बाळाच्या जन्मानंतरही उपयो ...
Only For Pro
Reviewed by expert panel
महाराष्ट्रात डोहाळजेवण किंवा सिमंत असे गोडभराईचे पारंपरिक सोहळे फार महत्त्वाचे मानले जातात. हा सोहळा होणाऱ्या आईच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि येणाऱ्या बाळाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. या वेळी दिल्या जाणाऱ्या गिफ्ट्समध्ये सांस्कृतिक, पारंपरिक आणि उपयुक्त वस्तूंना अधिक प्राधान्य दिले जाते. होणाऱ्या आईसाठी विचारपूर्वक निवडलेले गिफ्ट्स: प्रेम आणि काळजीचा प्रतीक असते. डोहाळजेवण हा सोहळा केवळ पारंपरिक विधी नसून, होणाऱ्या आईला आणि तिच्या आगामी मातृत्वाचा सन्मान करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. या निमित्ताने दिली जाणारी गिफ्ट्स ही फक्त वस्तू नसतात; त्या प्रेम, काळजी आणि शुभेच्छांचं प्रतीक असतात. योग्य गिफ्ट्स निवडून तुम्ही हा क्षण अधिक अविस्मरणीय करू शकता.
या लेखात, आपण अशा 15 सुंदर आणि उपयुक्त गिफ्ट्स पाहणार आहोत, ज्या होणाऱ्या आईसाठी आणि नवजात बाळासाठी दोन्हीही फायद्याच्या ठरतात.
प्रत्येक गिफ्टमध्ये लपलेली असते प्रेमाची ऊब, शुभेच्छांचा ओलावा, गिफ्टसोबत जुळलेल्या भावना आणि आठवणी त्या क्षणाला अनमोल बनवतात. ती गोड भेट जणू एक नाजूक धागा जो काळजाच्या गाठीशी बांधलेला एक अनमोल धागा असतो, जो प्रेम, आपुलकी आणि नात्यांची वीण अधिक घट्ट करतो प्रत्येक गिफ्ट मागे असतो तो एक सुंदर क्षण, जो आयुष्यभर मनात घर करून राहतो! डोहाळजेवणाच्या निमित्ताने दिलेली प्रत्येक भेट पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये फुलत जाते आणि एका सुंदर आठवणीचा सुगंध पसरवत राहते.
1. पैठणी साडी
पैठणी साडी ही महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रतिक आहे. डोहाळजेवणाच्या वेळी दिलेली पैठणी ही केवळ सुंदर दिसते असे नाही, तर प्रसूतिपश्चात होणाऱ्या सोहळ्यांसाठीही परिधान केली जाते.
2. चांदीची पायल किंवा बांगडी
चांदीचे दागिने बाळासाठी शुभ मानले जातात. पायल किंवा बांगडी ही गिफ्ट केवळ शोभेची नसून, चांदीचे औषधी गुणधर्म बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
3. हर्बल मसाज ऑइल
प्रसूतिपश्चात आईसाठी हर्बल मसाज अत्यंत महत्त्वाचा आहे. आयुर्वेदिक तेलामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि थकवा दूर होतो. अशा गिफ्ट्स आईच्या आरोग्यासाठी अनमोल ठरतात.
4. पारंपरिक दागिने (बांगड्या, मंगळसूत्र)
होणाऱ्या आईसाठी पारंपरिक दागिने, जसे की बांगड्या किंवा मंगळसूत्र, शुभ मानले जातात. अशा वस्तू गिफ्ट केल्यास त्या पुढेही दीर्घकाळ टिकतात आणि सांस्कृतिक मूल्ये जपतात.
5. अंगरखा, झबली
बाळासाठी स्वदेशी, कॉटनचे अंगरखे, झबली, मोजे किंवा टोपी गिफ्ट करणे नेहमीच उपयुक्त असते. मऊ आणि आरामदायी कपडे बाळाच्या नाजूक त्वचेसाठी सुरक्षित असतात.
