाची पुर्व कल्पना अजून तरी मिळालेली नाही.
 4. महाराष्ट्रातील लाॅकडाउन हा जिल्हास्थारावर म्हणजे स्थानिक पातळीवरील कोरोना नियमावली नुसार ठरेल.
 5.  विविध जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने टप्प्यांनुसार लॉकडॉऊनचे निर्बंध लागू केले आहेत. तेव्हा शाळा सुरू करत असताना सरसकट सगळीकडे एकाचवेळी शाळा सुरू करता येणार नाहीत.
 6. आपल्या जिल्ह्याची परिस्थिती कशी आहे ते पाहून स्थानिक प्रशासनाला सोय देण्यात आली की शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय ते स्व पातळीवर घेऊ शकतात.

संभ्रम कायम?

 • शैक्षणिक वर्ष सुरू झाल्या पासून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतात.
 • शाळा ऑफलाईन का नाहीत?
 • विषय,भाषा, ऑनलाईन कनेक्शन तक्रारींचा परीपाठ?
 • शाळा नेमक्या कोणत्या पद्धतीने सुरू करायच्या?
 • शाळा ऑनलाईन असणार की ऑफलाईन?
 • ऑनलाईन  इयत्तेला किती तास शिकवायचे?
 • अभ्यासक्रम नियम जाहीर करण्यात आले आहे का?
 • असे अनेक प्रश्न मुख्याध्यापक ,शिक्षक आणि मुला समोर आहेत.
 • काही शाळा मागच्या अनुभवातून शिकत आहेत आता नविन बदल घडवून आणला जात आहे.

ब्रिज कोर्स म्हणजे नेमकं काय?

15 जूनपासून महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केलेले आहे 

मागच्या शैक्षणिक वर्षात जे विषय, संदर्भ कळू शकले नाहीत ते परत रिव्हिजन घेतले जातील जेणेकरून पुढील वर्गातील अभ्यासक्रम लक्षात येईल 

जर शैक्षणिक वर्षात विद्यार्थी समजा पाचवीत आहे. तेव्हा हा ब्रिज कोर्स चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसंच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता किवा कळणार नाही असे महत्त्वाचे विषय ब्रिज कोर्समध्ये घेतले जातील.असा असेल ब्रिज कोर्स

प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा असणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयासाठी ब्रिज कोर्स उपलब्ध असेल. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार.ब्रिज कोर्स 45 दिवसांचा असणार आहे. यातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विषयावर प्रगती करता येईल. 

आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • 2
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| Jun 18, 2021

Nice 👍

 • Reply
 • अहवाल

| Jun 18, 2021

Nice

 • Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}