1. रोग-व्यवस्थापन-आणि-स्व-देखरेख- ...

अंग बाहेर येणे? लक्षणे , कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

All age groups

Sanghajaya Jadhav

3.2M दृश्ये

3 years ago

अंग बाहेर येणे? लक्षणे , कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Huda Shaikh

रोग व्यवस्थापन आणि स्व देखरेख

गर्भाशय योनीतून बाहेर येतं कारण त्याला आधार देणारे कटिर पोकळीतले स्नायू आणि तंतु ताणले जातात आणि कमजोर होतात. “गर्भाशय स्नायूंनी बनलेलं असतं आणि ते विविध प्रकारच्या इतर स्नायू, पेशी आणि तंतूंनी कटिर पोकळीत एका जागी बांधलेलं असतं, अंग बाहेर येणे म्हणजे गर्भाशय त्याच्या मूळच्या जागेवरुन खाली येणे, खालच्या दिशेने घसरणे ही समस्या मुळता महिला जेव्हा वयोवृध्द होतात किंवा मध्यम वयात जाणवते.  यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातली मूळची जागा सोडून खाली उतरते. याला कारणीभूत बाळंतपणे, अशक्तपणा, उतारवय ,ओटीपोटातले स्नायू होय स्त्रीयांचे गर्भाशय धरून ठेवणारे स्नायू दुबळे झाल्यामुळे हा आजार होतो. 
बऱ्याच स्त्रीयाना  बाळंतपणानंतर बाईला विश्रांतीची गरज असते पण तीही अनेकींना मिळत नाही. त्यामुळेदेखील काही आजार निर्माण होत असावा. 

 

लक्षणे


बाळाच्या जन्मानंतर  सामान्यतः लक्षणे उद्भवत नाहीत. मध्यम ते गंभीर गर्भाशयाच्या प्रोलॅप्सच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:

Doctor Q&As from Parents like you

  • योनीतून ऊती फुगल्या दिसणे किंवा जाणवणे,तसेच सतत अस्वस्त वाटणे,  ओटीपोटात जडपणा , कंबरदुखी, अंगावरुन जास्त पांढरे जाणे, शारीरिक संबंधांच्या वेळी त्रास ही लक्षणं दिसतात.
  • ओटीपोटात जडपणा जाणवणे किंवा ओढणे
  • जेव्हा तुम्ही बाथरूम वापरता तेव्हा मूत्राशय संपूर्णपणे रिकामे होत नाही असे वाटते
  • मूत्र गळतीसह समस्या, ज्याला असंयम देखील म्हणतात
  • आतड्याची हालचाल करण्यात अडचण येणे आणि आंत्र हालचाल होण्यास मदत करण्यासाठी योनीमार्गावर बोटांनी दाबणे आवश्यक आहे
  • एखाद्या लहान बॉलवर बसल्यासारखे वाटते
  • कपड्यांवर योनीच्या ऊती घासल्यासारखे वाटणे
  •  पाठीच्या खालच्या भागात दाब किंवा अस्वस्थता
  • लैंगिक चिंता, जसे की योनीच्या ऊती सैल झाल्यासारखे वाटणे

 

अंग बाहेर येण्याची कारणे   


अंग बाहेर येण्याच्या काही अवस्था आहेत. त्यानुसार बाईला काही लक्षणं जाणवू शकतात.
 

१. स्नायूंचा लवचिकपणा कमी झाली की योनीबाहेर आलेल्या अवस्थेत थोडा काळ व वरचा काळ, कमी-अधिक अवस्थेप्रमाणे राहते. यात गर्भाशयाच्या पिशवीचे तोंड त्याच्या नैसर्गिक जागेहून थोडे खाली सरकते. गर्भाशय खाली उतरताना आपसूकच योनिमार्गही सैल होऊन खाली उतरतो. योनिमार्ग खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. यामुळे लघवी अडकते किंवा आपसूक थोडी थोडी लघवी होण्याचा त्रास सुरु होतो. 

२. लघवीचे व पाळीचे वेळेस योनीचा भाग थोड्या प्रमाणात बाहेर येणे व थोड्या वेळाने आपोआप आत जाणे, लघवी व पाळीचे वेळी योनीचा बराच भाग बाहेर येणे व तो तसाच बाहेर राहणे व हाताने ढकलून आत सारावा लागणे. यामुळे ओटीपोटात जड वाटू लागते. गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरले तर योनिद्वारातून गर्भाशयाचे तोंड दिसते. काही तरी निसटल्यासारखे, सुटत असल्यासारखे वाटत राहते.मायांगामध्ये सतत काही तरी असल्यासारखे वाटते. ओटीपोटात ओढ लागल्यासारखे दुखते. मायांगावर ताण पडल्यासारखे वाटते. मांड्यांना रग लागते. अंगावरुन पांढरे जाते. शरीरसंबंध करणे अवघड जाते किंवा संबंध करताना खूप दुखते.

