• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
पालक आरोग्य आणि निरोगीपणा

पावसाळ्यात असे ठेवा मुलांकडे लक्ष

Satish Samarth
0 ते 1 वर्ष

Satish Samarth च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित May 19, 2022

पावसाळ्यात असे ठेवा मुलांकडे लक्ष
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

मुंबईत धुंवाधार होत असलेल्या पावसामुळे येथील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मीडियाच्या माहितीनुसार, मुंबईच्या वेगवेगळ्या भागात दैना झाली आहे.  बीएमसी यांनी मुंबईकरांच्या मुक्तीसाठी थेट नौसेनेला साद दिली आहे, मदतीसाठी पुकारले आहे. नौसेनेनेही तत्काळ प्रतिसाद देत ठिकठिकाणी जवानांना तैनात केले आहे. जिकडे-तिकडे पाणीच पाणी असल्याने लोकांना आपल्या घरातून निघणेही कठीण झाले आहे. शाळा-कालेज आणि मोजक्या कार्यालयांना तात्पुरते बंद करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या पूर्वानुमानानुसार येत्या काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचे वर्तविले आहे. खूप ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डास, कीडे, सरपटणारे जीव-जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. या जीवनामुळे पावसाळी आजारांचा त्रास बळावतो. जागरूक पालकांनी अशा वेळी काय करावे, याबाबत थोडेसे...

 

 

पावसाळ्यात जेव्हा पाणीच शत्रू होतो...

काही आवश्यक बाबी

मुंबईच्या पावसाने पुराची शक्यता बळावल्याची माहिती आहे. म्हणूनच मुंबईकर पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

 

१) खूपच गरजेचे असेल, तरच घराबाहेर पडावे - स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. पावसामुळे खूपशा ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर पाणी साठलेले असल्याने घरचे वाहनही चालवणे कठीण झाले आहे.

 २) घरात खाणे-पिण्याची सगळी सोय करून ठेवावी. - येणाऱ्या ३-४ दिवसांत शक्यतो हीच परिस्थिती कायम राहील, असे गृहीत धरून आपल्या घरात खाण्या-पिण्याच्या सर्व सामानांची व्यवस्था करून ठेवावी. बटाटे-कांदे, हिरव्या भाज्या, डाळ, राजमा, कडधान्य यांशिवाय तांदूळ, कणिकही साठवून ठेवा. रोज लागणाऱ्या सामानांची यथासांग व्यवस्था करून ठेवावी. 

 ३) वीज खंडित होणे- पावसामुळे वीज खंडित होणे हा प्रकार वारंवार होऊ शकतो; अशावेळी धावपळ करणे शक्यही नसते म्हणून पूर्वीच मेणबत्ती बॅटरी सेल टॉर्च जवळ असणे गरजेचे आहे. विजेचे तार आणि कनेक्शन सुरक्षित राहतील, याकडे लक्ष पुरवावे. जेणेकरून पाण्याच्या संपर्काने शॉर्टसर्किट होणार नाही. यावर एकच उपाय करावा तो म्हणजे विजेचा मुख्य स्वीच बंद ठेवणे.

४) या पावसाळी वातावरणात मुलांना बाहेर खेळण्यास जाऊ देणे म्हणजे स्वतःच्या त्रासात भर टाकणे होय. पण, त्यांना प्रेमाने, रागाने समजावणे गरजेचे.

५) रस्त्यावर जर दोन फूटपेक्षा जास्त पाणी असेल तर स्वतः व मुलांना सोबत घेऊन पाण्यात जाण्याचे धाडस करूच नका.

६) कोणत्याही आकस्मिक घटनेला तोंड देण्याकरिता तुमच्याजवळ एक इमर्जन्सी कीट नक्की ठेवा. या इमर्जन्सी कीटमध्ये टॉर्च, फर्स्ट एड किट, औषध, मुलांकरिता हलके कपडे, तुमचे गरजेचे डॉक्युमेंट्स, काही रोख रक्कम असणे गरजेचे आहे.

 

पावसाळ्यात मुलांना आजारी पडण्यापासून असे वाचवा

मुलं भिजली असतील तर...

