• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
पालक बाळ काळजी अन्न आणि पोषण

1-3 वयोगटातील मुलांच्या खाण्याच्या तक्रारी

Canisha Kapoor
1 ते 3 वर्ष

Canisha Kapoor च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Nov 03, 2018

1 3 वयोगटातील मुलांच्या खाण्याच्या तक्रारी

१ ते ३ वयोगटातील मुलांच्या बाबतीत आहार संबंधीत बऱ्याच तक्रारी आलेल्या दिसून येतात.कोणतीही नवीन गोष्ट खायची भीती वाटणे त्याला 'नियोफोबिया' म्हणतात. ही अवस्था शक्यतो प्रत्येकच मुलाच्या वाढीत दिसून येते. मूल जसे चार वर्षाचे होऊ लागते तसेतसे हि भिती मनातून निघून जाऊ लागते. कधीकधी मुले त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला नकार देतात. त्यावेळी चिंता करायची गरज नाही. या वयात हे सगळे साहजिक आहे. मूल मोठे होत असताना मेंदू त्याला त्याची आवडनिवड याची माहिती करून देत असतो.त्यामुळे अनेकदा मुले काही गोष्टी खायला नकार देतात. मूले जवळपास 1 वर्षाचे झाले की त्याचे वजन वाढण्याची क्षमता जरा कमी होत असते. त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नसते.

बाळा ला जेवण न करु वाटण्याची कारणे:-

 1.  बाळ चे पोट अधीच भरलेले असेल किंवा पोट जड झाले असेल तर बाळ खाण्यास नकार देते. जेवणाच्या वेळा म्हणुन च पाळणे आवश्यक असते.
   
 2.  बाळाला जर फार कंटाळा आला असेल तर किंवा झोप लागली असेल तर त्याची जेवण करताना चिडचिड होवू शकते.
   
 3. बाळा चे जेवण करत असताना लक्ष नसेल तर त्याला जेवण नकोसे वाटते.
   
 4.  बाळ आजारी असल्यास त्याची तोंडाची चव जाते. काहीही खाण्यास तो नकार देतो.
   
 5.  काही बाळाला जेवणाची भिती वाटते. त्यामुळे त्याला जेवण खावेसे वाटत नाही. नियोफोबिया हे त्यामागील महत्त्वपूर्ण कारण आहे.
   
 6. वयाच्या पहिल्या वर्षा पर्यंत बाळाला दात येत असतात त्या दरम्यान बाळा ला फार त्रास होत असतो. हे जेवण न करु वाटण्याचे कारण ठरते.
   
 7.  काही बालकांना कठीण पदार्थ चावात असताना त्रास होतो दातांची वाढ नीट न होणे हे त्याचे कारण असते. त्यामुळे जेवणा वर त्याचा परीणाम होतो.
   
 8.  एलर्जी हे कारण पण तितकेच महत्वाचे आहे. 8%लहान मुलांना याचा त्रास होतो. त्यामूळे रोगप्रतिकार शक्ती वर जेवणा परिमाण झालेला दिसून येतो.


हे उपाय घ्यावे :

 •  मुलांना जर भूक लागली नसेल तर त्याला बळजवरी खाऊ घालू नका. ताटातील सर्व गोष्टी संपवल्या पाहिजेत असा कटाक्ष धरू नका.यामुळे मुले अजून घाबरतात. खायची इच्छा संपते. रोजचा जेवणाचा वेळ त्यांना नकोस वाटायला सुरुवात होते. मुलांना मोकळेपणाने खाऊ द्या.
   
 •  मुलाला रोज नियमित व वेळेवर जेवायची सवय लावा. जर मुलांना इच्छा नसेल तर नाश्ता सारखा आहार मुलांना द्यावा.
   
 •  नवीन पदार्थ मुलाला दिल्यास ते लगेच त्याला खात नाही थोडेसे खातात व बाकीचे टाकून देतात तेव्हा शांतपणे ते मान्य करावे.
   
 • मुले जेवण्यास नकार देत असतील तर लगेच नवीन जेवण तयार करु नका. मुलाला ताटात देइल ते खाण्याची सवाई लावा.
   
 •  जेवनातील भाज्या आकर्षक पणे मांडा. मजा मस्ती करत बाळाला ते खाऊ घालायचा प्रयत्न करा.
   
 •  बाजारात गेल्या वर आपल्या 1 ते 3 वार्षिय मुलाला भाज्या किंवा फळे निवडयाला सांगा. भाज्या धुऊन घेताना मुलाना सोबत घ्या.
   
 •  जर पालक स्वता आरोग्य दायी जेवण करत असतील तर बाळाला त्याची सवाई होईल.
   
 •  जेवताना टीवी वैगेरे बंद करा जेणे करुण मुलाचे लक्ष फक्त जेवणाकडे असेल.
   
 •  टीवी मधे वैगेरे खाण्या पिण्याच्या पदार्थांची जाहिरात पाहुन बाळ त्याकडे आकर्षित होऊ शकते.

 

बाळाला चा आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यावर च बाळाची शरीरिक,मानसिक, बौधिक विकास अवलंबून असतो. त्यामूळे आहार कडे लक्ष दिले पाहिजे. पण हे सगळं करत आसताना त्यात बाळा ची चिड-चिड होऊ नये याची कळजी घ्यावी. जेवण भरवत आसताना लहान मुलांन वर जोर जबरदस्ती करुण ते चारता कामा नये. त्यामुले बाळा च्या मानसिक ते वर परीणाम होऊ शकतो याची दक्षता पालकानी घ्यावी. जेवण जास्त देणे आवश्यक नसते तर ते कमी असले तरी पौषठिक असावे हे लक्षात घ्यावे.

 • टिप्पणी
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}