आपल्या मुलाशी घटस्फोटाविषयी चर्चा कशी करावी?

Only For Pro

Reviewed by expert panel
तुमच्या मुलाला तुमच्या (तिच्या /त्याच्या) आयुष्यात होणाऱ्या बदला बद्दल कसे सांगायचे ते येथे आहे.
एक जोडपे म्हणून बातमी शेअर करा
तुमचे वैर बाजूला ठेवून तुमच्या जोडीदारासोबत एकत्र येण्याची ही वेळ आहे की तुमच्या मुलाला सांगावे लागणार की लग्न संपणार आहे. तुम्ही ही बातमी तुमच्या मुलां जवळ कशी बोलणार याची योजना करा. तुम्ही तुमच्या मुलाला हे दाखवणे आवश्यक आहे की तुम्ही एकत्र नसले तरी तुम्ही पालक म्हणून त्याचे सहकार्य करू शकता आणि तुम्ही आणि तुमचा जोडीदार त्याच्या/तिच्या जीवनात सक्रिय सहभाग घेत राहाल.
एकमेकांना दोष देऊ नका
जरी आपण पालक म्हणून एकमेकांना सोबत राहू शकत नसलो तरीही, आपल्या पाटनरच्या गुणदोषाचा पाढा किंवा आपल्या मुलासमोर इतर पालकांवर टीका करणे टाळा. मुलासमोर दोषाचे खेळ खेळल्याने त्याचे/तिचे भावनिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे पालक या नात्याने, तुमचे मूल तुमच्या संघर्षात सहभागी होणार नाही याची खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे.
वास्तववादी बना
घटस्फोटाबद्दल आपल्या मुलाला सांगताना, प्रामाणिक आणि वास्तववादी व्हा. त्यांचे वय लक्षात ठेवा, विभाजनाबद्दल बरेच तपशील शेअर करणे टाळा. त्याच वेळी, आपण काही काळानंतर एकत्र असू असे सांगून खोट्या आशा देऊ नका. घटस्फोटानंतर त्यांचं आयुष्य बदलणार आहे हे त्यांना कळायला हवं पण त्याच वेळी त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून तसंच प्रेम मिळेल याची खात्री द्यावी. खूप भावनिक न होता त्यांना बदलासाठी तयार करा.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)
Related Blogs & Vlogs
No related events found.
Loading more...