९ महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा?

0 to 1 years

Sanghajaya Jadhav

2.2M दृश्ये

2 years ago

९ महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा?

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr. Himani Khanna

आहार योजना
वाढीसाठी अन्न

बाळाच्या वाढीसाठी पाहिलं वर्ष खुपच महत्वपूर्ण असते आणि १ वर्षाखालील बाळ त्यांच्या सर्वात सक्रिय वाढीच्या अवस्थेत असतात. बाळांचा मेंदू आणि शरीर त्यांच्या जन्मापासून सतत वाढत असते म्हणून त्यांच्या वाढत्या शरीराला आणि मेंदूला योग्य पोषणाची गरज असते. पहिल्या ६ महिन्यां प्रयन्त , बाळांना सर्व आवश्यक घटक आईच्या दुधातून सर्व पोषक आणि खनिजे मिळतात तसेच सर्व लहान मुलांना त्यांच्या शरीराच्या आणि मेंदूच्या विकासासाठी कॅलरी, पोषक, जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि निरोगी चरबीयुक्त अन्न आवश्यक आहे. तुमच्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी हे काही पदार्थ चांगले आहेत आणि ते १ वर्षाखालील मुलांना दिले जाऊ शकतात. त्याविषयी आपण या ब्लॉग द्वारे जाणून घेऊयात. 

Advertisement - Continue Reading Below

१) वरण-भात 
डाळीच्या वरचे पाण्याने बाळास द्यावयास पहिल्यादा सुरवात करा मग बाळास हळूहळू भात त्यात मिक्स करून द्या, त्याला जड जात असेल तर ते मिक्सर मधून काढून बाळास चमच्याने भरवू शकतात. 

‍२) केळी
केळी बाळास खायला सोफी तसेच ती बाजारात सहज उपलब्ध असते, केळी लहान मुलांसाठी सुपरफूड आहे. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते आणि ते चवीला चांगले असते. केळी पचनसंस्थेसाठी चांगली असते आणि ऊर्जा टिकवून ठेवते. तुम्ही एक केळी घेऊन ते पूर्णपणे मॅश करू शकता आणि तुमच्या बाळाला देऊ शकता.

३) आंबा
आता समर सीजन मध्ये आंबा सर्वत्र उपलब्ध आहे आणि आंबा हा त्याच्या रंगा मुळे लहानग्यांचा आकर्षणाचा विषयी राहिला आहे.आंब्याला सर्व फळांचा राजा म्हटले जाते आणि ते व्हिटॅमिन ए चा चांगला स्त्रोत आहे आणि चवीला स्वादिष्ट आहे. आंबा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि तुमच्या बाळाला वारंवार आजारी पडण्यापासून रोखतो त्यामुळे तुमच्या बाळास द्यायला विसरू नका. 

Advertisement - Continue Reading Below

‍४) अंडी
 सर्व प्रकारची अंडी नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त असतात आणि अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. १ वर्षांखालील बाळांना फक्त अंड्यातील पिवळ बलक दिले जाऊ शकते. अंड्याचा पांढरा भाग १ वर्षात टाळावा. तांदूळ किंवा बटाटे इत्यादी इतर खाद्यपदार्थांसोबत पूर्णपणे चांगले शिजवलेले अंड्यातील पिवळ बलक मुलांना दिले जात असल्याची खात्री करा. अंड्यातील पिवळ बलकमध्ये झिंक व्हिटॅमिन ए डी ई आणि बी १२ असते.

‍५) बाजरीची लापशी 
बाजरी हे एक असे प्राचीन सुपरफूड आहे जे त्याच्या पौष्टिक मूल्यामुळे अनेक आरोग्य फायदे देते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, हाडांचे आरोग्य चांगले करते आणि यात सर्व संभाव्य अँटीऑक्सिडंट्स आहेत तुम्ही तुमच्या बाळास गोड लापशी बनवून देऊ शकता. तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी घरी बनवलेले तांदळाचे धान्य वापरून पाहू शकता. चांगल्या पोषणासाठी भाजलेल्या धान्यांचे वेगवेगळे मिश्रण वापरून पहा. बर्याच पॅकेज केलेल्या प्रकारांपासून दूर रहा कारण त्यात खूप जास्त मीठ, साखर, ऍडिटीव्ह इत्यादी असू शकतात.

‍६) द्राक्ष , टरबूज ,सफरचंद,गाजर
 द्राक्ष , टरबूज सद्या बाजारपेठेत उपलब्ध आहे तुम्ही बाळाला मॅश करून त्यांना देऊ शकता यामुळे त्याचे शरीर तापमान थंड तर राहिलंच पण पौष्टीक घटकही बाळास मिळतील. सफरचंद सर्व हंगामात उपलब्ध असतात. सफरचंद रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील फायदेशीर आहेत आणि चवीला चांगले आहेत. तुम्ही सफरचंद सोलून उकळून ते मॅश करून तुमच्या बाळाला सर्व्ह करू शकता.
गाजर हे व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे आणि तुमच्या मुलासाठी खूप आरोग्यदायी आहे. भाजलेले किंवा उकडलेले गाजर तुमच्या बाळाला दिले जाऊ शकते. व्हिटॅमिन-ए चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी तूप किंवा तेलाचा एक तुकडा घाला.

‍‍७) नारळ पाणी

‍या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या मुलाला नारळाचे पाणी पिण्यासाठी देऊ शकता. नारळाच्या पाण्यात लॉरिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते जे आईच्या दुधात आढळणारे घटक आहे .त्यामुळे पचन सुधारते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते.सर्दी आणि फ्लूवर उपचार करण्यासाठी लहान मुलांना नारळाचे पाणी दिले जाऊ शकते. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि मीठ योग्य प्रमाणात तापावर उपचार करण्यासाठी असते. हे आतड्यांतील जंत दूर करण्यासाठी चांगले आहे जे लहान मुलांमध्ये विकसित होऊ शकतात.नारळाचे पाणी उलट्या थांबवते आणि अपचन आणि अतिसारावर औषध म्हणून काम करते.

‍९ महिन्या प्रयन्त तुमच्या बाळाला तुम्ही देऊ शकता अशा काही अन्नाची यादी तुम्ही दैनंदिनी म्हणून तयार करू शकता तुमच्या बाळाच्या आहारात उत्कृष्ट फळे भाज्या घालू शकता. अधिक माहितीसाठी प्रभावी मार्गदर्शनासाठी आमच्या पॅरेंटून वरील अनेक ब्लॉग तुम्ही वाचू शकता. 

Be the first to support

Be the first to share

support-icon
Support
share-icon
Share

Comment (0)

share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.

Loading more...