1. लसीकरणा चे प्रकार व फायदे ...

लसीकरणा चे प्रकार व फायदे

1 to 3 years

Canisha Kapoor

252.8K दृश्ये

3 months ago

लसीकरणा चे प्रकार व फायदे

लसीकरण हा बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोफत मिळते. खेडे गावात लसीकरना संबधित माहीती नसल्या कारणाने अनेक बालकांचे नुकसान झालेले दिसुन येते. बालमृत्यू कमी करण्यासाठी लसीकरण हा एक खात्रीचा व आत्यंत सोपा असा मार्ग आहे.

लस म्हणजे काय?

लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगचे मेलेले किंवा अर्धवट मेलेले जंतु असतात, किंवा त्या जंतुचा अंश असतो.
ही लस शरिरात गेली की त्याच जंतु मुले होणा-या आजार विरोधी अँन्टीबोडी तयार करते. लसीत सबळ जंतु नसल्याने रोग तर होत च नाही पण रोगजंतू बरोबर लढण्याचा अनुभव प्राप्त होतो.


लसीकरणा ची गरज :-
प्राथमीक लसीकरण एक वर्ष पूर्ण होण्या अगोदर होणे गरजेचे असते. लहान मुलांना घातक असलेले सहा रोग आहेत. घटसर्प, गोवर, डांग्या खोकला, धनुवार्त, क्षयरोग, पोलिओ ( पक्षाघात) हे आजार रोगप्रतिबंदक लस दिल्याने टाळता येतात.

Doctor Q&As from Parents like you

 

लहान मुलांना देण्यात येणा-या लसी:-

1)बी.सी.जी. (BCG) :-

ही लस क्षयरोग होऊ नये म्हणून वापरली जाते. जन्माताच किंवा 1-2दिवसात ही लस बाळाला दिली जाते.

2) त्रिगुणी लस :-

खोकला, घटसर्प, धनुर्वात या तीन लसीचा समावेश यात होतो. ही लस जन्मल्या नंतर तिसर्या महिन्यानंतर दर महिन्याला सलग तीन महिने घेतली जाते.

3) पिलियो:-

हे डोस म्हणजे लाल रंगाचे थेंब असतात. पोलिओ चा पहिला डोस बाळ जन्मल्या वर 1-2 दिवसात देतात. बाकी पोलिओ चे बाकी डोस त्रिगुणी लसी बरोबर तोंडने पाजावेत. पोलिओ चा डोस देणे पुर्वी अर्धा तास गरम पाणी किंवा दूध पिवू नये. कारण उष्णते मुळे डोसची शक्ती कमी होते.  

4)गोवर प्रतिबंध लस:-

गोवर हा तसा साधा आजार आहे. पण जे मूले अशक्त किंवा कुपोषित असतात त्यांच्यासाठी तो जीवघेणा सुद्धा ठरू शकतो. अशा कुपोषित मुलांना गोवर नंतर काही इतर आजारांना तोंड द्यावे लागू शकते. जसे की न्यूमोनिया, छातीत कफ (श्वसनलिकदाह) किंवा दबलेला क्षयरोगाचा आजार उफाळून येऊ शकतो. कित्येकदा या आजारानंतर हगवण, रक्ती आव लागते. त्यामुळे आधीपासून सौम्य किंवा कुपोषित असलेली मुले जास्त कुपोषित होतात. म्हणून गोवर महत्त्वाची गोष्ट असते.

बाळाला नवव्या महिन्यात एक गोवर लसीचे व पंधराव्या महिन्यात किंवा दीड वर्ष पूर्ण झाल्यावर बुस्टर (फेरडोल) इंजेक्शन द्यावे. गोवर लसी नंतर ताप किंवा गाठ येत नाही.हे इंजेक्शन त्वचेखाली देतात. या लसीसाठी शितकापाट आवश्यक आहे.

5) द्विगुणी लस:-

यामध्ये दोन प्रकारच्या लस असतात. एक म्हणजे घटसर्प व धनुर्वात प्रतिबंधक लस आहे. यात डांग्या खोकला विरुद्ध लस नसते. कारण चौथ्या वर्षानंतर दांड्या खोकला होण्याची शक्यता कमी असते. चौथ्या वर्षाच्या बुस्टरसाठी या लसीची इन्जेक्शन व पोलिओ डोस दिला जातो. कधीकधी काही कारणांमुळे मुलांना तीन वर्षे कोणतीच लस दिली नसेल तर प्रत्येक महिन्यात द्विगुण लसीची तीन इंजेक्शने व पोलिओ डोस द्यावेत. एक वर्षाने दोन्हीचे बूस्टर व पाच वर्षाने दुसरा बूस्टर द्यावा. द्विगुणी लस हि देखील महत्वाची लस आहे.

लसीकरण हा महत्वाचा विषय आहे याबद्दल जागृतता घडून यावी असे बरेच प्रयत्न सुरु आहेत. मुलांसाठी लसीकरण हे खूप महत्वाचे आहे कारण याने आपण बरेच भावी आजार टाळू शकतो. बरेच आजार हे लासीकरणामुळे पूर्ण नाहीसे करण्यात यश आले आहे. तसेच लसीकरणामुळे मृत्युदर देखील बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. मुलाच्या भावी आयुष्यातील सदृढ शारीरिक जीवनासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे ठरले आहे. लसीकरणबाबत जागृतीसाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये लसीच्या किमती देखील कमी आहेत तर काही लसी मोफत देखील असतात. लसीकरनाने हानी पोहचत नाही उलट फायदाच होतो म्हणून हे मूल्य लक्षात घेऊन प्रत्येक मुलाला लासीकर करणे महत्वाचे आहे.

Be the first to support

Be the first to share

support-icon
समर्थन करा
comment_iconComment
share-icon
शेयर
share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.