किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक स्किन केअर टिप्स

All age groups

Sanghajaya Jadhav

2.8M दृश्ये

3 years ago

किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक स्किन केअर टिप्स

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr. Jayashree Shiwalkar

विकासात्मक टप्पे
त्वचेची देखभाल
व्यवहार

किशोरवयीन वयात स्व-संकल्पना रूढ होत जातात मग शारीरिक मानसिक बदल आणि आपण कसे दिसतोय या पासूनचा प्रवास सुरु होतो.  
दिवसागणिक वाढणारे हार्मोन्स, नवीन विरुद्ध लिंगी आकर्षण , समवयस्कर मुलांशी होणारी तुलना , शैक्षणिक आणि आणखी बरच काही , किशोरवयीन जीवन हा जीवनाचा सोपा टप्पा नाही.
 किशोरवयीन मुलांच्या त्वचेची काळजी घेण हे कदाचित सर्वात शेवटच्या गोष्टींपैकी एक मानले जाते असे असले तरी, असंख्य भावना आणि शारीरिक बदलांना सामोरे जात असताना, किशोरवयीनांना त्वचेची तणावपूर्ण स्थिती येऊ शकते. म्हणूनच पालकांनी सुरवाती पासूनच किशोरवयीन मुलाच्या निर्दोष आणि निरोगी त्वचेची काळजी घ्यायला हवी. त्यांच्या त्वचेची चांगली काळजी घेतल्याने तुमच्या मुलाला निरोगी दिसणारी त्वचा मिळू शकते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. किशोरवयीन मुलांची त्वचा सदैव चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी आम्ही काही उपयुक्त स्किनकेअर दिनचर्या टिप्स आम्ही तुम्हाला शेअर करत आहोत.

Advertisement - Continue Reading Below

आपल्या मुलाच्या त्वचेचा प्रकार काय आहे हे ओळखणे गरजेच?

मुलाच्या त्वचेची पोत किंवा प्रकार काय आहे हे योग्यरित्या ओळखणे महत्त्वाचे आहे. सामान्यतः, त्वचेचा प्रकार आनुवंशिकता आणि परिसरातील हवामान परिस्थितीनुसार निर्धारित केला जात असला तरी प्रत्येकाची स्कीन टोन वेगवेगळा आसू शकतो. 

त्वचेचे प्रकार सामान्यतः  तेलकट, सर्वसाधारण , कोरडी आणि मिक्स ( तेलकट +  कोरडी ) त्वचेमध्ये वर्गीकृत केले जातात. 

  • सामान्य त्वचा तेलकट किंवा कोरडी नसते आणि छिद्र क्वचितच दिसतात. या प्रकारच्या त्वचेमध्ये संतुलित सेबम उत्पादन असते ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
  • तेलकट त्वचा हि ऑईली त्वचा म्हणूनही ओळखली जाते यात मुरूम पुटकुळ्या त्वचेवर येताना दिसतात. 
  • कोरडी त्वचा निस्तेज, ठिसूळ, सुकलेली आणि कधीकधी खाज सुटते. कोरड्या त्वचेवर सुरकुत्या लगेच दिसतात. 
  • कॉम्बिनेशन स्किन म्हणजे तेलकट आणि कोरडी दोन्ही त्वचेचे मिश्रण असते. संयोजन त्वचेचा प्रकार असलेल्याना  कपाळ आणि नाकावर तेलकट पणा   गाल आणि हनुवटी कोरडी राहते.

झोप महत्त्वाची 

आपल्याला ठाऊक नसेल कदाचित की आपण झोपेत असताना त्वचा स्वतःच दुरुस्त होते? आपले शरीर शांत होते, आणि झोपेच्या वेळी त्वचा पुन्हा टवटवीत होते. म्हणून, दररोज रात्री किमान आठ ते नऊ तास पुरेशी झोप घेतली पाहिजे.

क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग

हे तीन टप्पे आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या सकाळ आणि रात्रीच्या स्किनकेअर रूटीनमध्ये समावेश केला पाहिजे. यामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
मेकअप उत्पादने आपल्या पाल्यास न वापरायला प्रवृत्त करू शकता रासायनिक उत्पादने किशोर वयीन नाजूक त्वचेला आणखी नुकसान करतात. म्हणून, हलकी उत्पादने खरेदी करा जी सुरक्षित आहेत आणि चेहऱ्यावर काहीही लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

मेकअप काढल्याशिवाय झोपायला जाऊ नका. 

मेकअप काढण्यासाठी आणि चेहरा पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी दहा मिनिटे किंवा त्याहून कमी वेळ लागतो. मेकअप रिमूव्हल वाइप्स वापरल्याने काम आणखी सोपे होते.
चेहऱ्यावरील मुरुम कधीही नखांनी काढू नका किंवा सारखा सारखा हाथ लावणेही चांगलं नाही कारण त्यामुळे इन्फेकशन होण्याची शक्यता असते  मुरुमांच्या उपचारांसाठी त्वचातज्ञाचा सल्ला घ्या.

