स्तनपान देणाऱ्या मातांना विशिष्ठ सकस आहाराची गरज का असते ?

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Apr 16, 2021

नऊ महिने कला-कलाने वाढणारे इवलेसे पिल्लू ज्यावेळी तुमच्या कुशीत येते त्यावेळी त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं होते. या आपल्या इवलुश्या पिल्लासाठी सुरवातीचे सहा महिने हे वाढीच्या दृष्टीने खूप महत्वाचे असतात. या दरम्यान बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी आईचे दूध हे अमृत असते. आणि हे आता सर्व जगाने मान्य केले.
स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच बाळाला आवश्यक असणारी सर्व पोषकतत्त्वे योग्य त्या प्रमाणात मिळतात त्यामुळे बाळाचा सर्वांगगिण विकास होतो. बाळाचा विकासाच्या दृष्टीने आईचे दूध हे महत्वाचे असल्याने स्तनपानाच्या काळात तिचा आहार हा सकस व पोषक असणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा परिणाम आईच्या आरोग्यवर आणि बाळाच्या विकासावर होतो. अश्यावेळी आईचा आहार कसा आणि काय असावा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
स्तनपान देणाऱ्या मातांना विशिष्ठ सकस आहाराची गरज का असते ?
त्या वेळी, आपल्याला हे माहित होईल की स्तनपान करणारी आई कशी आणि कशी खावी...
- स्तनपानाद्वारे बाळाच्या आहाराची आणि पोषक घटकांची गरज पूर्ण होत असते आणि ही गरज आईच्या आहाराद्वारे पूर्ण होते.
- बाळंतपणात आईच्या शरीराची झीज होते तसचे खूप ऊर्जा देखील खर्च होते. त्यामुळे मातेच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी मातेला सकस आहार आवश्यक असतो.
- बाळाचा बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी लागणारे आवश्यक घटक दुधातून मिळतात हे घटक दुधात निर्माण होण्यासाठी
- बाळाचे आणि मातेचे कुपोषण टाळण्यासाठी.
स्तनपान देणाऱ्या मातांच्या आहारात पुढील घटकांचा समावेश असावा
स्तनपान करणारी आईसाठी निरोगी आहाराचे कारण खालीलप्रमाणे आहे. हे वाच...
#१. प्रथिनयुक्त पदार्थ
बाळाला स्तनपान देणाऱ्या मातेला नेहमीपेक्षा जास्त उष्मांकाची आणि प्रथिनांची आवश्यकता असते. धान्य -कडधान्य धान्य, डाळी, सुकामेवा, ताजी फळे, भाज्या, हे प्रथिनाचे उत्तम स्रोत आहेत. आईला आणि पर्यायाने बाळालाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे या प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात जरूर समावेश करावा.
#२. लोहयुक्त पदार्थ
लोह सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते, पेशींमधील महत्वाच्या कार्यांना चालना देते त्यामुळे प्रसूतीनंतर आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश असणे आवश्यक असते. हिरव्या पालेभाज्या, पुर्ण धान्य, सुकामेवा, कलिंगड, अंड्यातील पिवळा बलक, बीट अश्या जीवनसत्व युक्त पदार्थांच्या आहारातील समावेशामुळे प्रसुती काळात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते.
लोहयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात मिळवण्यासाठी क जीवनसत्वयुक्त पदार्थ खाल्यास अन्नातील लोह शोषून घेण्यास मदत होते. त्यामुळे यावेळी क जीवनसत्वयुक्त पदार्थाचे सेवन नक्की करा.
#३. ड जीवनसत्व
डी जीवनसत्वाचे सेवन संपूर्ण आरोग्य आणि हाडांच्या विकासासाठी महत्त्वाचे असते. कॅल्शिअम शरीरात शोषले जाण्यासाठी डी जीवनसत्वाची गरज असते. सकाळची कोवळी उन्हे त्वचेखाली डी जीवनसत्व तयार होते. पण ज्यांना उन्हात जाणे शक्य नाही त्यांनी डी जीवनसत्व असणारे पदार्थ जरुर सेवन केले पाहिजे. मासे आणि अंडी ड जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहेत.
#४. झिंक
उत्तम वाढीसाठी, मेंदू आणि चेतासंस्था निर्मितीस सहाय्यक, आजार लवकर बरे करते. केळी, पुर्ण धान्ये, काजू, बदाम, धान्याचे मोड, दुग्धजन्य पदार्थातून
#५. बीटा कॅरोटीन युक्त पदार्थ
पिवळा, लाल आणि नारंगी रंगाच्या पदार्थांमध्ये बीटा कॅरोटीन असते आणि हे स्तनपान देणाऱ्या मतांसाठी उपयुक्त असते . स्तनदा मातेने त्याचे सेवन जरुर करावे. गाजर हे बीटा कॅरोटीनचा उत्तम स्रोत आहे.
#६. पौष्टिक आहार
बाळाला स्तनपान देत असताना आईचा दिवसातील पहिला आहार म्हणजे सकाळची न्याहरी यामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा तसेच अधेमधे भूक लागल्यास पौष्टिक पदार्थ खावेत. जसे राजगिरा खीर, नागली शिरा, कडधान्याची उसळ, डिंकाचे लाडू, आळीव खोबरे लाडू , आळीव खीर, खसखस वड्या खीर अशा पदार्थामुळे दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच तोंडाला चव यावी म्हणून आणि पौष्टिक म्हणून तीळ जवस आणि कारळ्याच्या (खुरासणीची) चटणी तोंडी लावण्यास घ्यावी.
#७. मेथी
मेथीमध्ये ग्लॅक्टोगोग्युज हा घटक असतो असतो, आणि हा पदार्थ मातेचे अंगावरचे दूध वाढविण्यास मदत करतो. म्हणून स्तनपान देत असताना मेथीची भाजी मेथीचे लाडू अश्या पदार्थांचा आहारात समावेश करावा . मेथीमुळे प्रसूतीमुळे निर्माण झालेली अंग आणि हाडांच्या दुखण्यात देखील फायदा होतो.
#८. पाण्याचे योग्य प्रमाण
स्तनपान देणाऱ्या मातांनी योग्य प्रमाण पाण्याचे सेवन करावे तसेच ज्यूस सरबत यांचे योग्य प्रमाणत सेवन करावे. त्यामुळे बाळाला देखील आवश्यक प्रमाणात पाणी मिळते.
स्तनपान देणाऱ्या मातांनी हे करू नये
- बाहेरील तसेच फास्टफूड खाणे टाळावे,घरगुती साधे पातळ आहार घ्यावा.
- तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
- चहा-कॉफी,मद्यपान धुम्रपान करू नये.
- मिरची किंवा तिखट पदार्थांचे प्रमाण अगदी कमी असावे.( नसल्यास उत्तम )
आहारात प्रत्येक पदार्थ योग्य प्रमाणात असणे नेहमीच उपयुक्त असते, परंतु कोणत्याही पदार्थांचे प्रमाण अधिक झाल्यास त्याच अपाय होण्याची शक्यता असते त्यामुळे या काळात आहार घेताना डॉक्टरांचा सल्ला आणि जागरूकता अत्यंत आवश्यक असते
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.







