मुलांसोबतचे नाते घट्ट कसे करायचे? जानूया १० गोष्टी

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Jan 25, 2022

मुलांना तुमच्याशी जोडलेले वाटते आणि तुम्ही त्यांना समजता असे त्यांना वाटणे खूप महत्त्वाचे आहे. कोणतेही नाते जितके मजबूत तितके ते गोड असते. मुले जेव्हा त्यांच्या पालकांना जवळ करतात तेव्हा त्यांना अधिक सहकार्य करतात. त्यांना टोमणे मारून, त्यांच्यावर ओरडून, टीका करून हे घट्ट नाते तुम्ही कधीच निर्माण करू शकणार नाही. त्यांच्याशी घट्ट नाते निर्माण करण्यासाठी तुम्ही या गोष्टी रोज कराव्यात.
जर तुम्हाला मुलांसोबतचे नाते घट्ट करायचे असेल तर या १० गोष्टी करा?
तुमच्या मुलाचे तुमच्याशी घट्ट नाते असावे असे तुम्हाला वाटत असेल तर या १० सवयी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नक्कीच समाविष्ट करा.
१. त्यांना दररोज १० ते १२ वेळा मिठी मारा
सकाळी उठल्यावर आणि झोपायला गेल्यावरही त्यांना प्रेमाने मिठी मारा. जेव्हा तुम्ही बाय म्हणता किंवा तुम्ही त्यांना पुन्हा भेटता तेव्हा त्यांना मिठी मारा. त्याच्या केसांना हात फिरवणे , त्याच्या पाठीवर थाप मारणे यासारख्या छोट्या गोष्टी त्याना खूप बरे वाटतील.
२. त्यांच्याबरोबर खेळा
एकत्र खेळून, सोबत मजा करून मुल तुमच्या जवळ आणखी येतात. दिवसभरात त्यांच्यासोबत खेळण्यासाठी वेळ काढला आहे कि नाही याची खात्री करा, फक्त या बाबतीत जरी वेळ पाळली तरी नातं भक्कम व्हायला मदत नक्कीच होईल.
३. त्यांच्यासोबत असताना टेक्नोलॉजी पासुन दूर जा
तुम्ही त्यांना जेव्हा ऐकण्यासाठी फोन किंवा टीव्ही बंद केला किंवा करतात तेव्हा ते तुमच्या कळे लक्षपूर्वक लक्ष देत असतात हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. भविष्यात, या गोष्टीसाठी ते नेहमीच तुमचा आदर करतील.
४. बदलाच्या काळात त्यांच्यासोबत रहा
मुल कधीकधी बदलला सहज जुळवुन घेत नाहीत. जर तुम्ही त्यांना बदलासह जुळवुन घेण्यास मदत केली तर त्यांच्यासाठी बदलाशी जुळवून घेणे सोपे होईल. कोणत्याही बदलाच्या वेळी तुम्ही त्यांच्यासोबत आहात याची त्यांना जाणीव करून द्या.
५. त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ काढा
तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी, मुलांशी एकांतात बोलण्यासाठी दिवसातून किमान १५ मिनिटे काढा.संवाद फार महत्त्वाचा असतो तोच नातं घट्ट करत असतो.
६. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायला शिकवा
चांगल्या मानसिक आरोग्यासाठी, मुलांना त्यांच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करता येणे महत्त्वाचे आहे. जर त्यांना रडायचे असेल तर त्यांना थांबवू नका, फक्त त्यांना असे वाटू द्या की तुम्ही त्यांना समजता आहात.
७. सहानुभूती दाखवा
जेव्हा लोक एकमेकांचे ऐकतात तेव्हा खोल नातेसंबंध तयार होतात. त्याचप्रमाणे, आपण आपल्या मुलाचे ऐकून त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याची सवय लावली पाहिजे. त्यांच्या दृष्टिकोनाचा आदर करा आणि तुमचा दृष्टिकोन त्यांच्यावर लादू नका.
८. शिकवण्याची घाई करू नका
बर्याच वेळा आपण मुलांना शिकवण्याची घाई करतो आणि त्यांनी लवकरात लवकर सर्वकाही शिकावे अशी अपेक्षा करतो. त्यामुळे मुले तणावाखाली राहू लागतात आणि तुमच्यापासून दूर जातात. त्यांना त्यांच्या स्वतःच्या वेळेपासून गोष्टी शिकू द्या आणि त्यांच्यावर अजिबात दबाव आणू नका.
९. झोपण्यापूर्वी त्यांच्यासोबत वेळ घालवा
झोपण्यापूर्वी तुमच्या बाळासोबत वेळ घालवा आणि त्याला त्याच्या दिवसाबद्दल जाणून घ्या. अशा प्रकारे तुम्ही त्याचे मित्र बनण्यास सक्षम व्हाल जे खूप महत्वाचे आहे. ते एक रोजिनींशी / नित्यक्रम बनवा.
१०. मुलांच्या आयुष्यातील क्षणांमध्ये उपस्थित रहा
मुलांसाठी हे खूप महत्वाचे आहे की तुम्ही त्यांच्या विशेष दिवसात त्यांच्यासोबत उपस्थित रहा. मग ते शाळेचे फंक्शन असो वा पार्टी. तुमची उपस्थिती त्यांना आत्मविश्वासाने भरून टाकेल.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}
{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}