special-day
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा : इतिहास, महत्व आणि माहिती

काय तुमच्या लहानग्याचा आवडता सण "रक्षाबंधन" आहे? तसेच तुम्ही स्वताः बहिणीला खूप खूप जीव लावता. तर या रक्षाबंधन सणाला सुरुवात झालीय बाजारपेठा रंगेबेरंगी ,चमचमणाऱ्या राख्यांनी फुललेल्या दिसताय!! या महिन्यात येणार्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणाला अन्यन्य साधारण महत्व आहे. याबाबत या ब्लॉग मध्ये सविस्तर जाणून घेऊया.
रक्षाबंधन या सणांचा वेगवेगळ्या नातेसंबंधात खूप स्थान आहे. भाऊ बहीण छोटे- मोठे असोत किंवा वृध्द पण हा सण म्हणजे पर्वणी आणि सण, उत्सव व व्रते यांच्यामागचे कारण , परंपरा , शास्त्र ध्यानात घेऊन विश्वासाने आणि श्रद्धापूर्वक साजरे करण्यात समस्त समाजाचे कल्याण असते. मराठी श्रावण महिन्यात सण, धार्मिक उत्सव व उपवासाचा महिना म्हटले जाते.
रक्षाबंधन म्हणजे काय?
‘रक्षाबंधन’ या शब्दाचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बंध. भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम आणि संरक्षणाच्या पवित्र बंधनाचा हा उत्सव आहे. रक्षाबंधन या दिवशी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधायची असते त्यामागे भावाची भरभराट व्हावी अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, हे त्याचे कर्तव्य मानले जाते.
Doctor Q&As from Parents like you
रक्षाबंधनाचे महत्व आणि माहिती
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.राखी बांधण्याचा अर्थ आपण बहिणीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो.बहीणभाऊ नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.
इतिहास
- उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.
- रक्षाबंधनचा सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.
- इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता. ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे.
- तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.
- राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत.
- महाराष्ट्रात या सणाला ‘राखी पौर्णिमा’ म्हणतात, तर कुणी ‘कजरी पौर्णिमा’ म्हणतात.
- द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी,राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट
- हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान इंद्राची पत्नी, साचीने इंद्राला दुष्ट राजा बळीपासून वाचवण्यासाठी बांगडी बांधली. त्यामुळे भारतातील पश्चिमेकडील राज्यांमध्ये पत्नी आपल्या पतीसोबत हा सोहळा करतात.
- मेवाडची राणी कर्णावतीने मुघल सम्राट हुमायूनला राखी पाठवून सुलतान बहादूर शाहच्या मदतीची याचना केली. हुमायूनने विनंती मान्य केली आणि त्याने तिला संकटातून बाहेर काढण्यास मदत केली.
- शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्याचा आदेश दिला होता.
- ब्रिटीश राजवटीत, सर्व समुदायांमध्ये मैत्री आणि एकता वाढवण्यासाठी हा सण साजरा केला जात होता.
- रवींद्रनाथ टागोरांनीही बंगालची फाळणी थांबवण्यासाठी राखीचे माध्यम मागितले.
- आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना! यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते.
नारळी पौर्णिमा :
श्रावण महिन्यात खरं तर सणाची सुरवात असते श्रावण महिन्यात येणारा नारळी पौर्णिमा हा दुसरा महत्त्वाचा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. आपले कोळी बांधव श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ (नारळ)अर्पण करतात.समुद्र शांत राहावा आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवाना पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राचा सामना करता न यावा यासाठी त्याला प्रार्थना केली जाते. समुद्रदेवाचे पूजन केल्यामुळे समुद्रदेव आणि वरुणदेव यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नद्या आणि समुद्र यांचा मोलाचा वाटा आहे. समुद्राचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त होते.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
Be the first to support
Be the first to share
Related Blogs & Vlogs
No related events found.