विद्यालय
पालकांनी शाळा निवडताना लक्षात ठेवायच्या 10 गोष्टी – पुण्यातील अनधिकृत शाळांची यादी
All age group
705.3K views
ब्लॉग Parentune द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे
Published: 17/06/25
Updated: 17/06/25
आज प्रत्येक पालकाची इच्छा असते की त्याच्या मुलाला चांगली, सुरक्षित व उच्च दर्जाची शाळा मिळावी. यामुळे इंग्रजी माध्यम शाळांची मागणी वाढत आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील अनेक शाळा बेकायदेशीरपणे चालवल्या जात असल्याचे नुकतेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उघड केले आहे. या शाळांमध्ये मुलांना प्रवेश दिल्यास त्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच शाळा निवडताना पालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे.
शाळेची निवड करताना तपासावयाच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी
1. शाळेची शासकीय मान्यता असलेले प्रमाणपत्र पाहणे आवश्यक आहे. केवळ 'Letter of Intent' असलेल्या शाळांना अंतिम मान्यता नसते.
2. शाळा कोणत्या जागेत चालवली जाते याची खात्री करा. काही शाळा अधिकृत परवानगी नसलेल्या ठिकाणी चालविल्या जातात.
3. शाळेमधील शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासा. प्रशिक्षित आणि पात्र शिक्षक असतील तरच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते.
4. शाळेच्या इमारतीला आवश्यक असलेली सुरक्षा व अग्निशमन प्रमाणपत्र आहे का हे तपासा.
5. शाळेचे फी स्ट्रक्चर पारदर्शक आहे का हे तपासा. अतिरिक्त किंवा लपवलेले शुल्क आकारले जात नाही याची खात्री करावी.
Doctor Q&As from Parents like you
6. शाळेचा अभ्यासक्रम कोणत्या मंडळाचा आहे ते तपासावे. CBSE, ICSE, IB, राज्य मंडळ यापैकी कोणत्याही अधिकृत मंडळाची मान्यता असलेला अभ्यासक्रम आवश्यक आहे.
7. केवळ पुस्तकांपुरते शिक्षण न देता खेळ, कला, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम यांना महत्त्व दिले जाते का हे तपासावे.
8. एका शिक्षकामागे किती विद्यार्थी आहेत याचे प्रमाण तपासा. प्रमाण कमी असल्यास शिक्षकांचे लक्ष प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाते.
9. शाळेबद्दल इतर पालकांचा अभिप्राय जाणून घ्या. मागील विद्यार्थ्यांचे निकाल व प्रगती याबाबत माहिती मिळवा.
10. जिल्हा परिषद पुणे यांनी जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांची यादी तपासावी.
पुण्यातील अनधिकृत शाळांची यादी (2025)
- S.P. English Medium School, Avalwadi, Wagholi
- Colour School, Tathawade
- New Wisdom International School, Perne
- Kingsway Public School, Lonavala
- Majhi Shala, Tathawade
- New Millennium Star English Medium School, Bibwewadi
- Ideal Public School, Dhayari
- Mahatma Gandhi Prashala Sanjay Park English
- Teams Takwa Islamic School, Kondhwa Khurd
- St. View International School, Kondhwa Budruk
- Emmanuel Public School, Hadapsar
- Marathon International School, Shewalwadi
- Aryan World School, Narhe
वरील शाळांना अंतिम सरकारी मान्यता नाही. या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देऊ नये.
बेकायदेशीर शाळांची ओळख कशी करावी?
- शाळेचा Registration Number किंवा मान्यता क्रमांक दिलेला नाही.
- Final Approval Certificate नसलेली शाळा.
- जाहिरातीत भरघोस माहिती पण सरकारी दस्तऐवजांचा अभाव.
- शाळा मंजूर ठिकाणाच्या बाहेर चालवली जात आहे.
- जिल्हा परिषद किंवा शिक्षण विभागाच्या यादीत नाव आहे.
शाळेची निवड करताना पालकांनी विचारायचे पाच महत्त्वाचे प्रश्न
- शाळेला अंतिम मान्यता आहे का?
- फी स्पष्ट व पारदर्शक आहे का?
- शाळेचा पत्ता अधिकृत आहे का?
- शाळेमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था आहेत का?
- मागील वर्षांचा शैक्षणिक निकाल समाधानकारक आहे का?
मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी योग्य शाळेची निवड ही पालकांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. केवळ बाह्य आकर्षणाने किंवा जाहिरातींना बळी न पडता शाळेची शासकीय मान्यता, दर्जा, सुरक्षेची व्यवस्था यांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास मुलांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे खात्रीशीर, मान्यताप्राप्त शाळाच निवडावी.
जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट केलेली बेकायदेशीर शाळांची यादी पहावी. शंका असल्यास स्थानिक शिक्षण अधिकारी, ब्लॉक एज्युकेशन ऑफिस किंवा जिल्हा परिषद पुणे यांच्याशी थेट संपर्क साधावा.
Be the first to support
Be the first to share
