• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
उत्सव आणि उत्सव

जयघोष "विठ्ठल विठ्ठल": काय आहे आषाढी एकादशीच महत्व

Sanghajaya Jadhav
गर्भधारणा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jul 19, 2021

जयघोष विठ्ठल विठ्ठल काय आहे आषाढी एकादशीच महत्व
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

 गेल्या 800 वर्षा पासूनची ही परंपरा चालत आलेली विठ्ठल नांवाचा गजर दारोदारी घरोघरी दुमदुमतो. आषाढी एकादशीला ह्या वर्षी सुध्दा कोरोनाच सावट आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने वारकार्या साठी सुचना,नियमावली जाहीर केलेली आहे.तसेच आरोग्य यंत्रणाही सज्ज आहेत. या लोकाच्या वाढीमुळे संसर्ग होऊ नये हेच अपेक्षित.आषाढ महिना म्हटलं की उपवास तापास पेरण्या संपून विठोबारायाच्या भक्तीत तल्लीन होण्याचे दिवस. महाराष्ट्राला लाभलेले पंढरपूरचा विठोबा हे दैवत. या दिवशीच्या व्रतास सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते.

काय आहे सुचना,नियमावली

  • करोना विषाणू संसर्गामुळे यंदा पायी वारी रद्द करण्यात आली. मात्र, परंपरा सुरू राहावी, यासाठी प्रातिनिधिक वारी साजरी केली जाणार आहे. ठरलेल्या तिथींना आळंदी, देहूहून संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवले.
  • करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शनिवार दुपारी दोन वाजल्यापासून ते २५ जुलै रोजीच्या सायंकाळी चार वाजेपर्यंत पंढरपूर शहर व गोपाळपूर परिसरात संचारबंदी लावण्यात आलेली आहे.
  • पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सज्ज झाला आषाढी यात्रेवर यंदाही करोनाचे सावट असून पंढरपुरात चारशे वारकऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
  • या सोहळ्यादरम्यान संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी तब्बल २ हजार ३०० पोलीस तैनात राहणार आहेत.

मराठी वर्षातील सगळ्यांना हवा हवासा महीना. एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे अन्यन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम उभा विटेवरी पांडूरंग,लोचनी दिसे भक्ती भाव, ती पंढरपूरची वारी.पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. 

​आषाढी एकादशी आणि  उपवास

भारतीय परंपरेत उपवास आरोग्य जपण्याचा मार्ग या दिवसी संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो. पूजा अर्चा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.हे यासाठी की घरात वातावरण प्रफुल्लित आणि शुध्द भाव मनी विसावा. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.

​आधी तल्लीनता जयघोष "विठ्ठल विठ्ठल" 

पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राची काशी म्हणून पंढरपूर क्षेत्र ओळखले जाते. पंढरपूरला मरण्यापुवी जावे, एकदातरी विठू माऊलीचे दर्शन घ्यावे हीच मनोमन इच्छा असते.

दर्शनाची आस

अनुभव याची देही याची डोळा घ्यावा हर एक भक्ताची आस असे म्हटले जाते पंढरपूर नगरात तल्लीनता मनी लाभते सद कर्म आपोआप घडतात. एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असे आग्रहाने वडीलधारी मंडळी आवर्जून सांगतात. सुमारे ८०० वर्षांपासून वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे, अशी मान्यता आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस भरभराटीची,सुखांची,आनंदाची, चैतन्याची वारी म्हणतात. शेतकरी आपल्या शेतात पेरणी आटपून  वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत डोलदार  वाढावे ही मनोमन कामना. यातुन सुखसमृध्दी यावी घर धनधान्याने भरून निघावे हेच शेतकरी चिंतन मनन करतो त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची देवाणघेवाण आपल्या माणसाची जपणूक,  साठवण करतो तीची शिदोरी गाठीला बाधून सदभाव व्यवहारात आणतो.

​आषाढी वारीचे महत्त्व

अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात

अभंग कीर्तनातून तल्लीनता येते.

"अंह" "मी पणा" समूळ नष्ट व्हायला मदत मिळते.

मनी भक्ती भाव दयाळू पणा अंगी येतो.

वारी ही पायी करावी लागते यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

शारिरीक आणि मानसिक बदल घडवून येतात.

या परंपरेचा देशातच नाही तर जागतिक स्तरावर संशोधनाचा करतात पर्यटक,विविध संस्था,संघटना संशोधन करताना दिसतात. वारी अनुभवण्यासाठी जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधक वारीमध्ये सहभागी होत असतात. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर उत्सव आणि उत्सव ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}