1. कोरोना-वायरस

कोरोना व्हायरसच्या संक्रमनापासून बचावासाठी घरात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?

Age Group: All age groups

6.3M views

कोरोना व्हायरसच्या संक्रमनापासून बचावासाठी घरात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?

Published: 13/04/20

Updated: 06/11/23

Only For Pro

Dr. Himani Khanna

Reviewed by expert panel

Dr. Himani Khanna

कोरोना वायरस
वायू प्रदूषण
रोग प्रतिकारशक्ती

 कोरोना व्हायरस चे संक्रमण होऊ नये यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घेत असालच पण तरीही परिवाराच्या सुरक्षेसाठी घरातल्या काही छोट्या छोट्या पण अत्यंत महत्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. तुमच्या घरातले काही सामान देखील कोरोना व्हायरस संक्रमनाचे कारण ठरू शकते हे तुम्हाला माहित आहे का? आजच्या ब्लॉगमध्ये आपण हेच बघणार आहोत की घरातील कोणकोणत्या वस्तु कोरोना व्हायरसच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरू शकतात.

घरामध्ये तुमच्या बाळाला कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासुन दूर ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?

घरामध्ये बाळाच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेताना कुठल्या गोष्टींविषयी सावधानता बाळगायला हवी याविषयी अत्यंत महत्वाच्या सूचना आज आपण जाणुन घेउया.

  • सध्या कुणाशीही हात मिळवु नये किंवा हैंडशेक करू नये याविषयी बाळाला समजवा.
     
  • सध्याच्या परिस्थितिमध्ये तुम्ही देखील बाळाची गळाभेट घेऊ नये आणि बाळाला देखील कुणाची गळाभेट घेऊ देऊ नये. सोशल संपर्कापासून दूर राहण्याविषयी त्याला योग्य प्रकारे शिकवण दया.
     
  • बाळाला सवय असते कुणाच्याही मांडीवर किंवा कुशीत बसण्याची,पण तुम्हाला त्याला तसे करण्यास थांबवायला हवे. यासाठी तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे.
     
  • बाहेरून आणलेली कुठलीही वस्तु बाळाला लगेच तशीच खायला देऊ नका. त्या वस्तुला व्यवस्थितपणे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच मग बाळाला दया.
     
  • फळे खुप फायद्याची असतात पण लक्षात ठेवा फळाना नीट साफ़ करुन मगच बाळाला खाण्यासाठी दया. शक्यतो फलांची साले काढून मग फले खाल्लेली बरी.
     
  • तुमच्या बाळाला जर सर्दी खोकला झाला असेल तर त्याला आइसोलेट करा आणि त्या दरम्यान त्याची कलजी घेण्यासाठी आई किंवा वडिल यांपैकी एकाने बाळाजवळच रहावे.

 लॉकडाउनच्या या काळात तुम्ही तुमच्या घरात बाळाला व्यस्त ठेवा .त्यासाठी बाळाचे मनोरंजन होइल असे खेळ किंवा बोर्ड गेम्स तसेच इतर इनडोर गेम्स खेला जेणेकरून बाळाला घरात कंटाळवाने वाटणार नाही.  

घरातील कोणत्या गोष्टी कोरोना ला कारणीभुत ठरू शकतात?

Doctor Q&As from Parents like you

कोरोना वायरसच्या संक्रमनापासून वाचण्याचा सर्वात चांगला आणि महत्वाचा उपाय म्हणजे घरातच रहाने पण त्या बरोबरच घरातले फोमाइट म्हणजेच कोरोना व्हायरस ला कारणीभुत ठरतील अशा गोष्टींपासून सावध रहाने खुप गरजेचे आहे.

घरामध्ये कुलुप,मेन गेट,मुख्य दरवाजा दरवाज्याचे हँन्डेल,स्विच बोर्ड ,चावी इत्यादि.

बाहेरून घरामध्ये येणारे व्हायरस वाहक –

भाज्या,फळे ,दूध,औषधे,खाण्याचे पदार्थ किंवा सामग्री .

फळे, दूध , भाज्या यांच्यामार्फ़त कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी काय करावे?

हा खुप महत्वाचा प्रश्न आहे कारण घरामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्याना आपण खुप जास्त दिवस किंवा फार काळासाठी साठवून नहीं ठेवू शकत. उदा.दूध,भाज्या,फळे .