पावसाळ्यात जेव्हा पहिला पाऊस होतो तेव्हा मुलांना पाण्यात खेळू न देणेच योग्य. खेळल्यास त्याचे डोके शरीर टाव्हेलने स्वच्छ करावे. त्याला दुसरे कपडे घालायला द्यावे. मुलाला हळद-आलं मिसळून गरमागरम दूध प्यायला देणे जेणेकरून त्याच्या शरीरात गर्मी येईल आणि तो कोणत्याही 'इन्फेक्शन'पासून दोन हात दूर राहील. पावसाळ्यात त्याच्याजवळ अभ्यासाच्या पुस्तकांसोबत रेनकोट असणे गरजेचे आहे. 

मुलांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष नको 

मुलांना पावसाच्या साठलेल्या पाण्यात खेळण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. मुलांना काहीही खाण्यापूर्वी व खाल्ल्यानंतर हात स्वच्छ धुणे बंधनकारक करावे. मुलांची त्वचा संवेदनशील असल्याने त्यांना शक्यतो अँटीसेप्टिक साबणाने अंघोळ करावयास लावणे. जेणेकरून त्यांना एलर्जी वा फंगल इन्फेक्शन होणार नाही.

मान्सूनमध्ये बॅक्टेरियात वाढ होते यामुळे मुलांना एलर्जीचा त्रास होतो म्हणूनच खाण्यापिण्याच्या वस्तूंची स्वच्छता करणे गरजेचे असते. लहान मुलांवर अस्वच्छतेचा मोठ्या माणसांच्या तुलनेत लवकर प्रभाव पडतो म्हणूनच कोणतीही खाण्याची वस्तू मुलांना देण्यापूर्वी ती स्वच्छ असल्याची खात्री करूनच द्यावी. पालकांनी हे लक्षात ठेवावे की मुलांनी हात धुऊनच एखादी वस्तू किंवा जेवण करणे गरजेचे आहे. आपणही हात स्वच्छ धुऊन मुलांना जेवायला देणे. अन्न गरम असल्यावरच मुलांना खाऊ घालावे,  त्यास परत गरम करून देणे शक्यतो टाळावे. 

मुलांना फिल्टरचे पाणी देणे-

 जूनमध्ये पाऊस आणि गर्मी सोबतच असल्याने मुलांना डिहायड्रेशन होत असतो. म्हणूनच, मुलांना स्वच्छ उकळलेले पाणी म्हणजेच फिल्टरचे पाणी द्यावे. मुलांना थोड्या थोड्या वेळाने ज्यूस व नारळ पाणी पाजत राहा, ज्यामुळे मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता पडणार नाही.

 मुलांच्या झोपण्याच्या खोलीची स्वच्छता राखा -मुलांच्या खोलीला 'ओल' मुक्त ठेवावे. तेथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरवावे. खोलीतील खिडक्या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून स्वच्छ हवा खेळती राहील. रात्री तापमान सामान्य राहील, याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. एसी शक्यतो टाळावा. पावसाळ्यात एसीची हवा हानिकारक असते. 

आरामदायक कपडे घालावेत - पावसाळ्यात किडे माकोडे यांचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव जास्त असतो म्हणूनच मुलांना फुल पॅन्ट,  फुल शर्ट घालावा. कपडे सैल असावीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये मुलांना मुलांचे कपडे जराही ओले होऊ देता कामा नये. परिणामी,  संक्रमणाचा त्रास होतो. आपल्या मुलाची तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवावी. सुदृढ आरोग्य राखावयाचे असेल तर थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी घेतली, तर पावसाळ्यात होणारे आजार दूर ठेवता येतील.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • 8
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| Jul 10, 2019

माझा मुलाला वारंवार पोटाचे विकार होतात

 • Reply
 • अहवाल

| Aug 02, 2019

lll q2 we 22 gn bdøag up

 • Reply
 • अहवाल

| Aug 02, 2019

kpoop

 • Reply
 • अहवाल

| Aug 02, 2019

op

 • Reply
 • अहवाल

| Aug 28, 2019

vajan vadan nahi

 • Reply
 • अहवाल

| Sep 02, 2019

माझा मुलगा 1 वर्षांचा आहे त्याला सर्दी झाली काय उपाय करू

 • Reply
 • अहवाल

| Sep 07, 2019

.

 • Reply
 • अहवाल

| Jun 04, 2021

 • Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}