1. एकत्रित/जोडीने लक्ष पुरवणे ...

एकत्रित/जोडीने लक्ष पुरवणे

Age Group: All age groups

4.9M views

एकत्रित/जोडीने लक्ष पुरवणे

Published: 19/05/20

Updated: 19/05/20

'Joint attention' म्हणजे अशी प्रक्रिया ज्यात दोन माणसे एक वस्तू बघताना ती वस्तू व समोरच्या व्यक्तीचा चेहरा, ह्या दोन्ही गोष्टींवर एकत्र लक्ष केंद्रित करू शकतात. हि प्रक्रिया ९-१८ महिन्यांच्या मुलांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते. स्वमग्नता असलेल्या मुलांमध्ये मात्र ह्या गोष्टीचा अभाव जाणवतो. स्वमग्नेतेच्या निदानासाठी हि बाब खूप महत्वाची आहे. दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी व स्वतःचे विचार, अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व प्रतिसाद जाणून घेण्यासाठी 'joint attention'  महत्वाचे आहे. हे सगळे कृत्रिमरीत्या न करता, दैनंदिन जीवनात आपण मुलांमध्ये हे 'joint attention' कसे विकसित करू शकतो ह्याबद्दल काही माहिती इथे देत आहे.

मुलाच्या आवडीपासून सुरुवात

सर्वप्रथम मुलाच्या आवडीपासून सुरुवात करावी. कुठलेही communication  किंवा संवाद साधण्यासाठी त्या गोष्टीचे आकर्षण/ रुची तसेच ते कार्य करण्यामागची प्रेरणा/उत्साह/मोटिवेशन महत्वाचे असते. उदा - राहुलला प्राणी खूप आवडतात. त्याचे joint attention साधण्यासाठी त्याच्या आईने तर्हेतर्हेच्या प्राण्यांचे मास्क चेहऱ्यावर घालून त्याला तिच्याकडे बघण्यास आकर्षित केले. ती जोशपूर्ण आवाज काढून अजूनच रंजक खेळातून राहुलला प्रोत्साहित करायची व हळूच राहुल तिला बघून स्मित हास्य द्यायला लागला. तिच्या नियमित प्रयत्नांमुळे राहुल काही आठवड्यांनी स्वतः तिला प्राण्यांचे मास्क  घालायला सांगू लागला. आता दोघांच्यात  अलटून पलटून मास्क घालून प्राण्यांचे आवाज काढण्याचा खेळ रंगतो. त्याची प्राण्यांमधली रुची पाहून राहुलची आई पिशवीतून वेगवेगळे खेळातील प्राणी व त्या-त्या प्राण्याचा आवाज काढून एक- एक प्राणी राहुलला देई. ती हाव भाव व हालचाली खूप उत्साहात करायची व राहुलने तिच्या चेहऱ्याकडे व प्राण्यांकडे नजर फिरवून एकत्रित लक्ष दिल्यावर ती त्याला त्या प्राण्याबद्दल एक विशेष बाब सांगे आणि राहुलला प्रोत्साहनपर  हाय फाईव्ह  देत म्हणायची ' छान बघतो राहुल!'  'मस्त आवाज काढला तू'. असे  वर्णनात्मक प्रोत्साहन व कौतुक मुलांना नेमके काय छान केले ते स्पष्ट करते.

वरुणाला कारस खूप आवडतात. त्याची आई टॅबलेच्या एका बाजूला कारचं जिग-सॉ पझल घेऊन बसे या वरुण  टॅबलेच्या दुसऱ्या बाजूला. ती वरुणाला  कारच्या पझल मध्ये एक हिस्सा घालायला द्यायची. असे करताना ती त्याच्या डोळ्यांच्या लेवलला बसायची जेणेकरून पझलचा हिस्सा देताना त्यांची नजरानजर होई. अश्याप्रकारे  घरातल्या सगळ्याजणांनी केल्यावर काही दिवसांनी  वरुण स्वतःहून बोटाने दर्शवत पझल चे तुकडे मागायला लागला.

Joint attention वर काम करताना turn taking किंवा आळीपाळीने खेळल्यास तो खेळ मुलांसाठी आकर्षक बनतो. तसेच सामाजिक देवाण घेवाणीचे कौशल्य हलक्या फुलक्या खेळाच्या माध्यमातून शिकवले जाते.  आळीपाळीने खेळ आपण

  • चित्र काढताना, 

  • जेवण बनवताना, 

  • प्ले डो  घेऊन खेळताना सहज खेळू शकतो

Doctor Q&As from Parents like you

. मुलांच्या भाव-विश्वात आपण शिरल्याने त्यांचा आपल्याशी संवाद सुरु होतो. मुलं हळू हळू आपलं  अनुकरण करू लागतात आणि नव-नवीन गोष्टी आत्मसाद करायला सुरवात होते.

मुलांचे भाव -विश्व विस्तारुया

मुलं जे खेळ खेळत असतील त्यात तुम्ही एक नवीन गोष्ट शिकवू शकता जसे कि नवीन आवाज, एक वैशिष्ठ्य किंवा नक्कल आपण त्या खेळात आणू शकता.

उदा : मूल गाडी घेऊन खेळत असता तुम्ही पण एक गाडी घेऊन त्याच्या चेहराजवळ दाखवून ती चालवा व ब्रूम  ब्रूम असा आवाज काढा, गाडी कधी जमिनीवर तर कधी हवेत घेऊन जाऊन 'वर ....खाली ' असे म्हणू शकता. किंवा 'चला आता पेट्रोल भरुया' म्हणत तशी नक्कल करू शकता. अजून एक खेळ म्हणजे आरश्यासमोर बसून वेग-वेगळे हाव- भाव करा...मुलाचे हाव -भाव तुम्ही कॉपी करा नि हळूच नवीन हाव -भाव दाखवा. असे खेळ खेळल्याने ते मूल joint attention देण्याकडे एक पाऊल पुढे उचलेल. किंबहुना मुलांबरोबर खेळाद्वारे नियमितपणे उत्साहाने व प्रोत्साहनाने दैनंदिन जीवनात shared joint attention म्हणजेच एकत्रित/जोडीने लक्ष देण्याच्या कौशल्याचा विकास घडू शकतो.

Be the first to support

Be the first to share

support-icon
समर्थन करा
share-icon
शेयर
Share it

Related Blogs & Vlogs

No related events found.