• लॉग इन
 • |
 • रजिस्टर/नोंदणी
उत्सव आणि उत्सव

या दिवाळीत मुलांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त टिप्स

Madhura Bal
0 ते 1 वर्ष

Madhura Bal च्या द्वारे तयार केले
वर अद्यतनित Feb 09, 2020

या दिवाळीत मुलांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त टिप्स
तज्ञ पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले

दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी!

नमस्कार मंडळी! सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

दिवाळी म्हटली की आपल्यामध्ये एक नवीन उत्साह संचारतो. दिव्यांची रोषणाई, नवे कपडे, फराळाचे पदार्थ आणि फटाके यांची रेलचेल असणारा हा आपला सण घरातल्या आबालवृद्धांना एक नवी ऊर्जा देणारा असतो. दिवाळीची सुट्टी आणि मित्रमंडळींबरोबर करायची धमाल याच्या नुसत्या विचारानेच मुलांच्या आनंदाला पारावार उरत नाही. अर्थातच, आपण सगळे या सणाचा आनंद लुटण्यासाठी मनापासून तयारी करतो. पण अशी मजा करण्याबरोबरच एक पालक म्हणून आपल्याला सगळ्याच बाबतीत जरा जास्त काळजी घ्यावी लागते -  खास करून जेव्हा आपली मुलं प्राथमिक किंवा पूर्व-प्राथमिक शाळेत जाणारी किंवा त्यापेक्षा लहान असतात. अशावेळी पुढे दिलेल्या टिप्स नक्कीच उपयोगी ठरू शकतात:

 1. दिव्यांची रोषणाई:

  1. कंदील आणि विजेच्या दिव्यांचे तोरण लावताना त्यातील तारा मोकळया/उघड्या राहू नयेत याची काळजी घ्यावी.

  2. विजेची उपकरणे/तोरणे इत्यादी वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्या.

  3. पणत्या/समया लावताना त्या योग्य उंचीवर किंवा वावरताना अडचण होणार नाही अशा ठिकाणी लावाव्यात.  

 2. नवे कपडे:

  1. मुलांना दिवाळीसाठी म्हणून कपडे घेताना ते त्यांच्या मापाचे घ्यावेत. अती घट्ट किंवा अती सैल कपडे घेतल्यास मुलांना ते त्रासदायक ठरू शकतात.

  2. त्यांचे कपडे शक्यतो आतून अस्तर असलेले ज्यामुळे त्यांना ते टोचणार नाहीत अशा प्रकारचे घ्यावेत.

 3. फराळाचे आणि इतर खाद्यपदार्थ:

  1. फराळाचे पदार्थ तसेच इतर खास खाद्यपदार्थ उदाहरणार्थ श्रीखंड, बासुंदी, इ. माहितीतल्या ठिकाणाहून आणावी. घरगुती असल्यास उत्तम!

  2. तयार पदार्थ आणल्यास त्याची वैधता(एक्सपायरी डेट/ expiry date) तपासून पहावी.

  3. मुलांच्या वय आणि प्रकृतीनुसार त्यांना किती आहार झेपेल हे लक्षात घेऊन त्यांना फराळाचे आणि इतर खाद्यपदार्थ खाऊ द्यावे.

 4. फटाके:

  1. फटाके उडवताना मुलांबरोबर एका तरी पालकाने उपस्थित रहावे.

  2. फटाके जिथे उडवले जाणार असतील ती जागा ऐसपैस असावी. उदाहरणार्थ शाळेचे पटांगण, इमारतीची गच्ची, इ.

  3. फटाके उडवताना घालायचे कपडे जितके सुटसुटीत असतील तेवढा अपघाताचा धोका कमी होतो. उदाहरणार्थ मुलींच्या ड्रेसच्या ओढण्या काढून ठेवाव्यात किंवा त्याची घट्ट गाठ बांधावी. त्यांच्या स्कर्टचा घेर कमी असेल तर नक्कीच फायदा होऊ शकतो.

  4. फटाके उडवण्याच्या ठिकाणाजवळ पाण्याची सोय असावी. नसल्यास केवळ खबरदारी म्हणून तुम्ही पाण्याची एक बादली भरून ठेऊ शकता.

  5. एका वेळी एकाच मुलाला एकच फटाका उडवू द्यावा.

  6. वय वर्षे ३ च्या खालील मुलांना फटाके उडवू न दिल्यास उत्तम!

  7. वय वर्षे ३ ते ६ या वयोगटातील मुलांना फुलबाज्या, पेन्सिली इ. लहान फटाके द्यावे ज्यामुळे त्यांना फटाके हातात धरण्याची सवय होईल.

  8. वय वर्षे ६ पासून पुढील वयोगटातील मुलांना फटाके उडवण्याबद्दल माहिती/सूचना द्यावी. एखादा फटका उडवून दाखवावा.

तर या होत्या काही मोजक्या उपयुक्त टिप्स! दिवाळीत घरात कितीही रोषणाई केली तरी घर खर्‍या अर्थाने उजळून निघतं ते मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या आवाजाने, त्यांच्या मस्तीने आणि त्यांच्या खोड्यांमुळे! त्यांचा तो खळाळता उत्साह तसाच निरंतर टिकून राहण्यासाठी आपण एवढी काळजी नक्कीच घेऊ शकतो आणि वेळप्रसंगी पालक म्हणून थोडेसे कठोरही होऊ शकतो.

चला तर मग! एका आनंदी, आरोग्यदायी, समृद्ध आणि सुखरूप दिवाळीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी आणि नववर्ष तुम्हाला भरभराटीचे, आनंदाचे आणि सुखसमृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

पॅरिट्यून एक्सपर्ट पॅनेलच्या डॉक्टरांद्वारे आणि तज्ञांनी त्याची सामग्री तपासली आहे आणि सत्यापित केली आहे. आमच्या पॅनेलमध्ये निओनॅटोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, पेडियाट्रॅशियन, न्यूट्रिशनिस्ट, बाल सल्लागार, शिक्षण व शिक्षण तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, लर्निंग डिसएबिलिटी एक्सपर्ट एंड डेव्हलपमेंट पीड यांचा समावेश आहे.

 • टिप्पणी
टिप्पण्या()
Kindly Login or Register to post a comment.
+ ब्लॉग लिहा

वर उत्सव आणि उत्सव ब्लॉग

Ask your queries to Doctors & Experts

Download APP
Loading
{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}

{{trans('web/app_labels.text_Heading')}}

{{trans('web/app_labels.text_some_custom_error')}}