• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
पालक

पहिल्यांदा मुलींना येणारी पाळी: काही संकल्पना

Sanghajaya Jadhav
11 ते 16 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 24, 2021

पहिल्यांदा मुलींना येणारी पाळी काही संकल्पना
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते, तेव्हा ती एक स्त्री होण्याकडे वाटचाल सुरू करते आणि तिच्यात स्त्री बीज निर्मितीची क्षमता आहे हे सिध्द होते. या काळात जास्त गरज असते ती आपुलकी आणि काळजीची.पिरेड्सचा संवाद टाळण्यापेक्षा योग्य असा संवाद साधायला हवा. हा संवाद साधायचा कसा हे तुम्हाला कळत नसेल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स या लेखामध्ये आम्ही तुम्हाला हीच गोष्ट अधिक तपशीलवार सांगणार आहोत

एका मुलीची स्त्री होण्याची पहिली पायरी असते मासिक पाळी त्यामुळे हा प्रसंग तिच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो आणि तिचा हाच महत्वाचा प्रसंग  साजरा सुध्दा केला जातो.जेव्हा मुलीला पहिली पाळी येते तेव्हा तिची पूजा केली जाते.

1.मुलीला सजवतात-:

 मुलीच्या पहिल्या मासिक पाळीवेळी तिला हळद लावून तिला अंघोळ घालण्यात येते. त्यानंतर तिला पौष्टिक आहार दिला जातो नवीन वस्त्र देण्यात येतात.

2.प्रक्रिया-:

शेजारी,महीला,नातेवाईकांना बोलावून तिचे औक्षण केले जाते. तिला फळे, भेट वस्तू, गोड-धोड खायला दिले जाते. तिची पहिली पाळी साजरी केली जाते. मासिक पाळी (periods) येणे हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग कसा असतो हे तीच्या लक्षात येण्यासाठी ही प्रक्रिया. 

3.योग्य माहीती -:

मुलीला योग्य माहित नसेल तर मात्र ती घाबरू शकते. त्यामुळे प्रत्येक आईची जबाबदारी असते की तिने मासिक पाळीबद्दल तिला सगळ्या गोष्टी समजवायल्या हव्यात. जर योग्य माहिती नसेल तर अनेक गैरसमज मुलीच्या मनात निर्माण होऊ शकतात आणि हे गैरसमज तिच्या शारीरिक व मानसिक दोन्ही आयुष्यांवर प्रभाव टाकू शकतात.

4.चर्चा-:

 आई आणि मुलीचं नातं वेगळंच असतं आपल्या मुलीकडे मासिक पाळीबद्दल जेवढ्या लवकर आई संवाद साधेल तेवढे चांगले आहे. या वयात होणाऱ्या शारीरिक बदलांबद्दल तिला सांगा मात्र एकाचवेळी तिला सगळं सांगायला जाऊ नका. कदाचित ती गोंधळून जाण्याची शक्यता असते.

5.संकोच निवारण:-

संकोच नात्यात कटूता निर्माण करते याचा निवडा झाला पाहीजे त्यासाठी तिला एका एका गोष्टीबद्दल समजून सांगा किंवा तिला या बद्दल काही प्रश्न असतील तर ते विचारण्यास सांगून त्याची उत्तरे द्या. कोणत्याही गोष्टी बद्दल सांगताना अजिबात संकोच बाळगू नका. हि एक नैसर्गिक क्रिया असून त्याबद्दल शरमेची कोणतीही गोष्ट नाही. शिवाय तिला या सगळ्या गोष्टी सांगताना धीर द्या आणि यात काहीही घाबरण्यासारखे नसल्याचा आत्मविश्वास निर्माण करा.

 मासिक पाळी कधी,कशी सुरु होते?

 • सामन्यत: मुलींना दहा ते पंधरा वर्षे वयाच्या दरम्यान मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. सरासरी 12 वर्षे वयामध्ये मुलींना पहिली मासिक पाळी येते. 
 • प्रत्येक मुलीच्या शारीरिक स्थितीनुसार यात फरक आढळून येतो. प्रत्येक मुलीला या वयातच पाळी यायला हवी असे काही नाही.
 • पहिली मासिक पाळी सुरु होण्याच्या दोन दिवस आधी संकेत मिळायला सुरुवात होते.
 • जसे की मासिक पाळी सुरु होण्याच्या दोन वर्षांआधी पासून स्तन वाढण्यास सुरुवात होते.
 • याशिवाय अंडरवियरमध्ये वजाइनल डिस्‍चार्ज येणे सुद्धा मासिक पाळीचाच संकेत आहे. हा डिस्‍चार्ज मासिक पाळी सुरु होण्याच्या जवळपास सहा महिने वा एक वर्षे आधी सुरु होतो.
 • जर तुम्हाला तुमच्या मुलाला मासिक पाळीबद्दल सर्व काही सांगण्यास संकोच वाटत असेल तर तुम्ही तिला या बद्दल माहिती देण्याचे विविध पर्याय वापरू शकता. एखादे अभ्यासपर पुस्तक किंवा व्हिडियो लावून देऊन तुम्ही तिला ती बघण्यास सांगू शकता. यावेळी तुम्ही तिच्या बाजूला बसून तिच्या मनातील शंका दूर करणे गरजेचे आहे. अनेक शाळांमध्ये खास या विषयावर सेशन्स घेतली जातात. त्याबद्दल तुम्ही शाळांशी संपर्क साधून चर्चा करू शकता आणि असे एखादे सेशन सर्व मुलींसाठी आयोजित करू शकता.

मासिक पाळीमध्ये नेमके कोणत्या प्रक्रियेतुन जावे लागते?

 •  हयाची माहिती मुलींना असणं गरजेचे असते. पहिल्या मासिक पाळीवेली रक्तपात अगदी सौम्य असु शकतो. ह्या प्रेत्यकाच्या प्रकृतीवर निर्धारित असतो.  
 • सहसा मासिक पाळीचा काळ हा तीन ते पाच दिवसांचा असतो पण कधी कधी तो सात दिवसांपर्यंत सुद्धा वाढू शकतो.
 • या गोष्टी सांगण्यासोबतच त्यांना मुख्यत: वेदने बद्दल माहिती द्यावी. याबद्दल माहिती नसल्यास मुलगी घाबरण्याची शक्यता असते. त्यामुळे तिला सांगावे की या काळात पोटाच्या खालच्या भागात आणि पाठीमध्ये याशिवाय स्तनांना स्पर्श केल्यास सुद्धा वेदना होणे सामान्य गोष्टी आहेत.
 • या वेदनेवर घरगुती उपचार सुध्दा सहज करू शकतो आणि वेदना कसे कमी करू शकतो हे सांगावे. जेणेकरून तिची मनातील भीती कमी होईल.

मासिक पाळीबद्दल ह्या माहिती सोबत सॅनिटरी पॅड आणि नॅपकिनबद्दल सुद्धा न चुकता मुलीला सांगावे. त्याचा वापर कसा करावा आणि कसा करू नये याबद्दल आईचा अनुभव महत्त्वाचा या अनुभवानुसार सर्व गोष्टी बोलाव्यात. मुलीला सांगा की मासिक पाळीच्या प्रत्येक दिवशी दिवसाला चार ते आठ तासांमध्ये पॅड आणि आठ ते बारा तासांमध्ये मेंस्‍ट्रुअल कप बदलण्याची गरज असते. अशा प्रकारे तिची मार्गदर्शक बनून तुम्ही तिला मासिक पाळीबद्दल योग्य प्रकारे शिक्षण देऊ शकता.

ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}