hi maz don divsa Purvi cervix ch operation zalay plz suggest best precautions n food

Created by
Updated on Oct 11, 2020

| Oct 11, 2020
Hi Gauri Phadke ! या ऑपरेशन नंतर तुम्हाला डिलिव्हरी पर्यंत भरपूर काळजी घेणे गरजेचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे भरपूर रेस्ट बेडरेस्ट घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे कोणतही हेवी सामान तुम्ही उचलू नका .तसंच कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी फायब्रुस डायट घ्या आणि पाणी भरपूर प्या मोशन होण्यासाठी जास्त प्रेशर देऊ नका. तसंच वाटलं तर डॉक्टरांकडून मोशन सॉफ्ट होण्यासाठी औषध घ्या. आणि 34 आठवडे पूर्ण होईपर्यंत सेक्स टाळा. त्यानंतरही डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घ्या. डॉक्टरांच्या संपर्कात नियमितपणे रहा. vaginal hygene ची काळजी योग्य प्रकारे घ्या .शक्यतो लो पीएच साबण वापरा .काहीही आत insert करू नका. काही वेगळेपण जाणवलं तर त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा .जसं की पोटाच्या खालच्या बाजूला वेदना होणं, ब्लिडिंग होणं , वास येणं, किंवा पाणी जाणं असं काहीही जाणवलं तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा .शक्यतो तंतुमय भाज्या ,पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, नारळ पाणी, फ्रूट ज्यूस जास्त प्रमाणात घ्या .गॅस होईल किंवा बद्धकोष्टता होईल असं जेव्हा पदार्थ टाळा .