• लॉग इन
  • |
  • रजिस्टर/नोंदणी
आरोग्य आणि निरोगीपणा

वट सावित्री पोर्णिमा आणि बहुगुणी वटवृक्ष

Sanghajaya Jadhav
11 ते 16 वर्ष

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Jun 21, 2021

वट सावित्री पोर्णिमा आणि बहुगुणी वटवृक्ष
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

पौर्णिमेला (पौर्णिमा), हिंदू कॅलेंडरमध्ये ज्येष्ठ महिन्यात एक विवाहित स्त्री एका वटवृक्षाच्या सभोवती औपचारिक धागा बांधून तिच्या पतीवर किती प्रेम करते हे दर्शवते.

  • सौभाग्यवती स्त्रिया साडी ,दागदागिने घालून नटूनथटून  दिवसांची सुरवात पुजेची थाळीत कोणत्याही पाच फळ आणि नारळ वडाच्या झाडाला अर्पण केल्यापासून सुरू होतो.
  •  प्रत्येक स्त्री आपल्या पतीची आठवण म्हणून सात वेळा वटवृक्षाभोवती पांढरा धागा गुंडाळते.
  • दिवसभर उपवास करतात.
  • व्रत आणि परंपरेचे काटेकोरपणे पालन केल्यास पतीचे आयुष्य सुदृढ व समृद्ध होते असा समज आहे.

शास्त्रीय दृष्टीकोन-:

पावसाळा म्हटलं की हवेत गारवा,आद्रता, धुळवड,वावटंळ यातुन प्रदुषण निर्माण होत आणि मग ऑक्सिजनची कमतरता भासते ही कमी कशी पुर्ण होईल हे या लेखा द्वारे आपण जाणून घेऊया.आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत अशा संकल्पना मांडल्या आहेत ज्या स्त्रीयांच्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहेत याची प्रचीती ह्या सारखे दिवस योजून केलेली दिसुन येते.

वट सावित्री पोर्णिमेला या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा दणकट वृक्ष म्हणून ओळखला जातो.वडाच्या झाडामध्ये इतर झाडाच्या मानाने ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असल्याने स्त्रियांनी या  सानिध्यात राहणे चांगले असते. त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते.हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस म्हणजे  "वटपौर्णिमा" . ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. 

निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. वृक्ष तोंड थांबावी हा ही या मागचा उद्देश असु शकतो.वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.

वड पूजायचे फायदे :-

1.प्रदशिना-: 

प्रदशिना मारल्याने आपसुक आरोग्य जपले जाते यातून व्यायाम तर होतोच किंबहुना आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो स्त्रीयांच्या संप्रेरक ग्रंथी व्यवस्थित,सुरळीत राहायला मदत मिळते.

2.अक्षय वृक्ष-:

वडाच्या झाडाला अक्षय वृक्षही म्हटलं जातं कारण त्याचा क्षय होत नाही ते वाढतच जात त्याच्या पारंब्या पुनर्वसन पुन्हा पुन्हा करतात त्यामुळे वडांचा विस्तार वाढत जातो.

3. हवा शुध्द-:

भरगच्च, दाट वाढणार वडाच झाड मुबलक सावली तसेच विषारी वायू शोषून भरमसाठ शुध्द हवा हवेत सोडत. यामुळे ज्याना श्वासा संबधित त्रास, व्याधी आहेत त्याना आयुर्वेद वडाच्या झाडाखाली बसण्याचा सल्ला देतात.

4. गर्भवतीस उपयोगी-:

गर्भ राहण्यासाठी आणि गरोदरपणात वडाचा आयुर्वेद शास्रानुसार औषधी वनस्पती म्हणून उपयोग करता येतो.

5.केस संवर्धन-:

वडाच्या झाडाच्या जशा लांबसडक पारंब्या असतात तसेच आपले केस असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटते.पारंब्याच्या रसाने केस संवर्धन होते.

6. शक्तीवर्धक आणि बुध्दीवर्धक-:

वडाच्या झाडाचे अनेकानेक फायदे आहेत. फुल,कोंब,डहाळी आणि पानं याचा काढा आयुर्वेद शास्त्रानुसार उपयोगात आणला जातो. याचा उपयोग करण्यापूर्वी वैद्याचा सल्ला घ्यावा

7. बहुगुणी-:

प्रजनन संस्थेचे विकार,पित्त नाशक,शितल गुणी,त्वचाविकार अशा बहुतांश विकारावर वडाच्या झाडाची साल, काढा, पानं, पारंब्या उपयोगी आहेत. आयुर्वेद शास्त्रात याचा संदर्भ दिसतो.

ब्लॉगमध्ये नमूद केलेल्या उपायांचे अनुसरण करण्यापूर्वीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.आपल्या सूचनांमधून आमचा पुढील ब्लॉग आणखी चांगला बनवू शकतो, म्हणून कृपया टिप्पणी द्या, जर आपण ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीवर समाधानी असाल तर इतर पालकांसह सामायिक करा.

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

  • टिप्पणी
टिप्पण्या ()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर आरोग्य आणि निरोगीपणा ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}