1. --सामाजिक-आणि-भावनिक-

लहानग्यांसाठी गणपती बाप्पाच्या ३ दंतकथा

All age group

4.1M दृश्ये

लहानग्यांसाठी गणपती बाप्पाच्या ३ दंतकथा

प्रकाशित: २८ ऑग, २०२२

Only For Pro

Huda Shaikh

तज्ञ पॅनेलने पुनरावलोकन केले

Huda Shaikh

सामाजिक आणि भावनिक
Festivals
Special Day

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा देवता, विघ्न विनाशक म्हणून त्याची किर्ती सर्वत्र आहे. महाराष्ट्रातील ऑफिस ,दुकान, घरे व मंदिरांच्या मुख्य दारावर गणेशपट्टी वा गणेशाचा फोटो हा असतोच तसेच कोणतेही कार्य करण्या आधी गणेशास वंदन करण्याची प्रथा आहे आजही तमाशा,नाटकाचा प्रयोग सुरू करण्या अगोदर गण गणेशस्तवनाचा असतो कारण गणपती हा विघ्नहर्ता असल्याने घरावर येणा-या संकंटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे असते. हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर (लहान मुलाचे) असलेली देवता हे वर्णन गणेशाचे आहे.  गणेशास प्रथम पूजेचे स्थान ,पूजेचा मान असतो म्हणून त्याला प्रथमेश या नावानेही ओळखतात. 

गणरायाचे वाहन उंदीर आहे तर शस्त्र पाश, अंकुश, परशु, दंत आहे आणि त्याला विविध नावानी ओळखले जाते त्या नावा मागेही अनेक दंतकथा आहेत. 

गणेशाची १२ नावे

 वक्रतुंड , एकदंत ,कृष्णपिंगाक्ष, गजवक्त्र ,लंबोदर ,विकट ,विघ्नराजेंद्र ,धूम्रवर्ण ,भालचंद ,विनायक ,गणपती ,गजानन तसेच माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही बाप्पाला ओळखले जाते. 
गणपतीला आणखी अनेक नावानी पुकारले जाते जसे गणपती हेरंब, महागणपती ,महोदर, एकदंत ,लक्ष्मीविनायक ,विकट ,उच्छिष्टगणपती, विरिगणपती, शक्तिगणपती, विद्यागणपती ,गजानन,विनायक,हरिद्रागणपती,विघ्नराज,वक्रतुंड,ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण,गणपती शिवहर. 

गणेश शब्दाचा अर्थ

गणेश शब्दाचा अर्थ गणांचा- ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपती म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे गणेश हे नाव सर्वांच्या मुखावर असते यावरून गणेश देवाची लोकप्रियता समजते. 

३ दंत कथा 

 १. गणेश ते गजानन होण्याची जन्मकथा  
एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते. पार्वतीने स्नान गृहाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला. तिने स्वतः अंगाचा मळ काढून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली. आपल्या मंत्र शक्तीने तिने त्या मूर्तीत प्राण फुकले व या पुत्रास तिने गणेश नाव दिले. त्याला स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर या कुमार मुलास दारी नेमून पार्वती स्नानास गेली पार्वतीने त्याला सांगितले “मी माझ्या कक्षात अंघोळीला जात आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. इथेच थांबुन लक्ष ठेव.” काही वेळातच शंकर तेथे उपस्थित झाले. कुमाराने शंकरास अडवले. भगवान शंकर क्रोधीत झाले. 
त्यांनी आपले त्रिशुल गणेशावर फेकले, एका क्षणात शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर उडुन दिसेनासे झाले. शंकर त्याला ओलांडुन आत जायला निघाले तोच पार्वती बाहेर आली. पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली मग पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्तिली. शंकरांनी होकार भरला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गणास जो प्रथम दर्शनी प्राणी दिसला तो एक हत्ती होता त्याचे मस्तक घेऊन गण उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.