 डिटॉक्सिफिकेशन 

पाणी हे जीवन आहे ह्या म्हणी नुसार पाणी किशोरावस्थेत पुर्ण पणे लागु होते कारण मुलं पाणी प्यायला उगाचच टाळाटाळ करत आसतात वॉटर थेरपी सर्व प्रकारच्या त्वचेसाठी आश्चर्यकारक कार्य करते. पाण्यामध्ये पोषक तत्व असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. हे डिटॉक्सिफिकेशन आणि आतडे स्वच्छ ठेवण्यात मदत करते, जे तुमच्या त्वचेवर प्रतिबिंबित होते. आदर्शपणे, एखाद्या व्यक्तीने दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यावे.

त्वचेला स्क्रब 

Advertisement - Continue Reading Below

त्वचेला स्क्रब करताना अतिरिक्त काळजी घ्या, विशेषत: जर त्वचा संवेदनशील असेल किंवा तुम्हाला मुरुम असतील. रसायनांनी भरलेले एक्सफोलिएटिंग एजंट टाळा; सौम्य स्क्रबला चिकटून रहा.
कच्ची फळे, व्हेज सॅलड्स आणि आरोग्यदायी ज्यूस यांचा समावेश असलेला संतुलित आहार त्वचेला पोषण देऊ शकतो.  प्लेट जितकी रंगीबेरंगी तितकी ती चांगली. आपल्या पाल्यास अ‍ॅलर्जी असलेल्या कोणत्याही पदार्थाचा समावेश नाही याची खात्री करा.

किशोरांसाठी स्किनकेअर दिनचर्या

आपल्या पाल्यास नियम घालून दिल्यास ते त्याच्या अंगवळणी पडेल आणि पुन्हा तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही वाटणार. 

त्वचा साफ करणे: 
स्किनकेअरची प्राथमिक पायरी म्हणजे त्वचा पूर्णपणे स्वच्छ करणे. तुमच्या त्वचेचा प्रकार काहीही असला तरी, त्वचेची काळजी घ्यायला पाल्यास शिकवा 

टोनिंग: 
 टोनर वापरणे म्हणजे जे मोठे छिद्र कमी करण्यास मदत करते. टोनर छिद्रांना स्वच्छ आणि बंद करतो आणि त्वचेला टवटवीत करतो. तुम्ही वनस्पती-आधारित घटकांपासून बनवलेले टोनर खरेदी करण्याचा विचार करू शकता जे त्वचेसाठी सुरक्षित आणि सौम्य आहेत.

मॉइश्चरायझिंग:
 मॉइश्चरायझरच्या मदतीने आपण त्वचेचा ओलावा टिकवून ठेऊ शकतो. आदर्श मॉइश्चरायझर हे त्वचेच्या प्रकाराला साजेसे आणि त्वचेतील योग्य आर्द्रता राखण्यात मदत करते.

सनस्क्रीन:
 आयुष्यासाठी चांगली सवय म्हणजे त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणे. पाऊस असला तरी सनस्क्रीन आवश्यक आहे. जर मुलं खेळत असतील आणि मुलं अनेकदा घराबाहेर राहता, तर त्याच्यासाठी ३५ पेक्षा जास्त SPF असलेले सनस्क्रीन खरेदी करा. ते जास्त वेळ घरात असतील तर , १५ SPF असलेले सनस्क्रीन पुरेसे आहे.

स्किनकेअर दिनचर्या सर्वांची एकसारखी असू शकत नाही आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्यामध्ये बदलू शकते. हे हवामान, वय, दिवसाची वेळ आणि जीवनशैली यासारख्या अनेक पैलूंवर अवलंबून असते. 

किशोरवयीन मुलास एक चांगली त्वचा निगा राखण्याची आवश्यकता का आहे? 

१) तुम्हाला माहीत आहे का तुम्ही दिवसभरात किती वेळा चेहऱ्याला स्पर्श करता? तुम्ही त्याची मोजदाद ठेवू शकत नाही, कारण बहुतेक वेळा तुम्ही ते नकळतपणे करता. त्यामुळे अधिक मुरुम येण्यापासून रोखण्यासाठी, तुमचे हात चेहऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, नखे कापून ठेवा.

२) चेहरा आपला प्रथम दर्शनी दिसतो त्यामुळे कितीही डिझायनर पोशाख किंवा फॅन्सी शूज खराब झालेली त्वचा लपवू शकत नाहीत, कारण चेहरा ही पहिली गोष्ट आहे जी लोकांच्या लक्षात येते. या वयात तुम्ही होणारे हार्मोनल बदल असूनही, निरोगी त्वचेला प्रोत्साहन देण्यासाठी चांगली स्किनकेअर दिनचर्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

३) दररोजच्या स्किनकेअर विधीमुळे त्वचा स्वच्छ राहते आणि नेहमीच ताजे वाटते. हे सर्व घाण आणि काजळी काढून टाकते, छिद्र बंद करते आणि मृत त्वचा काढून टाकते.

४) निरोगी आणि चमकणारी त्वचा एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवते. हे तणाव पातळी कमी करण्यास मदत करते आणि त्वचेची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.

५) संशोधन असे सूचित करते की चांगली त्वचा निगा राखणे वृद्धत्वाच्या प्रक्रियेस विलंब करण्यासाठी फायदेशीर आहे 

६) पुरेसे पाणी प्यायल्याने तुमच्या त्वचेची लवचिकता टिकून राहते आणि ती निरोगी राहते.

७) संक्रमण किंवा रोगांविरूद्ध त्वचा हा सर्वात मोठा अडथळा आहे. चांगली त्वचा निगा राखल्याने आपल्या शरीरावरील हा संरक्षणात्मक थर सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...