३.  तिसऱ्या अवस्थेमध्ये गर्भाशय योनीच्या बाहेर दिसायला लागते. पूर्ण गर्भाशयच बाहेर पडलेले दिसते. गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा नाजूक असते. त्यावर कपडा घासल्याने व्रण तयार होतात. विशेष करुन खोकला आला किंवा दोन पायावर बसले की अंग योनीच्या (मायांगाच्या) बाहेर पडलेले दिसते. याच्या जोडीने ओटीपोटात जड वाटणे, चालताना दोन मांड्यांमध्ये काहीतरी आल्यासारखे वाटणे, ओटीपोटात आवळून धरल्यासारखे दुखणे, कंबर दुखणे, अंगावरुन जास्त प्रमाणात पांढरे जाणे आणि संबंधांच्या वेळी खूप दुखणे अशी लक्षणे दिसतात.
या टप्प्यामध्ये गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागते.

 

मुख्य कारणे:


अंग बाहेर पडण्याची तक्रार ही बहुतांशी अयोग्य प्रकारे झालेल्या बाळंतपणाशी संबंधित असते. बाळंतपणात जास्त वेळ कळा देत राहणे, बाळास जास्त वेळ खाली सरकावण्यासाठी जोर लावणे, बाळंतपणात विलंब , गर्भाशयाचे तोंड लहान असल्यामुळे चीर दिल्यामुळे, पूर्ण उघडलेले नसताना चिमटे लावून बाळ ओढणे, मूल जास्त हेल्दी असणे, यामुळे आपसूक गर्भाशयाला धरून ठेवणारे स्नायू आणि पडदे सैल पडतात.  
बाळंतपणाच्या वेळी कळा यायला लागल्यावर लगेच बाईने जोर केला तर गर्भाशयाच्या स्नायूंवर ताण पडतो. गर्भाशयाचं तोंड उघडेपर्यंत जोर लावू नये. तसे केल्यास स्नायू सैल पडतात. बाळंतपण झाल्यावर किंवा गर्भपातानंतर बाईने किमान दीड महिना विश्रांती घ्यायला हवी. या काळात कोणतीही जड कामं करु नयेत. खूप बाळंतपणे झाल्यानेही स्नायू सैल पडत असल्याने गर्भाशय उतरण्याची शक्यता असते. बाळंतपणानंतर  ४० दिवसांच्या आत हे स्नायू बळकट झालेले नसतात. अशा काळात लगेच कष्ट करणा-या स्त्रियांना हा आजार संभवतो. थोडक्यात सांगायचे तर उतारवय व बाळंतपणातील ताण या दोन गोष्टींमुळे गर्भाशय उतरते. जुनाट खोकला, तसेच बध्दकोष्ठ असेल तरी अंग बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते बाळंतपणानंतर लगेच कामाला सुरुवात केल्यास गर्भाशयाच्या स्नायूंवर ताण पडतो आणि त्यामुळे गर्भाशय मूळ जागी येणे अवघड होते. परंतु बायकांना अशी विश्रांती मिळत नाही त्यामुळे गर्भाशयावर ताण येतो.
लहान वयामध्ये गरोदर राहणे, एकामागोमाग एक अनेक बाळंतपणं होणं, मुलगा व्हावा यासाठी सततची बाळंतपणं किंवा वारंवार गर्भपात ही देखील अंग बाहेर येण्याची कारणं आहेत.
अनेकदा स्त्रिया आपले आजार अंगावर काढतात. असे आजार अंगावर न काढता, वेळीच उपचार घेणे गरजेचे असते.

 

प्रतिबंधक उपाय 

 

  • ओटीपोटाचे विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास चांगला उपयोग होतो. योनीचे व्यायाम उदा. आश्विनी मुद्रा शिकून घ्यावीत 
  • प्रत्येक बाळंतपण रुग्णालयात व्हावे 
  • बाळंतपणानंतर धूप ,मालिश आणि महिनाभर तरी आकुंचनाचे व्यायाम करावेत. 
  • दोन मुलांमध्ये पुरेसे अंतर असणे आवश्यक आहे.
  • बाळंतपणानंतर दीड महिना विश्रांती घेणे आवश्यक आहे.
  • गर्भाशय खूप उतरले नसेल तर स्नायूंना टाके घालून आणि व्यायामाने वर खेचता येते.

 

योनी परीक्षण करा 

 

  • खाली बसून वा वाकून अंग बाहेर येते का? किती वेळ राहतो? तसेच आत ढकलावा लागते का? याचे परीक्षण करावे.
  • योनी मोड किंवा लाली किंवा आजूबाजूला कातड्यासारखे आहे काय? याचे परीक्षण करावे.
  • पोटात वायू धरणे कमी होते का यावर लक्ष ठेवावे. 

अनेकदा असे आजार होतात पण बाया त्याबद्दल बोलत नाहीत. त्यांना बोलायची लाज वाटत असते आणि तसा वेळ किंवा संधीही त्यांना मिळत नाही. अशाच एका आजाराची आपण माहिती घेऊ या. या आजारांवर वेळीच उपचार झाले तर त्यातून पुढे निर्माण होणारी गुतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते.

Be the first to support

Be the first to share

support-icon
समर्थन करा
comment_iconComment
share-icon
शेयर
share-icon

Related Blogs & Vlogs

No related events found.