मुलाच्या बाबतील अनोळखी धोक्याची घंटा ओळखा : सुरक्षितता सुनिश्चित करा

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Apr 23, 2022

माझी आई मला नेहमी म्हणते आताचे मुलं वयाच्या मानाने खुपच हुशार आणि आगाऊ आहेत. ती म्हणते , "मला आठवते की आमचे पालकत्व कधीच आव्हानात्मक नव्हते." अर्थात त्यावेळेस काही समस्या होत्या पण आताच्या सारख्या भयावह आणि भयानक नाहीत. आज, सर्व पालकांना सतावणारी सर्वात वाईट प्रकारची भीती म्हणजे त्यांचे मूल एकटे सुरक्षित आहे की नाही हे माहीत नसणे किंवा विशेषत: जिथे तो किंवा ती सर्वात सुरक्षित आहे अशा ठिकाणी नाही.
तुमचे मूल एकटे सुरक्षित आहे की नाही?
होय, मी शाळांमध्ये मुले सुरक्षित असल्याबद्दल बोलत आहे. अलिकडे निष्पाप मुलांबाबत घडलेल्या समस्यांमुळे पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. तथापि, पालक या नात्याने तुमची मनःशांती आणि मुलाच्या सुरक्षेसाठी, आपण आपल्या मुलांना स्व सुरक्षितता कशी असावी आणि विशिष्ट परिस्थिती कशी हाताळायची आणि कठीण परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकवले तर ते अधिक चांगले होणार नाही का?
बरं, माझा ब्लॉग हा फक्त एक छोटासा प्रयत्न आहे की ज्या मुळे मुलांना काही मूलभूत गोष्टी शिकवतो जेणेकरून ते केवळ शाळांमध्येच नव्हे तर सार्वजनिक किंवा घरामध्ये कुठेही सुरक्षित राहतील.
तुमचे मूल एकटे असताना सुरक्षित आहे याची खात्री कशी करणार?
तुमच्या मुलाला किंवा तिला खाली नमूद केलेल्या गोष्टी शिकवून एकटे असताना देखील सुरक्षित आहे याची खात्री करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.
अनोळखी लोक कोण आहेत हे त्यांना शिकवा: बहुतेक मुलांना असे वाटते की वाईट दिसणारे लोक अनोळखी आहेत आणि चांगले दिसणारे लोक त्यांच्याशी बोलु भेटू शकतात. पण हे खरे नाही. त्यांना शिकवा की चांगले दिसणारे लोक देखील वाईट असू शकतात. तथापि, सर्व अनोळखी लोक वाईट नसतात याची त्यांना आठवण करून द्या. जर ते हरवले असतील आणि एकटे असतील तर त्यांनी मदतीसाठी अनोळखी व्यक्तीकडे जावे.
सुरक्षा वर्तुळ : मुलांनी योग्य व्यक्तीशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. त्यांना त्यांच्या सुरक्षिततेच्या वर्तुळाबद्दल कळू द्या म्हणजे त्याचे आजूबाजूचे व्यक्ती जे त्याच्यावर अपार प्रेम करतात ज्यात प्रौढांचा सुध्दा समावेश आहे ज्यांच्यावर मूल विश्वास ठेवू शकेल. आईवडील, आजी आजोबा, विश्वासू शेजारी आणि काही जवळचे आणि विश्वासू नातेवाईक हे कोणत्याही परिस्थितीत जाण्यासाठी सुरक्षित लोक आहेत.
धोकादायक परिस्थिती ओळखणे: तुमच्या मुलांना कोणत्या परिस्थितीत सावध राहण्याची गरज आहे हे कसे ओळखायचे ते शिकवा. अवघड परिस्थिती कशी हाताळायची ते मुलांना समजावा नाहीच काही करता आले तर तुमच्या मुलाला आवाज करायला सांगा कारण त्यामुळे हल्लेखोर कठीण परिस्थितीत जाईल.
धोक्याच्या घंटा समजावा
- अनोळखी व्यक्तीने मिठाई दिली किंवा पैसे दिले तर
- जर कोणी तुमच्या पालकांची आज्ञा मोडण्यास आणि पालकांच्या इच्छेविरुद्ध जाण्यास सांगत असेल
- त्यांना गुप्त अंगाबद्दल माहिती सांगा
- जर कोणी शारीरिक स्पर्शासारखे अयोग्य वर्तन करत असेल तर त्यांना जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते याचे उदाहरणे देऊन समजावून सांगा.
जागरूकता: लहान मुलाचे पालक या नात्याने बाल मन जाणून घ्या , त्यांच्याशी बोलणे, त्यांना घरी एकत्र येण्यासाठी कॉल करणे, वेबवरील मुलांचे क्रियाकलाप, त्यांचे मेल, सामाजिक खाते आणि फोन तपासणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलाच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवा.
गट क्रियाकलापांना प्रोत्साहन द्या: एखादी व्यक्ती समूहात असल्यास, बहुतेक प्रतिकूल परिस्थिती टाळली जाऊ शकते. तुमच्या मुलाला समूहासोबत राहण्यास प्रोत्साहित करा. संख्यांमध्ये नेहमीच सुरक्षितता असते. परंतु आपण आपल्या मुलाला कधीही एकटे बाहेर पडू नये असे ही शिकवू शकतो.
चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श: तुमच्या मुलाला चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याविषयी शिकवा. तुम्ही असे व्हिडिओ दाखवू शकता जिथे मुलाचे शारिरीक शोषण होत आहे आणि त्यामुळे मुलाला ती गोष्ट पालकांसोबत शेअर करण्याचे धैर्य होते.
तुम्हाला मुलाच्या बाबतील अनोळखी धोक्याची घंटा ओळखा ब्लॉग आवडला? कृपया खाली दिलेल्या टिप्पण्या विभागात तुमची मते आणि अभिप्राय शेअर करा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.