1. 1-3 वयोगटातील मुलींसाठी बाह्यक ...

1-3 वयोगटातील मुलींसाठी बाह्यक्रिडे चे महत्वा, लहान मुलांसाठी काही बाह्यक्रिडा

Age Group: 1 to 3 years

20.9K views

1-3 वयोगटातील मुलींसाठी बाह्यक्रिडे चे महत्वा, लहान मुलांसाठी काही बाह्यक्रिडा

Published: 07/12/25

Updated: 07/12/25

लहान मुले जशीजशी मोठी होतात तसेतसे त्यांना बाहेरील परिसराची ओळख होयला सुरुवात होते. मूलं १-३ या वयोगटात असताना त्याला बाहेर फिरायला घेऊन जाणे, हे महत्त्वाचे असते. लहान मुले जशीजशी मोठी होतात तसेतसे त्यांना बाहेरील परिसराची ओळख होयला सुरुवात होते. मूलं १-३ या वयोगटात असताना त्याला बाहेर फिरायला घेऊन जाणे, हे महत्त्वाचे असते. बालविकास हा जेवढा घरातून होत असतो त्याहून अधिक तो परिसरातील गोष्टी मधून होत असतो. निसर्गाची संबंध येणे हे पण बाळासाठी तितकेच महत्त्वाचे असते...

बाह्यक्रीडेची गरज आणि महत्वा

बालविकास हा जेवढा घरातून होत असतो त्याहून अधिक तो परिसरातील गोष्टी मधून होत असतो. निसर्गाची संबंध येणे हे पण बाळासाठी तितकेच महत्त्वाचे असते.

  • निसर्गातील वस्तू गोष्टी यांची ओळख होणे बाळासाठी महत्त्वाचे असते.
  • बाह्यक्रीडेमुळे वातावरणातील पंचमहाभूते म्हणजे हवा, पाणी, माती, सूर्य इत्यादी सोबत बाळाचा संबंध येतो ते बाळाच्या आरोग्यासाठी उपयोगी असते.
  • लहान मुले मोकळ्या वातावरणात नाच, पळू व बागडू शकतात त्यामुळे स्नायूंची नैसर्गिक वाढ होण्यास मदत होते.
  • सतत घरात बसल्याने मुले एकलकोंडी होतात त्यामुळे त्यांना घराबाहेर खेळायला नेणे गरजेचे असते.
  • सतत घरी बसल्याने आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वातावरणातील शुद्ध हवेशी मुलांचा संबंध येणे गरजेचे आहे.
  • बाळाला खुल्या मैदानात नेल्यास त्याला तिथे मनसोक्त ओरडत येते गोंधळ घालावे येतो, हवे तेवढे नाचता,  पळता येते त्यामुळे त्यांना मानसिक आनंद मिळून ते आनंदी राहतात.
  • मुलांच्या रोजच्या सुरक्षितते मधून बाहेर पडून धाडसी व सहसी कृत्य करण्याची संधी त्यांना मिळते.
  • बागेत किंवा उद्यानात व मैदानावर गेल्याने मुलाचा इतर मुलांशी संबंध येतो ओळखी होऊन त्यातुन बरेच काही शिकायला मिळते.
  • खेळामुळे मुलांची मानसिक व शारीरिक क्षमता वाढते व कलाकौशल्यांना वाव मिळतो.

 

लहान मुलांसाठी काही बाह्यक्रिडा

Doctor Q&As from Parents like you

लहान मुलांचा खरच बौधिक शारिरीक व मानसिक विकास करायला बह्यक्रीड़ा फार उपयोगी पडतात।

  • बाळाला बागेत गेल्यानंतर पाळण्यात बसवणे. उदा. झोका खेळणे, घसरगुंडी खेळणे इत्यादी. लहान मुलांना त्यातून बराच अननस मिळतो.
  • विविध प्रकारचे पक्षी दाखवणे त्यांचे आवाज एकवणे. तसेच बाळाला काहीवेळा प्राणिसंग्रहालयात घेऊन जावे त्याने विविध प्राण्यांची ओळख होते. तसेच प्राण्याला काही खायला द्यायला सांगावे त्यांनी पशुप्रेम वाढते.
  • लहान मुलांना किल्ला बनवायला सांगणे, घर बनवणे यांसारख्या कलात्मक गोष्टी करायला आवडीने सांगणे. त्यातून मुलांच्या कल्पना शक्ती वाडीस लागतात.
  • लहान मुलांना सायकल चालवायला सांगणे किंवा लहान गाडी चालवायला शिकवणे त्यातून मेंदू व स्नायूंचा बराच व्यायाम होतो.
  • मुलांना खुल्या हिरव्या गवतावर खेळायला सोडावे त्याच्यासोबत लपाछपी पाकडपकडी यांसारखे खेळ खेळावे.
  • मुलांना कधीकधी फुलांच्या बागेत घेऊन जावे. विविध फुले त्यांची नाव, रंग, सुगंध याची माहिती मुलांना करून दयावी.
  • फुगे, गुब्बारे विविध खेळणी हे बाळाचे नेहमीचे आकर्षण आहे. लहान मुलांना बाहेर बागेत वगैरे घेऊन गेल्यावर विविध खेळणी, फुगे वगैरे घेऊन द्यावेत.
  • लहान मुलांना टेंट मध्ये वगैरे खेळायची फार आवड असते त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर टेंट तयार करून घ्यावा. त्यामध्ये त्याला आवडणाऱ्या वस्तू ठेवा. थोडावेळ मुलांना स्वतः सोबत खेळू द्या.
  • लहान मुलांना सर्वात प्रिय असते पाण्यासोबत खेळणे तर घराबाहेरील मोकळ्या जागेत बाळाला त्याचा पोहण्याचा पूल आणून द्यावा. बाळाला त्यात अर्धातास वगैरे खेळण्याची मुभा द्यावी.
  • लहान मुलांना चित्रकलेची फार आवड असते.असं असेल तर त्याला बागेत वगैरे घेऊन गेल्यावर निसर्गातील विविध गोष्टींचे पाहून त्या काढायचा प्रयत्न करण्यास सांगावे.
  • बाहेर घेऊन गेल्यावर मुलांना कधी कधी त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम, चॉकलेट इत्यादि खाऊ चे पदार्थ घेउन द्यावे.

 

लहान मुलांच्या जडणघडणीमध्ये बाह्यक्रीडांचा महत्त्वाचा भाग असतो. मुलांना सतत घर ठेवणे व बाहेर न जाऊ देणे असे अनेक पालक करतात पण मुलांचा पूर्ण विकास व्हायचा असेल तर त्यांना बाहेर खेळायला सोडावे तसेच त्यांच्या सोबत पुरेसा वेळ घालवणेही तेवढेच गरजेचे आहे. लहान मुलांचा खरच बौधिक शारिरीक व मानसिक विकास करायला बह्यक्रीड़ा फार उपयोगी पडतात. त्यामुळे आई वडिल या सोबत बाळा चे संबंध पण अधिक छान होतात.

आम्हाला आशा आहे की आपल्याला उपरोक्त टिपा आवडतील आणि आता आपण आपल्या बाळांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सज्ज आहात.

 

Be the first to support

Be the first to share

support-icon
समर्थन करा
share-icon
शेयर
Share it

Related Blogs & Vlogs

No related events found.