ऑटिज्म आणि पालकानची प्रतिक्रिया

Dr.Jayashree Shiwalkar च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Feb 25, 2020

‘स्वमग्नता’ ही एक विकसनशील क्षमते मघे आढळणारी क्षती आहे. कदाचित, पालकांना वरील व्याख्या वाचून मनात काही शंका येतील किंवा लगेचच समजणार नाही.‘स्वमग्नता’ ही एक व्यक्तिमत्वाची अवस्था आहे.यामधे मुलांचे वर्तन, भाषा, संवाद व सामजिक विकास यामधे कमी-अधिक प्रमाणात कमतरता आढळून येते.
ते मुलांच्या वर्तनावरून पण हे सगळे लक्षात येते काय वैशिष्टपूर्ण वर्तन असते या मुलांमधे १
-
एकाच गोष्टीत वारंवार रमणे.
-
नजरेला नजर न मिळविणे.
-
आवाजाला होकार न देणे (ऐकून न ऐकल्यासारखे करणे)
-
एकच गोष्ट वारंवार करणे वा विचारणे.
-
गोष्टी गोल-गोल फिरवून खेळणे.
-
फिरणाऱ्या गोष्टीकडे वारंवार बसणे.
-
एकटेच खेळणे, मुलांमधे न मिसळणे.
-
विचारलेला प्रश्न पुन्हा विचारणे.
-
गर्दीमधे, आवाजामधे अस्वस्थ वाटणे.
-
नविन ठिकाणी अस्वस्थ वाटणे.
-
खाण्याच्या वैशिष्ठपूर्ण समस्या.
-
शाळेमधे शैक्षणिक / सामाजिक समस्या आढळणे.
अशा एक ना अनेक समस्या ऑटीझम असणाऱ्या मुलांमधे आढळू शकतात. परंतू हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, ही लक्षणे सगळया मुलांमधे वेगवेगळया प्रमाणात आढळतात.
सर्वसाधारणपणे पालकांना ही शंका मनात असते, की कोणत्या लक्षणांमधे प्रगती जास्त चांगली होऊ शकते. खालील काही लक्षणे असली तर ऑटीझमच्या मुलाची प्रगती चांगली होऊ शकते.
-
जर मुलगा भाषेचा वापर करत असेल तर
-
बुद्ध्यांक जवळपास नॉर्मल असेल तर
-
मुलगा खूप चंचल नसेल तर
-
मुल इतरांशी संवाद व समायोजन करण्यात सहकार्य करत असेल तर
-
सोबत इतर कोणतेही व्यंग / अपंगत्व नसेल तर जसे – एपितेप्सी (epilepsy) अध्ययन अक्षमता इत्यादी
परंतु खालील लक्षणे जर दिसत असतील तर ऑटीझमची तीव्रता जास्त असून शक्य तितल्या लवकर थेरेपी सुरू करणे आवश्यक आहे हे पाककांनी लक्षात घेणे जरूरीचे आहे.
-
जर मुलाला भाषा / वाचा येण्यास विलंब (उशीर) झाला असेल तर
-
सोबत मतिमंदत्व देखील असेल तर
-
मुल खूप जास्त चंचल असेल तर
-
मुल अतिशय एकटेपणा दाखवत असेल किंवा समायोजनात सहमार्य करत नसेल
-
मुलास ऑटीझम सोबत –
epilepsy, deafness किंवा इतर काही अपंगत्व असल्यास पालकांनी हे लक्षात घ्यावे की, प्रमाण कमी व अधिक, परंतु मुलाला / मुलीस आवश्यक अशा थेरेपी देणे हेच उत्तम आहे.
सारांश :-
-
ऑटीझम सोबत इतर समस्या जसे एपिलेप्सी, अध्ययन अक्षमता अथवा मतिमंद राहू शकते.
-
स्वमग्नता सौम्य, तीव्र व अतितीव्र प्रमाणात राहू शकते.
-
ऑटीझमचा परिणाम मुलाची भाषा, संवादकौशल्य, शिक्षण, सामाजिक विकास तसेच वर्तनावर दिसून येतो.
-
सर्वात महत्त्वाचे म्हणजे – विविध थेरेपीमुळे ऑटीझमच्या समस्यांवर मात करता येतो.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.
वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग
वर आरोग्य आणि निरोगीपणा चर्चा
वर आरोग्य आणि निरोगीपणा प्रश्न

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}
{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}