तुमच्या नवजात अपत्याला 'टंग टाई'ची बाधा झालीय का?

Satish Samarth च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Mar 31, 2021

आपल्या मुलाला चांगले वागणे आले पाहिजे पण त्याचबरोबर चांगले बोलताही आले पाहिजे. हे आपल्याला केव्हा कळते की, तो चांगला बोलत आहे की खराब ? त्याला बोलता आल्यावरच ना ? चिमुकल्या मुलांचे मात्र तसे नसते. त्यांना जन्मजात काही व्याधी असली, तर मुलांना मात्र धड सांगताही येत नाही आणि लपविताही येत नाही. आई तर स्वतः संभ्रमात असते आणि बाळाला काहीही सांगता येत नाही. भूक सहन होत नाही म्हणून बाळ दिवसेंदिवस रडत असते, त्रास सहन करीत असते. आपल्या लाडक्याला दूध पाजण्यासारखे सुख नाही. पण, आईसाठी हे सोपे नसते. कारणंच द्यायची झाली तर आईकडे पुरेसे दूध नसणे वा मुलाला दूध प्राशन करता न येणे. परिणामी, त्या मुलाची वाढ खुंटते व त्याचे वजन कमी होऊ लागते. आई घरगुती उपायांनंतर जेव्हा डॉक्टरकडे त्या चिमुकल्याला नेते, तेव्हा याचे खरे कारण समोर येते. त्या मुलाला 'टंग टाई' नावाची व्याधी झालेली असते. या व्याधीमुळे त्याला दूध पिताच येत नाही
काय आहे 'टंग टाई'...?
- आपल्या जिभेखालील मांस जर जास्त कडक असेल, लहान असेल, तर ही 'टंग टाई' समजावी. या मांसाला 'फ्रेनुलूम' असे म्हणतात.
- टंग टाई ही अशी व्याधी आहे, जी बाळाच्या जन्मानंतर लगेच ओळखता आली पाहिजे. नव्हे, डॉक्टरांकडून बाळाच्या सर्वांगाची काटेकोर तपासणी करवून घ्यायला पाहिजे. ही टंग टाई व्याधी वेळेअगोदर जन्माला आलेल्या मुलांना होत असली, तरी रिस्क कशाला.!!
- मुलांना दूध पिता न येणे आणि त्याला पोषक तत्त्व न मिळणे, सोबत बाळाला सहन न होणारा त्रास होऊ द्यायचा नसेल, तर तपासणीला पर्याय नाही.
'टंग टाई'वर उपाय काय?
मेडिकल सायन्स प्रगत झाला असला तरी भारतीय खंडातील दहा लाख मुलं या त्रासाला बळी पडतातच; तेही दर वर्षी..!! ४ टक्के मुलं हा त्रास घेऊन जन्मतात. हा आकडा ऐकून दचकायला होतं, पण हेच वास्तव आहे. टंग टाईचा त्रास फक्त मुलालाच होतो, असे नाही तर आईलाही प्रचंड वेदना होत असतात. टंग टाई मुलामुळे स्तनाच्या अग्रभागावर सूज येणे, दुखणे अशा दुखण्याचा आईला सामना करावा लागतो. मुलाला तर अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागतात. यावर क्लिपिंग हा एक उपाय सुचवला जातो. डॉक्टरच यावर उपाय सुचवू शकतात. जर डॉक्टरांनी क्लिपिंगचा सल्ला दिला असेल, तर तो पालकांनी लवकरात लवकर अंमलात आणला पाहिजे. कारण तुम्ही जितका वेळ कराल तितका त्याचा त्रास वाढत असतो. जर डॉक्टरांनी क्लिपिंग सांगितली नसेल, तर ते मुलांच्या जिभेचे काही व्यायाम प्रकार नक्कीच सांगतील. काही केसेस मध्ये क्लिपिंगनंतरही व्यायाम सांगितला जाऊ शकतो. लक्षात असू द्या - हा व्यायाम प्रकार मुलांसाठी त्रासदायक असला, तरी त्यांच्या सुदृढ जीवनाकरिता ते आवश्यकही आहे. अर्थात, ते तुमच्याकरितासुद्धा कठीणच असेल, पण त्याला पर्याय नाही
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.