6. डिंक लाडू किंवा गोडाचे पदार्थ
प्रसूतिपश्चात आईच्या ताकद आणि पोषणासाठी डिंक लाडू, गूळ-खोबऱ्याचे लाडू किंवा हलवा गिफ्ट करणे एक चांगला पर्याय आहे. हे पदार्थ आईसाठी अत्यंत पौष्टिक असतात.
7. नर्सिंग पिलो
आईसाठी नर्सिंग पिलो हा एक प्रॅक्टिकल गिफ्ट आहे. स्तनपान करताना आईला आरामदायक पोझिशन मिळते, ज्यामुळे पाठीचा त्रास टाळता येतो.
8. चांदीची वाटी-चमचा
बाळाच्या पहिल्या जेवणासाठी चांदीची वाटी-चमचा शुभ मानली जाते. हे गिफ्ट केवळ सांस्कृतिक नसून, आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त आहे.
9. ब्रेस्टफीडिंग गाऊन
प्रसूतिपश्चात ब्रेस्टफीडिंगसाठी सोपी आणि आरामदायक गाऊन आईसाठी मोठ्या मदतीचा ठरतो. अशा गिफ्ट्सने तिचे आयुष्य थोडेसे सुलभ होते.
10. हळदीकुंकवाचा सेट
डोहाळजेवणाच्या वेळी हळदीकुंकवाचा सुंदर सेट गिफ्ट करणे शुभ मानले जाते. हा सेट होणाऱ्या आईसाठी सणासुदीला उपयोगी ठरतो.
11. सॉफ्ट टॉयज
बाळासाठी मऊ, सुरक्षित खेळणी गिफ्ट करणे एक चांगला पर्याय आहे. विशेषतः नवजात बाळासाठी असे टॉयज निवडणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्याला कोणताही धोका नसावा.
12. कॉटन स्वॅडल्स
बाळाला गुंडाळण्यासाठी मऊ कॉटन स्वॅडल्स खूप उपयोगी असतात. अशा गोड्या बाळाला उबदार ठेवतात आणि सुरक्षिततेची भावना देतात.
13. पॅम्पर्स/डायपर सेट
डायपर सेट हा गिफ्ट होणाऱ्या आईसाठी सर्वात उपयुक्त ठरतो. विशेषतः नवजात बाळासाठी हे गिफ्ट खूप मदतीचे ठरते.
14. मालिश/स्पा व्हाउचर
आईसाठी मालिश किंवा स्पा सेशन हे गिफ्ट अत्यंत आरामदायक ठरते. प्रसूतिपश्चात थकवा दूर करण्यासाठी मालिश आवश्यक असते.
15. फोटो अल्बम किंवा स्क्रॅपबुक
बाळाच्या पहिल्या क्षणांचे फोटो किंवा आठवणी जपण्यासाठी सुंदर अल्बम किंवा स्क्रॅपबुक गिफ्ट करणे एक भावनिक आणि अविस्मरणीय पर्याय आहे.
गिफ्ट निवडताना लक्षात ठेवावयाचे काही मुद्दे
गोड आठवणी जपणारे गिफ्ट्स!
डोहाळजेवण किंवा सिमंत हा सोहळा म्हणजे फक्त गिफ्ट्सचे देणे-घेणे नाही, तर त्या गिफ्ट्समध्ये प्रेम, शुभेच्छा आणि एक सुंदर नात्याचे प्रतीक असते. गिफ्ट्स जपताना केवळ बाळाचाच विचार न करता, होणाऱ्या आईलाही विशेष महत्त्व द्यावे. परंपरेनुसार, विचारपूर्वक दिलेली गिफ्ट्स ही आठवणींमध्ये कायमस्वरूपी राहतात. डोहाळजेवण किंवा गोडभराई ही होणाऱ्या आईसाठी आणि कुटुंबासाठी आनंदाचा, आशेचा आणि नव्या सुरुवातीचा सोहळा असतो. या वेळी दिलेली गिफ्ट्स केवळ वस्तू नसतात, तर त्या गोड आठवणींचा एक भाग बनतात. ज्या गिफ्ट्स आईसाठी आणि बाळासाठी उपयुक्त असतात, त्या आयुष्यभर त्या सोहळ्याची आठवण करून देतात.
Be the first to support
Be the first to share
Comment (0)