जेव्हा आपण दूध,भाज्या किंवा फळे बाजारातून आणतो तेव्हा यांना आपण निर्जंतुक करू शकतो का किंवा निर्जंतुक करायचे असेल तर त्याची काय प्रक्रिया आहे याचे उत्तर SHRC च्या डायरेक्टर डॉ.शिखा पवार यांनी पुढीलप्रमाणे दिले आहे.

वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपरला सेनेटाइज कसे करावे ?

डॉ.शिखा पवार सांगतात की सध्या काही कलासाठी वृत्तपत्र न वाचलेलेच बरे कारण न्यूजपेपर छपाईनंतर अगोदर खुप ठिकाणी जातात आणि मग आपल्या घरी येतात ज्यामुळे त्याद्वारे कोरोना संक्रमनाचा धोका वाढू शकतो. पण जर वृत्तपत्र वाचण्याची सवय असेल किंवा वाचायचे असेल तर वृत्तपत्र आल्यानंतर  कमीत कमी 6-12  तासांनंतरच वाचावे आणि शक्य असेल तर कमीत कमी 7-8 तास उन्हामध्ये ठेवावे. उन्हात इतका वेळ राहिल्यामुले व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

दूधपिशवी सेनेटाइज कशी करावी - 

डॉ शिखा पवार यांच्या म्हणने आहे की दुधपिशवी घरात आणल्या नंतर ते पैकेट डिटर्जेंट ने व्यवस्थित धुवून घ्यावे. डिटर्जेंटच्या प्रभावाने दूधाच्या पिशवीवर जर व्हायरस असेल तर तो नष्ट होइल त्यानंतर तुम्ही दूध भांड्यात घेउन गरम करून वापरू शकता.

भाज्या किंवा फळे आणल्यावर काय करावे ?

ही एक खुप महत्वाची बाब आहे कारण याविषयी डॉक्टरांचे म्हणने आहे की सर्वात अगोदर तुम्ही ज्या पिशवीमधून  भाज्या आणि फळे आणता ती पिशवी अगोदर डिस्पोज करा. त्यानंतर फळे आणि

  • भाजीपाला फ़ूड वॉशमध्ये धुवून घ्या जेणेकरून कोरोना व्हायरसचा धोका राहणार नाही. याशिवाय फळे आणि भाज्या तुम्ही स्वच्छ पाण्यानेदेखील धुवु शकता. शक्यतो फळाची साले काढून मगच फळे खाण्यासाठी वापरावीत.
  • आपल्या घरात दररोज साफसफाई करावी. दरवाज्याच्या कड्या, हैन्डल,कुलुप यांचीदेखील स्वच्छता नियमितपणे करावी. बाहेरून आल्यानंतर हात धुवावेत किंवा तसा नियमच असावा.

कोरोना व्हायरस चा प्रभाव कोणत्या गोष्टींवर किती काळासाठी राहतो?

कोरोना व्हायरस च प्रभाव कुठल्या गोष्टीवर किंवा सामानावर किती वेलासाठी राहतो याविषयी आपल्याला कुतूहल असतेच आणि आज आपन तेच जानुन घेणार आहोत. तांब्यावर 4 तास , आरश्यावर 4 तास , रबर वर 8 तास , पॉलिथिन वर 16 तास , कार्डबोर्ड वर 24 तास, प्लास्टिक वर 72 तास , स्टेनलेस स्टील वर 72 तास , हवेत 3 तासांपर्यंत कोरोना वायरस जिवंत राहू शकतो.

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण इतर काही महत्वपूर्ण गोष्टी करू शकतो जसे की शक्य होइल तितके ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडावा, जर एटीएम चा वापर करावा लागला तर टिश्यू पेपर किंवा  टूथपिक चा वापर करावा आणि त्या नंतर टिश्यू पेपर डिस्पोज करावा.

तुमच्या सुचना किंवा विचार आमच्या पुढील ब्लॉगसाठी प्रोत्साहन ठरतात तेव्हा कृपया कमेंट करा आणि जर ब्लॉगमधील माहितीने तुम्ही संतुष्ट असालतर इतर पालकांशी देखील ब्लॉग शेयर करा. धन्यवाद !

Be the first to support

Be the first to share

support-icon
समर्थन करा
share-icon
शेयर
Share it

Related Blogs & Vlogs

No related events found.