माझेच मूल माझे का ऐकत नसावं?

Sanghajaya Jadhav च्या द्वारे तयार केले वर अद्यतनित Apr 21, 2022

पालकांसाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची मुले तुमचे ऐकत नाहीत. अनेकदा आपली तक्रार असते की-
१. त्याला जे करण्यास सांगितले जाते ते पूर्णपणे नाकारतो /नाकारते.
२. माझ्या मुलाला परिणामांची पर्वा नाही.
३. माझे मूल मला गांभीर्याने घेत नाही.
४. माझे बाळ जवळजवळ प्रत्येक गोष्टीत जास्त आरडाओरड
५. माझे मूल माझे ऐकत नाही.
बर्याचदा आपण काही उपाय वापरतो, त्या त्या वेळी उपयोगी पडतात जसे की एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे, न ऐकल्याचा राग येणे आणि सूचना देणे, शिक्षा करण्याच्या धमक्या या सर्व गोष्टी आपल्या मुलांन वर आजमावलेल्या आसतात. त्यामुळे ते तुमचं ऐकण्यास तयार नसतात , परंतु असा रागराग ,चिडणे , शिक्षा करणे सर्व परिस्थिती आणखी वाईट करू शकते.
यावर काही सोपे उपाय
१. आधी करा नंतर बोला
सूचना देण्याऐवजी, उठा आणि मुलाला कर दाखवा. तुम्हाला सुरुवातीला जास्त मेहनत करावी लागेल, पण नंतर तुमचे मूल ते काम पटकन करेल.
२. एकाच शब्दात सांगा
त्यांना तपशीलवार सूचना देण्याऐवजी, आम्ही फक्त एक शब्द वापरू शकतो आणि ते बाकीचे करू शकतात. हे त्या मुलांसाठी उत्तम आहे ज्यांना काय करावे हे सांगणे आवडत नाही.
३. तुम्ही काय म्हणता ते करण्यास त्याला वेळ द्या
आपल्या मुलांना आपलं म्हणणं सांगितल्यावर , शांत रहा आणि आपल्या मनात १० मोजा, नंतर थोड्या वेळाने आपले शब्द पुन्हा बोला आणि मग तुम्हाला दिसेल की ते तुम्ही जे बोललात ते करायला सुरुवात करतील. कोणतीही जबरदस्ती आवश्यक नाही. हा एक अद्भुत उपाय आहे.
४. मजेदार व्हा/गंमतीशीर व्हा
तो काळ लक्षात ठेवा जेव्हा तुमचे मूल काहीही गांभीर्याने घेत नव्हते पण तरीही तुम्ही तुमच्या मुलासोबत आनंदी असायचे. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा मुले तुमचे शब्द सहज स्वीकारतात कारण तुम्ही तुमचे शब्द त्यांच्यावर लादत आहात असे त्यांना वाटत नाही.
५. मुलांच्या हृदयाशी कनेक्ट व्हा
त्यांच्या हृदयात डोकावण्याचा प्रयत्न करा, त्यांना शांत करा, त्यांचे सांत्वन करा आणि मग विचारा काय झाले? उदाहरणार्थ, थकलेले, भुकेले इ. कधीकधी, मुले लक्ष देत नाहीत कारण त्यांना असे वाटते की त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.
वर बाल मनोविज्ञान आणि वर्तणूक ब्लॉग
वर बाल मनोविज्ञान आणि वर्तणूक चर्चा
वर बाल मनोविज्ञान आणि वर्तणूक प्रश्न

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}
{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}