• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
शिक्षण आणि शिक्षण

"रणंजितसिह डिसले" वास्तविक आणि ऑनलाईन बदल घडवणारे शिक्षक

Sanghajaya Jadhav
11 ते 16 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 14, 2021

रणंजितसिह डिसले वास्तविक आणि ऑनलाईन बदल घडवणारे शिक्षक
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

लोकल ते ग्लोबल पातळीवर घेऊन जाणारे शिक्षक विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासावर प्रयत्नशील असलेले   सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत करतात. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी वर्ग शाळेतच प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान कसे उपयोगी ठरू शकते आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन कश्या पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकवता येते याचा प्रभावी उपक्रम

  • युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. 'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' या नावाने ४०० युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार असून याकरिता संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत.

लाॅकडाउन मध्येहि शिक्षण पद्धती कार्यक्षम(Even in lockdown, teaching methods are efficient) -:बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून पुढील दहा वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कार रकमेतील म्हणजेच सात कोटींपैकी अर्धी रक्कम म्हणजेच साडे तीन कोटींची रक्कम ९ देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझुने हे त्यापैकीच एक होत.

  • ग्लोबल शिक्षक अवॉर्ड (Global Teacher Prize 2020):-

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये डिसले सरांसारखे काही प्रयोगशील आणि तळमळीचे शिक्षक आहेत. त्यांच्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी ‘गुणवत्तेची बेटे’ निर्माण झाली आहेत. डिसले यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पारितोषिकानंतर सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

1.पालकांचा सहभाग (Community engagement programmes) -:
टिसले सरांनी पालकांचा सहभाग विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेत करून घेतला. दररोज त्याना दुपारी दोन वाजता एसएमएस पाठवून त्याना मुलाचा आज काय अभ्यास घ्यायचा आहे तसेच रोज सायंकाळी सात वाजता अलार्म लावला शाळेवर वाजवला तो पाच किलोमीटर अंतरावर येईल जेणेकरून या अलार्मनी घरातील पालक अभ्यासीका मुलाकडून करून घेतील.
2.सवय (habit) :-
चांगल्या सवयी आपणास योग्य दिशा देतात. त्या कश्या पध्दतीने विद्यार्थ्यांना अंगीकार करता येईल यासाठी (plan of action) ठाचा आखायचा आणि उपक्रम राबवायचे यातुन चांगले विचार सवयीची जोपासना होते.
3.जागृती (Awareness) :-
शाळे विषयी उदासीनता दुर करून पालक ,शिक्षक आणि विद्यार्थी यात समन्वय साधून जागृत करण्याचा प्रयत्न केला हे एका दिवसाच काम नव्हत म्हणून टिसले सरांनी त्याच्या कलेने त्याच्या वेळेनुसार आनलाईन शाळा ही कशी उपयोगी हे पटवून दिल.
4. वर्ग उपस्थिती (Class attendance) :-
कशी वाढवता येईल हा गहन प्रश्न टिसले सरांना होता मग त्यानी त्याच्या लॅपटॉप वर मुलाच्या आवडीनिवडी नुसार मुव्हिज दाखवायला सुरुवात केली मग याची निमिर्ती उपस्थिती मध्ये झाली मुलं शाळेत येऊ लागले त्याना गोडी निर्माण झाली. शाळा म्हणजे काय तर मनोरंजन ही संकल्पना रुजवली.
5. दैनंदिनी (Diary) :-
"जीवन हेच शिक्षण आहे" आपल्या दैनंदिन जीवनातूनही आपण शिक्षण किती सहज आणि सोप्या पद्धतीने अवलंबून शकतो हे या ऑनलाईन शिक्षण पध्दत सांगते.
आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

 

 

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर शिक्षण आणि शिक्षण ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}