• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
गर्भधारणा

गर्भावस्था आणि मानसशास्त्र

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित May 06, 2021

गर्भावस्था आणि मानसशास्त्र

अस म्हणतात कीं स्त्रीच्या गर्भाशयातील गर्भ/भ्रूण याच्यात नाळ पोटातच जोडलेली असते. स्त्रीला कळते गर्भास काय हवे नको ते म्हणजे मनाची मनाशी जोडलेली नैसर्गिक प्रक्रिया. यात गर्भवतीच्या मनाच्या अवस्थाची जपणूक करायला हवी. यातन ती आनंदी आणि समाधानी राहील.मन आणि वर्तणूक याचा अभ्यास करणार शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र यातच गरोदरपणात अभिरुची भावना, सवयी या सर्व बदलांमुळे ती स्त्री अस्वस्थ आणि काहीवेळा लाजरीबुजरी असते.कारण एकच पोटात वाढणारा इवलासा जीव.

1.ग्रंथी आणि हार्मोन्स बदल (Glandular and hormonal changes) :-


गरोदरपणात संप्रेरक बदल हे नैसर्गिक असतात.याचा सामना करण्यासाठी स्त्री स्वताःहून मनांची तयारी असावी. जसे गरोदरपणात वजन घटणं, अतिरिक्त प्रमाणात उलट्या होणं, छातीत धडधडणं, पायावर सूज येणं, थकवा येणं, थायरॉईडग्रंथी (गॉयटर) सुजणं, गर्भाची वाढ नीट न होणं, गरोदरपणात रक्तदाब वाढणं, मुदतपूर्व प्रसूती होणं. या गोष्टीची माहीती आणि उपाय योजना याची सांगड आवश्यकच.

2.मन-आहार-विहार-व्यायाम-विश्रांती (Mind-Diet-Vihar-Exercise-Rest) :-
"मन आनंदी ठेवा रे सर्व सुखाचे माहेरघर हे" याचा समतोल गरोदरपणात आवश्यक यामुळे पुढे होणारी गर्भारपणातील गुंतागुंत निर्माण होत नाही. आहारविहार आणि वैद्यकीय सल्ल्याने व्यायाम त्यासोबत विश्रांती अतीशय आवश्यक आहे.

3.सकारात्मक दृष्टिकोन (Positive attitude) :- सकारात्मक दृष्टिकोन ही गुरूकिल्ली आहे अनेक समस्याची. "दृष्टी बदला सृष्टी" बदलेल अशी एक म्हण आहे. चांगले विचार आचार आणि वर्तणूक यातुन गर्भाची सुयोग्य वाढ होते.

4.गरोदरपणात मानसिकता (Mentality in Pregnancy) :-

 • "सर्व प्रथम करा रे मनाची तयारी शरीर घेते आपसुक दुसरी जबाबदारी" 
 • गर्भवतीस माहिती हवी की ती कोणत्या अवस्थामधून जाणार आहे. मार्ग माहीत असले की आपण इच्छित स्थळी पोहोचतो त्याच प्रमाणे गरोदरपणात माहीत आणि जबाबदारीची जाणीव हवी.
 • गर्भावस्थेची तीन टप्प्यांत आपण विभागणी करू शकतो
 • *पहिली तिमाही - पहिल्या बारा आठवड्यात भ्रूणावस्था आणि गर्भाची प्राथमिक वाढ होते.
 • *दुसरी तिमाही - गर्भावस्थेचा 13 ते 27 आठवड्यांचा काळ
 • *तिसरी तिमाही - गर्भावस्थेचा 28 ते 40 आठवड्यांचा.

5.काय करू शकतो (What can) -:
आनंद आणि समाधानाची आपल्या पासूनच सुरूवात असते आणि ती जोपासता उत्तरोत्तर वाढते.
तज्ञाचा सल्ला घ्यायला विसरू नका.
आवश्यक चाचण्या करा.
मन मोकळं करा सांगा, विचारा, प्रश्नाची उत्तरे मिळतील  आधी प्रारंभ आवश्यक.
औषधांच्या वेळा चुकवू नका.

*आपली सकारात्मक उर्जा असावी, कोविड प्रोटोकॉल नियमितपणे अनुसरण करत रहा, काही समस्या असल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा

 • 3
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.

| May 06, 2021

खूप छान लिहिलंय मॅडम आपण खूप छान 👏👏👏 मस्तच👌👌👌

 • Reply
 • अहवाल

| May 07, 2021

Super 👏👌👌

 • Reply
 • अहवाल

| May 17, 2021

Khup Chan information dilit👌

 • Reply
 • अहवाल
+ ब्लॉग लिहा
Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}