• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

पावसाळ्यातील समस्या आजार

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 03, 2021

पावसाळ्यातील समस्या आजार

पावसाळा म्हटलं कीं आनंदी आनंद जिकडेतिकडे हिरवेगार वातावरण पण यात बळवतात ते लहानग्यांना आणि गर्भवती स्त्रीयाचे आजार कारण सुर्य नारायणाचे दर्शन दुमिर्ळ होऊन जाते अश्या दमट वातावरणात जीव जंतूचा प्रादुर्भाव होतो पावसाळा सुरू झाला, की तापमानात सतत बदल होतात.

 • हवेत एक प्रकारचा ओलावा आलेला असतो.
 • सूर्य उगवण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे उन्हाने जंतूंचा नाश होणे बंद होते.
 • आपलीही प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. या सगळ्यातून पुढे सरसावतात सर्दी-खोकल्याचे विषाणू.

एन्फ्ल्यूएन्झा व्हायरस म्हणजेच फ्ल्यूचा विषाणू .

काही वर्षांपासून सुरू झालेला स्वाइन फ्लू हा वेगळा आजार आहे. याची भीती जास्त आहे. बहुतांश वेळेस तो स्वत:हून बरा होतो.

 • दम लागत असेल, खोकला खूप असेल, मूल निपचित पडत असेल, तर वेळीच हॉस्पिटलमध्ये ठेवून उपचार करणे गरजेचे आहे.
 • नियमित लसीकरणाने फ्लूची तीव्रता नक्की कमी होते.
 • काही वेळा सर्दी, खोकला, फ्लू विषाणूजन्य नसून जीवाणूंमुळे होतात.
 • अशा वेळेस कान फुटणे, छातीत कफ होऊन न्यूमोनिया होणे अशा समस्या उद्भवतात. त्यासाठी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविके घ्यावी लागतात.
 • बालदमा हे छातीत कफ होण्याचे दुसरे वाढत जाणारे कारण आहे. त्याचेही वेळीच निदान, औषधे, वाफ इ. उपचार आजाराच्या सुरुवातीलाच केले, तर नंतरची गुंतागुंत टाळता येते.

 पावसाळ्यात मुलांची, खास करून बाल वयातील मुलांची पोट बिघडू शकते

खाण्यात थोडाफार बदल झाला, बाहेरचे खाण्यात आले, तरी पोट बिघडते. मग उलट्या, जुलाब, त्यातून होणारा जलक्षय हे सगळे सुरू होते. अशावेळेच वेळीच उपचार, वेळ पडल्यास वाट न पाहता हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.

• अस्वच्छ अन्न, पाणी हे टायफॉइड (विषमज्वर) आणि कावीळ या दोन आजारांचे कारण बनू शकतात. या दोन्ही आजारांचे वेळीच निदान आणि संपूर्ण उपचार आवश्यक असतात.

• मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया हे तिन्ही आजार डासांमार्फत पसरतात. थंडी वाजून विशिष्ट वेळापत्रकाप्रमाणे येणारा मलेरियाचा ताप किंवा ताप, अंगदुखी, पुरळ आणि पाठोपाठ कमी होणाऱ्या प्लेटलेट्स ही डेंग्यूची लक्षणे. तापाबरोबर खूप सांधेदुखी ही चिकनगुनियाची लक्षणे. या सगळ्यांत डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या, नियमित उपचार हे महत्त्वाचे.

• तुमच्या आहारात फळे, भाज्या यांचा समावेश असावा आणि भरपूर पाणी प्यायले पाहिजे. फळं आणि भाज्या खाण्याआधी त्या नीट धुऊन घ्या. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका. त्याचप्रमाणे या कालावधीत रस्त्यावरील पदार्थ खाऊ नयेत, कारण त्या पदार्थांमध्ये वापरलेलं पाणी दूषित असू शकतं.

• पावसाळ्यात ठिकठिकाणी डबकी साचतात आणि लहान मुलांना या डबक्यांमध्ये खेळताना मजा वाटते. पण या खेसोबत आजारही येतात. त्यामुळे पावसात भिजणे आणि साचलेल्या सांडपाण्याचा संपर्क टाळा.

• पावसात भिजलात तर शक्य तितक्या लवकर शरीर कोरडे करा आणि केस वाळवायला विसरू नका. आरोग्याची थोडीशी काळजी घेतलीत तर या पावसाळ्याचा अधिक आनंददायी होईल.

पावसाळ्यातील आजारांवर नियंत्रण ठेऊ शकतो काही उपाय

1. सामाजिक आरोग्यशिक्षण जागृती आणि सावधगिरी

2. आजाराची लक्षणे दिसल्यास घरी वेळ न दवडता डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

3. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका.

4. गरजे नुसार रक्त, लघवीच्या तपासण्या आवश्यकच

5. घाबरून न जाता शांतपणे, व्यवस्थित उपचार पध्दती अवलंब करायला हवा.

6. कसरत, विश्रांती महत्त्वाची.

7. पाणी उकळून प्या.

ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

 • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}