२. आई-वडिलांच्या सात प्रदक्षिणा

प्राचीन काळातील गोष्ट आहे. एकदा देवांवर मोठे संकट आले. त्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देव एकत्र भगवान शिवशंकरांकडे गेले. देवांचे प्रमुख इंद्रदेव यांनी भगवान शंकरांना संकटाची माहिती दिली. जेव्हा भगवान शंकर देवांची ही समस्या सोडवत होते तेव्हा त्यांचे दोन पुत्र कार्तिकेय आणि गणेशजी त्यांच्या जवळ बसले होते. भगवान शिवाने कार्तिकेय आणि गणेशजींना विचारले, तुमच्यापैकी कोण या समस्येचे निराकरण करू शकेल? कार्तिकेय आणि गणेश या दोघांनीही यासाठी स्वत:ला सक्षम घोषित केले. भगवान शिवांनी दोघांची परीक्षा घेण्याचा विचार केला.
भगवान शिवांनी त्या दोघांना सांगितले की जो पृथ्वीची सात प्रदक्षिणा पूर्ण करून प्रथम येथे येईल, तो देवतांच्या समस्या सोडवेल. हे ऐकून कार्तिक आपल्या वाहन मोरावर बसून प्रदक्षिणा करण्यासाठी निघाला. गणेशजींच्या मनात एक विचार आला, जर मी माझ्या वाहनाच्या उंदरावर बसून पृथ्वीभोवती फिरायला गेलो तर या कामात मला खूप वेळ लागेल.
काही वेळाने तो आपल्या जागेवरून उभा राहिला आणि आई-वडिलांचे सात फेरे संपवून आपल्या जागेवर जाऊन बसला. पृथ्वीची सात प्रदक्षिणा पूर्ण करून कार्तिकेय जेव्हा कैलास पर्वतावर परतला तेव्हा तो स्वतःला विजेता म्हणू लागला. यावर भगवान शंकरांनी गणेशजींच्या परिक्रमेबद्दल विचारले, तेव्हा गणेशजींनी सांगितले की, सर्व जग हे आई-वडिलांच्या चरणात सामावलेले आहे, म्हणून मी माझ्या आई-वडिलांच्या सात प्रदक्षिणा पूर्ण करून तिन्ही लोकांची परिक्रमा केली आहे. तो भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस होता.

३. अहंकारी कुबेर

धनाचा देव कुबेर एकदा शिवपार्वतीला भेटण्यासाठी कैलासात पोहोचला. त्याला आपली संपत्ती आणि वैभव दाखवायचे होते म्हणून त्याने त्या दोघांनाही मेजवानीला बोलावले. शिव पार्वती म्हणाली, "आम्ही येऊ शकत नाही पण तू गणेशाला घेऊन जा , पण तो खूप खातो." कुबेर म्हणाले, "त्याला खायाला हवे तेवढे मी देऊ शकतो."
गणेश जेवायला बसला तेव्हा त्याने सर्व अन्न खाऊन टाकले. यानंतरही ते उपाशी राहिले, म्हणून त्यांनी भांडीच खायला सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी घरातील वस्तू आणि वाड्यांचे सामानही खाल्ले. यानंतरही त्यांचे भोजन चालूच राहिले आणि त्यांनी कुबेराचे संपूर्ण राज्य खाल्ले. जेव्हा कुबेर त्याला हे सर्व थांबण्याची विनंती करू लागला तेव्हा त्याने धमकी दिली, "तू मला जेवण दिले नाहीस तर मी तुलाही खाईन." कुबेर मदतीसाठी शिवाकडे गेला. आपल्या अहंकाराबद्दल त्याने शिवाची माफी मागितली. शिवाने त्याला मूठभर तांदूळ दिले आणि हे गणेशाला दे असे सांगितले तेव्हा कुबेर परत गेला आणि प्रेमाने आणि नम्रतेने गणेशाला तांदूळ दिले आणि गणेशाची भूक भागली.

 तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर नक्कीच इतर पालकांसोबत शेअर करा.

Your All-In-One Baby Toolkit

Monitor milestones, growth, and discover unique baby names easily

Be the first to support

Be the first to share

Share it

संबंधित ब्लॉग

लहान मुलांसाठी गणपती बाप्पाच्या ३ कथा