'डेल्टा प्लस' व्हेरियंट म्हणजे नेमकं काय? लक्षणं,प्रतिबंधात्मक उपाय

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Jun 30, 2021

देशभराच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात दिसून येत आहे. यातच आपणास एक नवीन नाव ऐकायला मिळत आहे 'डेल्टा प्लस'व्हेरियंट.
कोरोनाच्या या नवीन प्रकारास 'डेल्टा प्लस' नेमकं अस नाव का दिलेलं असावं ? जाणून घेऊ या.
कोणताही विषाणू आपले रूप जेव्हा बदलत असतो. त्या बदलत्या रुपाला संशोधक नाव देतात. कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपाला डेल्टा असे नाव देण्यात आले आणि त्याच्या आणखी घातक रुपाला डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले.कोरोनाचा नवीन डेल्टा प्रकार म्हणजेच B.1.617.2. संशोधकांच्या मते, या विषाणू अधिक संक्रमित होऊ शकतो. कोरोना विषाणूच्या स्वरूपात बदलांमुळे, डेल्टा प्लस प्रकार तयार झाला आहे. हा विषाणू प्रथम युरोपमध्ये आढळला होता. स्पाइक प्रोटीन हा कोरोना विषाणूचा मुख्य भाग आहे. ज्याच्या मदतीने हा विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवतो.कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे लोकांमध्ये संभ्रम,भिती निर्माण झाली आहे. नवीन डेल्टा प्रकार सर्वात वेगवान पसरणारा व्हायरस आहे. अशा परिस्थितीत आपल्याला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जलद गतीने पसरतो डेल्टा प्लस व्हेरियंट.कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटमध्ये सर्वात धोकादायक गोष्टी म्हणजे डेल्टा प्रकार 60 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. संशोधकांच्या मते, या विषाणू अधिक संक्रमित होऊ शकतो.
लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊया.
मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये प्रथम नोंदवलेला डेल्टा प्रकार हा पूर्वीपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान होता. चीनमधून भारतात आलेल्या या विषाणू मुळे देशभरात हाहाकार माजला. डेल्टा हा करोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूमध्ये असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता अधिक वाढली आहे.
- पूर्वी जी लक्षणे सहा ते सात दिवसांनी दिसायची, ती आता संसर्ग झाल्यानंतर लवकर दिसण्याची शक्यता आहे.
- वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांची सल्ला घ्या संपर्कात राहा.यामुळे हे होईल की तुम्ही चुकीच्या माहितीला बळी पडणार नाही.
- डेल्टा विषाणू हा अधिक संसर्गजन्य असलेल्या मुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये पटकन पसरतो. हा शरीरात अत्याधिक वेगाने,लवकर पसरतो. आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसांत दिसू लागतात.
- या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास औषधोपचार हे कोरोनाच्या उपचारपद्धतीसारखेच आहेत. मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दीत न जाणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे.
लक्षणे
- कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये दररोज नवीन लक्षणाच्या नोंदी दिसुन येतात.
- सामान्य लक्षणा असे जाणवू शकतात. ताप,कोरडा खोकला आणि थकवा.
- तीव्र लक्षणे अशी दिसू शकतात छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे
या व्यतिरिक्त
- त्वचेवर पुरळ उठणे, हाताच्या बोटांच्या रंगात बदल
- सामान्य लक्षणांमध्ये घसा दुखणे , चव आणि गंध कमी, न येणं , तीव्र डोकेदुखी , अतिसार जुलाब
हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते प्रतिबधांत्मक उपाय अवलंबिता येतील ?
घराबाहेर पडताना नेहमीच दुहेरी मास्क म्हणजे एकावर एक असे माक्स वापरा.
गरजेचं असेल तेव्हाच घराबाहेर पडा.
20 सेकंद तरी साबणाने आपले हात स्वच्छ धुवा.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, लोकांपासून 6 फूट अंतर ठेवा.
ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.
वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग
वर आरोग्य आणि निरोगीपणा चर्चा
वर आरोग्य आणि निरोगीपणा प्रश्न

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}
{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}